मेष परिस्थिती कशीही असो त्यामध्ये माघार न घेता ठरविलेले उद्दिष्ट पार पाडाल. व्यापार-उद्योगामध्ये एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने कमवायचे असा अनुभव येईल. एखादे अवघड काम तुम्ही मार्गी लावाल. नोकरीच्या ठिकाणी लाभदायक संधीकरिता वरिष्ठ तुमची निवड करतील. घरामध्ये छोटय़ामोठय़ा कारणांवरून इतरांशी तुमचे गरसमज होतील, पण तुम्ही शांत राहिलात तर सर्व काही ठीक होईल.

वृषभ वास्तविक पाहता एका विशिष्ट पद्धतीने काम चालू ठेवणे तुम्हाला आवडते. त्यात बदल झाला की तुम्ही गोंधळून जाता. आता परिस्थिती अशी आहे की तुम्हाला तुमचे धोरण लवचीक ठेवणे भाग पडेल. व्यापार-उद्योगात कुठूनतरी पसे मिळणार या आशेने तुम्ही नव्या दमाने कामाला लागाल. नोकरीच्या ठिकाणी स्वतहून जादाची जबाबदारी वाढवून घेऊ नका. घरात ज्यांनी तुम्हाला कमी लेखले होते त्यांना तुमचे महत्त्व पटेल.

मिथुन तुमच्या अवतीभोवती जी माणसे आहेत त्यांच्या बाबतीत व्यक्ती तितक्या प्रकृती असा अनुभव येईल. सगळ्यांशी जुळवून घेताना तुम्हाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. व्यापार-उद्योगात नवीन पद्धतीने काम सुरू करण्याकरिता जादा भांडवलाची आवश्यकता आहे. नोकरीमध्ये संस्थेच्या गरजेपोटी तुम्हाला एखादे नवीन तंत्रज्ञान शिकून घ्यावे लागेल. घरामधील कामाचा व्याप सांभाळता सांभाळता तुमची बरीच धावपळ होईल.

कर्क ग्रहमान तुमच्या स्वभावातील एक वेगळा कंगोरा दाखवल्याशिवाय राहणार नाही. कोणतेही काम करताना तुम्ही इतरांचा विचार करता, पण या आठवडय़ामध्ये ‘माझे तेच खरे’ असा तुमचा ठेका राहील. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना आकर्षति करण्याकरिता कामाची एखादी नवीन पद्धत तुम्ही अवलंबाल. त्याचा फायदा मिळण्याकरिता एक-दोन महिने थांबावे लागेल. नोकरीमध्ये एखादे प्रशिक्षण घेण्याकरिता वरिष्ठ तुमची निवड करतील.

सिंह ग्रहमान चांगले आहे. त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा हे तुम्हीच ठरवायचे आहे. कोणतेही वेडेवाकडे निर्णय न घेता आपल्या कामात कल्पकता दाखवा. व्यापारीवर्गाला बाजारातील बदलत्या परिस्थितीनुसार त्यांचे ध्येय किंवा धोरण बदलावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाच्या कामामध्ये वरिष्ठ तुम्हाला सहभागी करून घेतील. घरामध्ये तुमचा रागीट स्वभाव सोडला तर बाकी सर्व काही ठीक असेल.

कन्या मन आणि बुद्धी स्थिर ठेवून जर तुम्ही काम केलेत तर या आठवडय़ामध्ये एखाद्या अवघड प्रश्नावर मात करू शकाल. व्यापार-उद्योगात कामाचे प्रमाण थोडेसे कमी असेल.  एखादी कामाची पद्धत बदलून त्यामध्ये आधुनिकता आणण्याचा विचार कराल. नोकरीच्या ठिकाणी अवघड कामे हाताखालच्या व्यक्तीवर सोपवून द्याल. घरामध्ये तुमचे नियोजन सगळ्यांना उपयोगी पडेल. प्रकृतीकडे लक्ष द्या.

तूळ या आठवडय़ात तुमचे करिअर आणि तुमचे घर या दोन्ही आघाडय़ांवर तुम्हाला सक्रिय राहावे लागेल. पण त्यातल्या त्यात घरगुती कामांना जास्त प्राधान्य मिळेल. व्यापार-उद्योगामध्ये कामाचे प्रमाण थोडेसे कमी झाल्यासारखे वाटेल. परंतु पशाची आवक मात्र कमी होणार नाही. नोकरीच्या ठिकाणी शारीरिक मेहनतीची कामे तुम्हाला सहन होणार नाहीत. घरामध्ये छोटय़ा-मोठय़ा कारणावरून तुम्ही इतरांशी वाद घालाल.

वृश्चिक सप्ताहाच्या सुरुवातीला सर्व गोष्टी साध्या आणि सरळ वाटतील. पण जसजसे तुम्ही कामाला लागाल तसतशी त्यातली गुंतागुंत वाढलेली आहे असे लक्षात येईल. त्यातून बाहेर पडण्याकरिता तुम्हाला तुमचे डोके लढवावे लागेल. व्यापार-उद्योगातील कामाच्या निमित्ताने नवीन व्यक्तींशी परिचय होईल. नोकरीमध्ये जे काम तुम्ही कराल ते काम इतरांना जमणार नाही. त्यामुळे वरिष्ठांना तुमचे कौतुक वाटेल.

धनू जगामध्ये चिरकाल टिकणारी कोणतीच गोष्ट नाही. त्यामध्ये सतत बदल होत राहतात. याचा अनुभव तुम्हाला या आठवडय़ात येईल. व्यापार-उद्योगात ज्या व्यक्तींबरोबर तुम्ही बराच काळ काम केले होते त्यांच्याशी काही कारणाने हितसंबंध संपुष्टात येतील. पण हितचिंतकांच्या मदतीमुळे तुमचा तणाव कमी होईल. नोकरीच्या ठिकाणी नवीन काम आव्हानात्मक असेल. घरामध्ये एखाद्या प्रश्नावरून तुमचा राग उफाळून येईल.

मकर महत्त्वाचे ग्रह तुम्हाला अनुकूल आहेत. एखादे काम विनाकारण अडकून राहिले असेल तर त्या कामात जास्त विचार न करता मुसंडी मारायला हरकत नाही. पण आíथक धोका प्रमाणाबाहेर वाढवू नका. व्यापार-उद्योगातील सरकारी कामे आणि कोर्टव्यवहार एखाद्या मध्यस्थांच्या मदतीने पूर्ण करू शकाल. घरामधल्या एखाद्या सदस्याच्या बाबतीत तुम्ही घेतलेला निर्णय रामबाण ठरेल.

कुंभ तुमच्या बुद्धीला सतत एखादे खाद्य लागते ते मिळाले की तुम्ही खूश असता, असा योगायोग या आठवडय़ात चालून येईल. व्यापार-उद्योगात नवीन मशिनरी खरेदी करून आधुनिकीकरण करण्याकडे तुमचा कल राहील.  नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुमचा गरफायदा घेतील. घरामध्ये स्वत:चे महत्त्व वाढावे याकरिता  विशेष प्रयत्नशील राहाल. गरजू व्यक्तींना तुम्ही मदत कराल. जुन्या मित्राशी अचानक भेट होईल.

मीन प्रत्येक संधीचा तुम्हाला स्वत:च्या स्वार्थासाठी उपयोग करावासा वाटेल. या कामात तुमचे हितचिंतक तुम्हाला उपयोगी पडतील. व्यापार-उद्योगात चांगले काम होईल. नोकरीच्या ठिकाणी शॉर्टकट मिळण्यासाठी तुमच्या नेहमीच्या कार्यपद्धतीत थोडा बदल कराल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे घडावी या हेतूने तुम्ही सगळ्यांना खूश ठेवाल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com