15 December 2017

News Flash

दि. १० ते १६ मार्च २०१७

सुख आणि दु:खाचा समसमान वाटा या आठवडय़ात तुम्हाला लाभेल.

विजय केळकर | Updated: March 10, 2017 11:13 AM

राशिचक्र

01vijay1मेष सुख आणि दु:खाचा समसमान वाटा या आठवडय़ात तुम्हाला लाभेल. जे चांगले आहे त्याकडे पाहा. जे नाही ते विसरून जा. व्यवसाय-उद्योगात  पशाची थोडी तंगी जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ गोड बोलून तुमच्याकडून जास्त काम करून घेतील. तुम्हीही संस्थेकडून मिळणाऱ्या सवलतीचा पुरेपूर फायदा घ्याल. घरामध्ये इतरांनी तुमचा शब्द पाळला पाहिजे असा तुमचा आग्रह असेल. खर्चात कपात करण्यासाठी स्वत:वर र्निबध ठेवाल.

वृषभ सहसा तुम्ही कोणाच्या अध्यात- मध्यात नसता. एकलव्याप्रमाणे आपले लक्ष कामावर केंद्रित करता. या आठवडय़ामध्ये मात्र मित्रमंडळी आणि नातेवाईक तुमच्या कामात ढवळाढवळ करतील. व्यापार-उद्योगात मत्री आणि पसा यांची गल्लत होऊ देऊ नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ कामापुरती तुमची स्तुती करतील, याचा अंदाज घेऊन तुमची कामाची पद्धत ठरवा. सहकाऱ्यांच्या बोलण्याला भुलून जाऊ नका. घरामध्ये एखाद्या कामात नातेवाईक तुम्हाला मदत करण्याचे आश्वासन देतील.

मिथुन मनात आलेली इच्छा ताबडतोब पूर्ण करण्याकरता तुम्ही आता सिद्ध झालेले असाल. पण ते साध्य करण्याकरता हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नका. व्यापार-उद्योगात प्रत्येक काम करताना त्यातल्या बारकाव्यांचा नीट विचार करणे आवश्यक आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमचा कामाचा वेग उत्तम राहील. पण एखादी गोष्ट तुम्ही जर विसरलात तर वरिष्ठांना नेमकी त्याचीच आठवण येईल. घरामध्ये मुलांच्या आणि बुजुर्गाच्या आवडीनिवडीचा तुम्हाला विचार करावा लागेल.

कर्क या आठवडय़ात पूर्वी केलेल्या कामामुळे किंवा हितचिंतकामुळे तुमचा फायदा संभवतो. व्यापार-उद्योगात एखादे सरकारी काम किंवा कोर्ट व्यवहार मार्गी लावावे लागेल. ज्यांचा परदेश व्यवहार आहे त्यांना तेथून एखादी ऑर्डर मिळेल. नोकरीमध्ये तुम्ही अवघड काम मार्गी लावल्यामुळे वरिष्ठ खूश होतील. घरामध्ये छोटी-मोठी सजावट करून ते सजविण्याचा प्रयत्न कराल. नातेवाईक आणि मित्रमंडळींचा मेळावा ठरविण्यात तुम्ही पुढाकार घ्याल.

सिंह जी कामे अतिशय सहज आणि सोपी वाटलेली होती, त्यामध्ये हात घातल्यावर वेगळाच अनुभव येईल. तुम्हाला तुमचे ठरविलेले बेत लांबवावे लागतील. व्यापार-उद्योगात जे पसे अपेक्षित होते ते हाती पडण्यात काही तांत्रिक अडथळे निर्माण होतील. सरकारी नियम किंवा कायद्याचा तुमच्या हातून भंग झाला असेल तर त्यामधून त्रास संभवतो. नोकरीच्या ठिकाणी  वरिष्ठांना एखादी चूक काढण्याची संधी मिळेल.

कन्या जी गोष्ट तुमच्याकडे असेल ती शेअर करायला सहसा तुम्हाला आवडत नाही. पण या आठवडय़ात स्वत:चा मतलब साध्य करण्याकरिता जिभेवर साखर पेरावी लागेल. व्यापार-उद्योगात भागीदारी किंवा मत्रीकराराचा एखादा नवीन प्रस्ताव तुमच्या पुढे येईल. नोकरीमध्ये एखादे जबाबदारीचे काम तुमच्यावर सोपवले जाईल. तुमच्या नेहमीच्या कामामध्ये तुमची प्रगती उत्तम असेल. अति कष्टाची कामे टाळा. घरामध्ये लहान मुलांच्या कलानुसार वागावे लागेल. त्यांना खूश ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कार्यक्रमात बदल करावे लागतील.

तूळ तुमची रास बौद्धिकदृष्टय़ा अतिशय हुशार आहे. पण ज्या वेळी शारीरिक कष्ट वाढतात त्या वेळी तुम्हाला आत्मविश्वास कमी असतो. या आठवडय़ात काही गोष्टी तुम्हाला नशिबावर सोपवाव्या लागतील. व्यापार-उद्योगात पर्यायी व्यवस्था तयार ठेवा. पशाची तात्पुरती गरज भागेल. नोकरीमध्ये अनेक कामे एकाच वेळी हाताळावी लागतील. कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे हे ठरवा. घरामध्ये आपुलकीच्या व्यक्तीशी सांभाळून वागावे आणि बोलावे लागेल.

वृश्चिक जो माणूस प्रयत्नांवर विश्वास ठेवून काम करतो त्यालाच दैवाची साथ मिळते. या आठवडय़ामध्ये ज्या गोष्टींचा तुम्ही नाद सोडून दिला होता त्यामध्ये प्रगती झाल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. व्यापार-उद्योगात तुमच्या मनाला जे योग्य वाटेल तेच तुम्ही करा. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला न आवडणारे काम सांगून वरिष्ठ जणू काही तुमची परीक्षा बघतील. तुम्ही त्यामध्ये सफल झाल्यावर ते कौतुक करतील. घरामधल्या एखाद्या प्रश्नात दोन पिढय़ांतील विचारांची तफावत जाणवेल.

धनू तुमची परिस्थिती विचित्र होणार आहे. मनाच्या कोपऱ्यामध्ये मौजमजा आणि आराम करावासा वाटेल. पण काही कारणाने कामाचा ताणतणाव वाढेल. व्यापार-उद्योगात योग्य कामाकरिता योग्य व्यक्तींची निवड करा. पशाच्या कामाला प्राधान्य द्या. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या शब्दाला मान द्या. बेकार व्यक्तींना धीर धरावा लागेल. घरामध्ये दोन वेगवेगळ्या आघाडय़ांवर दोन वेगवेगळी कामे तुम्हाला करावी लागतील.

मकर तुमची परिस्थिती दुरून डोंगर साजरे अशी होणार आहे. जी गोष्ट अगदी सहज वाटली होती ती मिळविण्याकरिता बरेच कष्ट पडतील. व्यापार-उद्योगात खूप काम करून खूप पसे मिळविण्याची तुमची इच्छा जागृत होईल. प्रवासाच्या वेळेला घाईगडबड करू नका. महत्त्वाची कागदपत्रे नीट सांभाळा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना घाईने आश्वासन देऊ नका. आठवडय़ाच्या सुरुवातीला एखादे जिकिरीचे काम हाताळावे लागेल. घरामध्ये एखाद्या प्रश्नावरून विनाकारण वादविवाद होतील.

कुंभ या जगामध्ये पसा महत्त्वाचा आहे. पण काही कामे अशी असतात जिथे पशापेक्षा हितसंबंधांना जास्त महत्त्व असते, याचा अनुभव तुम्हाला येईल. व्यापार-उद्योगात वसुली करताना शक्यतो कोणालाही दुखवू नका. प्रॉपर्टीसंबंधीचे खर्च वाढतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ एखादे अवघड काम सांगून तुमची जणू काही परीक्षा बघतील. थोडा विचार करून तुम्ही त्यावर मार्ग शोधून काढाल. घरामध्ये गरजेच्या वेळेला सर्वाना तुमची आठवण येईल.

मीन या आठवडय़ात दोन वेगवेगळ्या आघाडय़ांवर वेगवेगळे अनुभव तुम्हाला येतील. व्यक्तिगत जीवनात  करिअरमुळे तुम्हाला थोडेसे जखडून गेल्यासारखे वाटेल. व्यापार-उद्योगात पशाची तुम्हाला चिंता नसेल. जुने सरकारी किंवा कोर्ट-व्यवहार अचानक डोके वर काढतील. नोकरीमध्ये तुम्ही नेहमीपेक्षा जास्त काम कराल. वरिष्ठांचे मात्र समाधान होणे कठीण वाटते. घरात मोठय़ा व्यक्तींचे स्वास्थ्य आणि मूड सांभाळावे लागतील.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on March 10, 2017 1:05 am

Web Title: astrology from 10 to 16 march 2017