28 January 2020

News Flash

राशिभविष्य : दि. ९ ते १५ ऑगस्ट २०१९

शुक्र-नेपच्यूनच्या षडाष्टक योगामुळे वैचारिक संघर्ष वाढतील.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष शुक्र-नेपच्यूनच्या षडाष्टक योगामुळे वैचारिक संघर्ष वाढतील. मित्र, नातेवाईक, ओळखीचे लोक यांच्याकडून आपला अपेक्षाभंग होईल. तरी सांभाळून राहावे. भावनिक गुंतवणूक कमी करावी. नोकरी-व्यवसायात अपेक्षित यश मिळण्यासाठी जास्त काळ लागेल. सहकारीवर्गाकडून मदतीची अपेक्षा ठेवू नका. जोडीदार आपली स्थिती समजून घेईल. त्याचा सल्ला मानणे आपल्या हिताचे ठरेल. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवण्याचा प्रयत्न कराल.

वृषभ रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे अडलेल्या प्रश्नांची उत्तरे सापडतील. यश, कीर्ती व नावलौकिक वाढेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांनी मांडलेल्या संभाव्य शंकांचे योग्य प्रकारे समर्थन करू शकाल. सहकारीवर्गाचे संपूर्ण पाठबळ मिळेल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. विचारांची देवाणघेवाण होईल. नातेवाईकांशी आपुलकी वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कफ व उत्सर्जन संस्थेचे विकार बळावतील. वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल.

मिथुन शुक्र व शनी या भिन्न कारकत्वाच्या ग्रहांच्या षडाष्टक योगामुळे हाती घेतलेल्या कामात दिरंगाई होईल. आíथक व्यवहार सावधपणे कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे साहाय्य मिळेल. सहकारीवर्गाचे प्रश्न अचानक चच्रेत येतील. त्यांना मदत करावी लागेल. वेळेचे गणित सांभाळावे लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासह चर्चा करून आपल्या समस्यांवर उपाय शोधाल. कुटुंबातील सदस्यांना आíथक मदत कराल. भाजणे, खरचटणे यांपासून सावधान!

कर्क गुरू-चंद्राच्या युती योगामुळे सामाजिक वा राजकीय कार्यात सहभागी व्हाल. मित्रमंडळी, सहकारीवर्ग यांच्या मदतीला धावून जाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या निर्णयात बदल झाल्यामुळे परिस्थिती काळजीपूर्वक हाताळाल. आपली समयसूचकता दाखवाल. जोडीदारासह झालेल्या चच्रेतून त्याच्या समस्यांवर उपाय सुचवाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कामाच्या तणावामुळे पोट बिघडेल. मानसिक स्वास्थ्य जपलेत तर शरीरही तंदरुस्त राहील.

सिंह रवी-प्लुटोच्या षडाष्टक योगामुळे कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्यासंबंधी काळजी वाटेल. वैद्यकीय साहाय्य घ्यावे लागेल. नोकरी-व्यवसायात परदेशातील काँट्रॅक्ट मिळतील. परदेशवारी करण्याचा योग संभवतो. वरिष्ठांचा विश्वास खरा ठरवाल. सहकारीवर्ग मदतीसाठी तत्पर असेल. जोडीदाराच्या भावना समजून घ्याल. एकमेकांसाठी वेळ राखून ठेवाल. कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही राहील. हाडांचे दुखणे अंगावर काढू नका.

कन्या शुक्र-चंद्राच्या नवपंचम योगामुळे गृहसजावटीच्या वस्तू खरेदी कराल. कला व सौंदर्य दृष्टीत भर पडेल. नोकरी-व्यवसायात आपली पत उंचावेल. शब्दांना वजन येईल. सहकारीवर्ग मदतीची याचना करेल. जोडीदाराच्या कलागुणांना पुष्टी द्याल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. अशक्तपणा जाणवल्यास झोप, व्यायाम व आहार यांवर लक्ष द्यावे.

तूळ चंद्र-बुधाच्या समसप्तम योगामुळे आपले मार्मिक बोलणे सर्वाना आवडेलच असे नाही. विचार न करता बोलणे टाळा. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल. सहकारीवर्ग परखडपणे आपले मत मांडेल. त्यांच्या प्रश्नाचे समर्थन करताना तारांबळ उडेल. अभ्यासपूर्वक सादरीकरण लाभदायक ठरेल. जोडीदारासह शब्दाने शब्द वाढवू नका. त्याच्या सहयोगाने कौटुंबिक प्रश्न सोडवाल. घसा व डोळे यांचे आरोग्य सांभाळावे.

वृश्चिक रवी-नेपच्यूनच्या षडाष्टक योगामुळे आपली संवेदनशीलता वाढेल. मित्रमंडळींमधील गरसमज दूर कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा प्रभाव वाढेल. कामाचा ताण वाढला तरी मानसिक समतोल ढळू देऊ नका. सहकारीवर्गाचे साहाय्य मिळेल. कामे वेळेत पूर्ण करतील. जोडीदारासह चांगले सूर जुळतील. त्याचा सल्ला मानल्यामुळे लाभ होतील. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. पित्तविकार उफाळून येतील. घरगुती उपाय करा. नियंत्रित आहार घ्या.

धनू शनी-चंद्राच्या युतियोगामुळे हाती घेतलेल्या कामात अडचणी येतील. शारीरिक व मानसिक शक्ती जास्त खर्ची पडेल. संघर्ष करावा लागेल. नोकरी-व्यवसायातील महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्याल. सहकारीवर्गाकडून मदत मिळण्याची अपेक्षा ठेवू नका. जोडीदाराच्या विचारी वृत्तीमुळे व व्यवहारकुशलतेमुळे अडचणींवर मात कराल. एकमेकांना सांभाळून घ्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

मकर आत्माकारक रवी व भावनांवर अंमल असलेला शुक्र यांच्या युतीयोगामुळे आनंद व उत्साह वाढेल. स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या मनापासून पार पाडाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. सहकारीवर्गाच्या हिताच्या गोष्टी त्यांच्या ध्यानात आणून द्याल. जोडीदारासह मनमोकळी चर्चा करा. त्याचा सल्ला लाभदायक ठरेल. कौटुंबिक वातावरण हलके फुलके ठेवण्याचा प्रयत्न करा. छातीत जळजळ, पित्त अथवा कफाचा त्रास होईल.

कुंभ रवी-नेपच्यूनच्या षडाष्टक योगामुळे अधिक भावनाशील व संवेदनशील व्हाल. आíथक व्यवहार जपून करा. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे म्हणणे नीट ऐकून घ्या. सबुरीने घ्या. सहकारीवर्गाकडून अपेक्षित मदत मिळेल. जोडीदाराबरोबरचे गणित बिघडू देऊ नका. दोघांनी एकमेकांना थोडे समजून घेणे आवश्यक! कुटुंब सदस्यांसाठी धावपळ करावी लागेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. सर्दी, तापाची लक्षणे दिसल्यास त्वरित औषधोपचार करावा. विश्रांती घ्यावी.

मीन चंद्र-शुक्राच्या समसप्तम योगामुळे धावपळीच्या दिवसांनंतर थोडी स्वस्थता मिळेल. पण जास्त आराम न करता पुढील योजना हाती घेऊन त्वरित अंमलबजावणी करावी लागेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. सहकारीवर्गाकडून साहाय्य मिळेल. कुटुंबासह वेळ आनंदात जाईल. शरीरातील अतिरिक्त उष्णतेमुळे फोड, पुटकुळ्या, गळवांचा त्रास होईल.

First Published on August 9, 2019 1:02 am

Web Title: astrology 9 to 15 august 2019
Next Stories
1 राशिभविष्य : दि. २६ जुलै ते १ ऑगस्ट २०१९
2 राशिभविष्य : दि. १९ ते २५ जुलै २०१९
3 राशिभविष्य : दि. १२ ते १८ जुलै २०१९
Just Now!
X