18 November 2017

News Flash

दि. १४ ते २० जुलै २०१७

एका वैचारिक संक्रमणाच्या उंबरठय़ावर तुम्ही असाल.

विजय केळकर | Updated: July 14, 2017 6:24 PM

राशिचक्र

01vijay1मेष एका वैचारिक संक्रमणाच्या उंबरठय़ावर तुम्ही असाल. व्यापार-उद्योगात एखादे नवीन तंत्र आत्मसात करावेसे वाटेल. कामाचा वेग आणि दर्जा वाढावा असा त्याचा उद्देश असेल. नोकरीमध्ये संस्थेत भेटणाऱ्या व्यक्तीचा तुमच्यावर बराच प्रभाव राहील. तुम्हाला तुमच्या कार्यपद्धतीचा नव्याने अभ्यास करावा लागेल. सांसारिक जीवनात इतरांच्या अपेक्षा पूर्ण करता करता तुमची तारांबळ उडेल. नवीन जागी स्थलांतराचे संकेत मिळतील.

वृषभ सभोवताली अडथळे असले तरी तुम्ही एखाद्या मोठय़ा ध्येयाने प्रेरित व्हाल. ते साध्य करण्याकरिता वेळप्रसंगी व्यक्तिगत सुखावर पाणी सोडण्याची तुमची तयारी असेल. व्यवसाय किंवा उद्योगाच्या क्षेत्रात उलाढाल आणि फायद्याचे प्रमाण वाढवण्याकरिता एखादा ठोस आणि महत्त्वाचा निर्णय घ्याल. नोकरीमध्ये वरिष्ठ काय काम सांगतील याचा अंदाज आल्यामुळे तुम्ही ते काम आधीच तयार ठेवाल. तुमचे अंदाज आडाखे बरोबर ठरतील. घरामध्ये शुभ कार्यक्रम ठरेल. त्यामध्ये तुमचा पुढाकार असल्यामुळे तुम्ही बराच भाव खाल.

मिथुन ‘इच्छा आहे तेथे मार्ग आहे’ हे आता तुमच्याकडे बघून कळेल. एखादा महागडा पर्याय तुमच्या समोर येईल, पण तुम्ही मात्र त्याचीच अंमलबजावणी करायला प्रवृत्त व्हाल. व्यापार-उद्योगात स्पर्धकांच्या पुढे जाण्याची तुम्हाला घाई असेल. त्यापेक्षा तुमच्या नेहमीच्या पद्धतीने काम करणे जास्त श्रेयस्कर ठरेल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्यावर खूप विश्वास टाकतील.  घरामध्ये तुमचे मत व्यक्त करण्यापूर्वी इतरांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या. जोडीदाराचा महागडा हट्ट पुरवावा लागेल.

कर्क जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे मिळत नाहीत. त्या मिळविण्याकरिता कधीकधी धोका पत्करावा लागतो. या आठवडय़ात जे तुम्हाला पाहिजे आहे ते मिळविण्याकरिता वाकडी वाट करायला तयार व्हाल. व्यवसाय-उद्योगात एखादा निर्णय घेऊन प्रगतीचा वेग वाढवाल. भागीदारी किंवा मत्रीकराराचे प्रस्ताव तुमच्यापुढे येतील. नोकरीमध्ये हाती घ्याल ते तडीस न्याल, असा तुमचा बाणा असेल. घरामध्ये स्वत:ची हौसमौज पूर्ण करून घ्याल.

सिंह एखादी गोष्ट तुमच्या मनात असली की त्याचाच तुम्हाला ध्यास लागतो. अशा वेळी तुम्ही डोळ्यावर कातडे ओढून घेता आणि तुमचे स्वप्न पूर्ण करता. या आठवडय़ात थोडासा व्यवहारी दृष्टिकोन ठेवला तर तुमचाच फायदा होईल. नोकरीमध्ये आपले काम वेळेत आणि वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे करा. त्यामुळे तुमचे कष्ट वाचतील. घरामध्ये जे  आपल्याकडे आहे त्याचा आनंद घ्या. एखादे शुभकार्य ठरेल.

कन्या हातात जेव्हा चार पसे खुळखुळतात तेव्हा आपल्या वागण्या-बोलण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास येतो. तसा आत्मविश्वास आता तुमच्यामध्ये येईल. व्यापार-उद्योगात मात्र स्वप्नापेक्षा सत्याला जास्त महत्त्व असते हे विसरून चालणार नाही. नेहमीच्या कामाकडे दुर्लक्ष न करता नवीन काम हाताळा. नोकरीच्या ठिकाणी प्रत्येक कामामध्ये आपला पुढाकार असलाच पाहिजे असा आग्रह ठेवू नका. कामाची पद्धतशीर विभागणी करा. घरामध्ये तुमच्या वागण्या-बोलण्याला इतरांकडून चांगला प्रतिसाद मिळेल.

तूळ स्वप्न आणि सत्य यामध्ये फरक असतो हे प्रत्येकालाच माहीत असते. पण या आठवडय़ात मात्र तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता आटोकाट प्रयत्न कराल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना आकर्षति करण्याकरिता जाहिरात आणि प्रसिद्धी या माध्यमांचा वापर कराल. पशाची आवक वाढल्यामुळे केलेले कष्ट जाणवणार नाहीत. नोकरीच्या ठिकाणी  एखादी छोटी-मोठी मागणी पूर्ण करण्याकरिता वरिष्ठांचे मूड सांभाळाल. शुभ घटनेची नांदी झाल्यामुळे सर्वजण आनंदी असतील.

वृश्चिक योग्य संधी जेव्हा तुमच्या नजरेच्या टप्प्यात येते, त्या वेळी तुम्ही तिच्यावर तुटून पडता. या आठवडय़ात याचा तुम्हाला फायदा मिळेल. व्यापार-उद्योगात ज्यांनी पूर्वी तुम्हाला सहकार्य करायचे नाकारले होते त्यांच्याकडून तुम्हाला ग्रीन सिग्नल मिळेल. भागीदारी किंवा मत्री कराराचे प्रस्ताव पुढे येतील. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाच्या कामाकरिता तुमची निवड होईल. त्यातून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल. घरामध्ये मंगलकार्याची नांदी होण्याची शक्यता आहे.

धनू प्रकृती आणि मन:स्वास्थ्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या आठवडय़ात तब्येत सांभाळली तर तुम्ही बरेच काही करू शकाल. व्यापार-उद्योगात जे पसे तुम्हाला मिळणार आहे त्यावर समाधानी राहा. नोकरीच्या ठिकाणी कामाचा वेग वाढविण्याकरिता एखादा नवीन प्रयोग करावासा वाटेल, परंतु त्याचा फारसा उपयोग होणार नाही.  घरामध्ये सर्वजण त्यांच्या परीने तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतील.

मकर कोणतेच काम करताना तुम्ही घाई-गडबड करत नाही, पण या आठवडय़ामध्ये तुमचा प्रकार उलटा असेल. मनामध्ये आलेली एखादी गोष्ट पार पडेपर्यंत तुम्हाला चन पडणार नाही. व्यापार-उद्योगात आधुनिक तंत्रज्ञानाचा तुम्ही स्वीकार कराल. नोकरीच्या ठिकाणी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम हाताळण्याची संधी मिळेल. काही जणांना थोडय़ा अवधीकरिता परदेशी जाता येईल. घरामध्ये इतरांना तुम्ही तुमचा मुद्दा पटवून देण्यात सफल व्हाल. अत्यावश्यक फेरबदल किंवा दुरुस्त्या यासाठी हातात पसे ठेवा.

कुंभ इतर वेळेला प्रत्येक गोष्ट तुम्ही शांतपणे आणि पूर्ण नियोजन करून करता. पण या आठवडय़ामध्ये एखादी गोष्ट मनात आल्यानंतर ती ताबडतोब पार पडली पाहिजे असा तुमचा आग्रह असेल. व्यापार-उद्योगात महत्त्वाची कामे इतरांवर सोपवू नका. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही स्वत: चांगले काम कराल. पण इतरांवर अवलंबून राहिलात तर दुसऱ्यावर जो विसंबला त्याचा कार्यभागही संपला असा प्रकार होईल. घरामध्ये तुमच्या रागावर नियंत्रण ठेवले तर सर्व काही चांगले होईल.

मीन ग्रहमान परस्परविरोधी आहे. सहसा तुम्ही सभोवतालच्या व्यक्तींशी जास्त व्यवहाराने वागत नाही, पण या आठवडय़ात मात्र तुमचा पवित्रा ‘जशास तसे’ असा असेल. व्यापार-उद्योगात ज्या गिऱ्हाईकांकडून तुम्हाला काही मिळणार आहे त्यांच्याशी आपुलकीने वागाल. नोकरदार व्यक्तींच्या कामात सातत्य राहणार नाही. घरामध्ये तुम्हाला ज्या कामात मोठेपणा मिळणार आहे, त्यात लक्ष घालाल. काही जणांना प्रसिद्धीचे योग आहेत.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on July 14, 2017 1:01 am

Web Title: astrology from 14th to 20th july 2017