28 January 2020

News Flash

राशिभविष्य : दि. १९ ते २५ जुलै २०१९

चंद्र-बुधाच्या केंद्रयोगामुळे आपले मत प्रभावीपणे व्यक्त करू शकाल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-बुधाच्या केंद्रयोगामुळे आपले मत प्रभावीपणे व्यक्त करू शकाल. भाषेतील प्रावीण्याची छाप उमटवाल. नोकरी-व्यवसायात अडचणी आल्या तरी काही लाभदायक घटना घडतील. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. सहकारी वर्गाकडून साहाय्य मिळेल. जोडीदार त्याच्या मित्रपरिवारासह वेळ आनंदात घालवेल. तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्या चोख पार पाडाल. कुटुंबात प्रेमळ, परंतु शिस्तीचे वातावरण राहील. डोकेदुखीचा त्रास अंगावर काढू नका.

वृषभ चंद्र-शुक्राच्या केंद्रयोगामुळे कौटुंबिक व गृहसौख्य चांगले लाभेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. कुटुंब सदस्यांना प्रवासयोग संभवतो. नोकरी-व्यवसायात हाती घेतलेली कामे विनाकारण रखडतील. सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. याची प्रचीती येईल. सहकारी वर्ग आपली स्थिती समजून घेईल. नवीन कॉन्ट्रॅक्ट्सवर काळजीपूर्वक सही करा. रक्तदाब, रक्ताभिसरणाच्या तक्रारींकडे मुळीच दुर्लक्ष नको.

मिथुन बुध-चंद्राच्या नवपंचम योगामुळे आपल्या चौकस बुद्धीला पुष्टी मिळेल. कठीण प्रसंगी हास्यविनोद पेरून ताण हलका कराल. नोकरी-व्यवसायात बऱ्याच प्रश्नांची उत्तरे शोधण्यात यश येईल. नवा विषय चटकन आत्मसात कराल. सहकारी वर्गाला मदतीचा हात पुढे कराल. गरजूंना आíथक साहाय्य कराल. जोडीदाराचे सगळे मुद्दे जरी पटले नाहीत तरी त्याचा ऊहापोह आत्ता नको. शब्दांवर ताबा ठेवा. एकमत असलेल्या गोष्टी अमलात आणा. तब्येत चांगली राहील.

कर्क चंद्र-हर्षलच्या लाभयोगामुळे लहरी, स्वच्छंदी व चंचल स्वभावाला जोड मिळेल. आवडत्या छंदासाठी वेळ राखून ठेवाल. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक! नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा दबाव सहन करावा लागेल. सहकारी वर्गाची विशेष साथ मिळणार नाही. जोडीदाराला त्याच्या अडचणीच्या वेळी योग्य सल्ला द्याल. एकमेकांना समजून घ्याल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. ओटीपोट, उत्सर्जन संस्था व त्वचा यांचे आरोग्य सांभाळा.

सिंह गुरू-चंद्राच्या केंद्रयोगामुळे परिस्थितीवर मात करून यश मिळवाल. नोकरी-व्यवसायात ज्येष्ठ वरिष्ठांच्या सहवासात राहणे लाभदायक ठरेल. सहकारी वर्ग अपेक्षित पािठबा देणार नाही. वरवरच्या स्तुतीला भुलू नका. जोडीदार आपले परखड मत मांडेल. तूर्तास फक्त ऐकून घेणे इष्ट! सहमत नसलात तरी विरोध दर्शवू नका. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. कुटुंब सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. आपले सांधे व मणक्याचे आरोग्य जपा.

कन्या लाभ स्थानातील रवी-बुधाच्या युती योगामुळे विद्याव्यासंग व बौद्धिक छंद जोपासाल. नोकरी-व्यवसायात नव्या गोष्टी, तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळेल. सहकारी वर्ग मदत करील. जोडीदाराच्या मनाप्रमाणे वागून दोघे आनंदी राहाल. कौटुंबिक समस्यांवर शांतपणे विचार करावा. रक्तदाबावर नियंत्रण ठेवा. झेपतील तेवढय़ाच जबाबदाऱ्या स्वीकारा.

तूळ चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे कार्यक्षेत्रात चांगली प्रगती होईल. आग्रही व निश्चयी भूमिका स्वीकाराल. सहकारी वर्ग आपल्यापाठी खंबीरपणे उभा राहील. जोडीदारासह संघर्षवाद नको. बारीकसारीक गोष्टींमध्ये जास्त लक्ष घालू नका. कुटुंबातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. नव्या करारावर सही करताना सर्व मुद्दे तपासून पाहावेत. कामासाठी लहान-मोठे प्रवास कराल. जिद्दीचे रूपांतर हट्टीपणात झाल्यास आरोग्य बिघडवून घ्याल.

वृश्चिक मंगळ व गुरू या दोन बलवान पुरुष ग्रहांच्या नवपंचम योगामुळे महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आगेकूच कराल. सामाजिक दर्जा व मानसन्मान मिळेल. नोकरी-व्यवसायात सहकारी वर्गाचे नेतृत्व कराल. वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. त्याच्या योग्य मार्गदर्शनामुळे आपली प्रगती साधाल. जोडीदारासह झालेले गरसमज लवकर मिटवा. मोकळेपणाने चर्चा करा. एकमेकांचे मुद्दे कमीत कमी ऐकून तरी घ्याल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. आरोग्य चांगले राहील.

धनू शुक्र-नेपच्यूनच्या नवपंचम योगामुळे कलेच्या क्षेत्रात प्रगती कराल. नवनिर्मितीसाठी अंतस्फूर्ती मिळेल. नोकरी-व्यवसायात कलागुणांना व्यवहाराची जोड द्याल. सहकारी वर्गाला आवश्यक ती मदत कराल. जाणकारांचे अनुभव लाभदायक ठरतील. जोडीदाराच्या कलेने घ्यावे लागेल. अन्यथा छोटय़ा गोष्टींना उगाच मोठे रूप येईल. सांभाळून घ्या. कौटुंबिक वातावरण धावपळीचे जाईल. मूतखडा, युरीन इन्फेक्शन यासाठी वैद्यकीय सल्ला घ्या.

मकर रवी-चंद्राच्या षडाष्टक योगामुळे मनात प्रेम असले तरी आचरण कणखर व शिस्तीचे असेल. नोकरी-व्यवसायात आपले अधिकार संघर्ष करून मिळवावे लागतील. सहकारी वर्ग आपली साथ देईल. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या भेटीगाठी होतील. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रातील अडचणींशी सामना करावा लागेल. आपण या विषयावर चर्चा करून ताण हलका कराल. आश्वासक आधार द्याल. कफविकार व वातविकार बळावतील. वैद्यकीय सल्ला घ्या.

कुंभ चंद्र-नेपच्यूनच्या युती योगामुळे विचारचक्र सतत चालू राहील. बौद्धिक राशीतील या युतीमुळे नव्या संकल्पना जन्माला येतील. कलात्मक दृष्टिकोनात वाढ होईल. नोकरी-व्यवसायात याचा लाभ होईल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. सहकारी वर्गाला आपल्या मदतीची गरज भासेल. मोठय़ा मनाने आपण याची तयारी दाखवाल. जोडीदाराने आपले म्हणणे ऐकून घेतले नाही तरी निराश होऊ नका. छाती, बरगडय़ा, कफ यांच्या तक्रारी उद्भवतील.

मीन बुध-शुक्राच्या युती योगामुळे आपल्या बौद्धिक आवडी जोपासाल. वागण्या-बोलण्यात सहजता वाढेल. नोकरी-व्यवसायात इतरांना समजून घेऊन नवा विषय मांडाल. सहकारी वर्ग सबबी सांगून काम टाळायचा प्रयत्न करील. जोडीदारासाठी वेळ राखून ठेवणे कठीण! कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. ताणतणावामुळे पोट बिघडण्याची शक्यता!

First Published on July 19, 2019 1:01 am

Web Title: astrology from 19th to 25th july 2019
Next Stories
1 राशिभविष्य : दि. १२ ते १८ जुलै २०१९
2 राशिभविष्य : दि. ५ ते ११ जुलै २०१९
3 राशिभविष्य : दि. २८ जून ते ४ जुलै २०१९
Just Now!
X