16 February 2019

News Flash

भविष्य : दि. १ ते ७ जून २०१८

व्यापारउद्योगात ज्यांनी मदतीचे आश्वासन दिले होते ते शब्द फिरवतील.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com
मेष व्यापारउद्योगात ज्यांनी मदतीचे आश्वासन दिले होते ते शब्द फिरवतील. पशाचा योग्य कारणासाठी वापर करा. वरिष्ठांना शब्द देण्यापूर्वी त्यातील जबाबदारीचा अंदाज घ्या. प्रत्येक काम काळजीपूर्वक तपासून बघा. घरामध्ये एखादे कार्य ठरविले असेल तर त्याची धुरा तुम्हाला स्वीकारावी लागेल. नव्या वास्तूमध्ये राहायला जायचे योग संभवतात. महत्त्वाची कामे सप्ताहाच्या सुरुवातीला करा. सप्ताहाच्या मध्यात अपेक्षित पसे मिळतील.

वृषभ तुमच्यापुढचे प्रश्न सोडविण्याकरिता हितचिंतक उपयोगी पडतील. व्यापारउद्योगात ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून आहात त्यांच्याकडून साथ मिळणार नाही. पण इतर मार्गाने मदत मिळाल्याने तुमचे मनोधर्य वाढेल. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामाचा पूर्वी कंटाळा केला होता त्याचा उपयोग होईल. सहकाऱ्यांवर जास्त विसंबून राहू नका. बेकार व्यक्तींनी योग्य तो निर्णय ताबडतोब घ्यावा.  बुजुर्ग व्यक्तींचा सल्ला धुडकावून लावू नका.

मिथुन ग्रहमान सकृतदर्शनी चांगले आहे. पण ‘दिसते तसे नसते’ याचा अनुभव येईल. व्यापार उद्योगात तुमचा धोका उगीचच वाढवून घेऊ नका. नोकरीमध्ये वरिष्ठ चालू असलेले काम अचानक थांबवतील. त्यामुळे तुमचा गोंधळ उडेल. सोप्या कामात बराच वेळ गेल्यामुळे तुमचे बेत रद्द करावे लागतील. घरामधे तुमचा सल्ला योग्य असूनही इतरांना तो लगेच पटणार नाही. त्याचा राग मानू नका. सप्ताहाच्या मध्यानंतर पशाची कामे होतील.

कर्क ग्रहमान खट्टामीठा अशा स्वरूपाचे आहे. निराशा संपली तरी नाराजी असेल.  जिथे खूप अपेक्षा ठेवल्या होत्या तिथे विलंब होण्याची शक्यता आहे. व्यापार उद्योगात गिऱ्हाइकांची ये-जा चांगली असल्यामुळे अपेक्षेनुसार पसे मिळतील. काही जुनी देणी देणे शक्य होईल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल. पण त्यांच्या कलाने वागावे लागेल. घरामधे प्रिय व्यक्ती जवळपास नसल्यामुळे चुकल्या चुकल्यासारखे होईल.

सिंह एकाच वेळी अनेक कामे करण्याचा तुम्हाला मोह होईल. त्यामुळे आठवडा गेला कसा हे समजणार नाही. व्यापार उद्योगातील पशाचे कामामध्ये गोंधळ करू नका. अनोळखी व्यक्तींवर एकदम विश्वास ठेवू नका. नोकरीच्या ठिकाणी सहकारी आश्वासन पाळू शकणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला बेत बदलावे लागतील. घरामध्ये छोटया-मोठया कारणावरून इतरांशी दुरावा निर्माण होईल. जवळची व्यक्ती दूर गेल्याने चुकल्यासारखे वाटेल.

कन्या चार पसे मिळणार या आशेने तुम्हाला खूप आनंद होईल. भरपूर काम करण्याची तुमची तयारी असेल. परंतु तुमच्या मदतीला कोणीच नसल्यामुळे तुमचे कष्ट प्रमाणाबाहेर वाढतील. व्यापारउद्योगात रोजच्या कामातून चांगले पसे मिळेल. नोकरीत तुम्हाला मिळणारे फायदे पाहून सहकाऱ्यांच्या मनात असूया निर्माण होईल. त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवू नका घरामध्ये मुलांच्या करियरविषयी उलटसुलट चर्चा होईल.

तूळ व्यापार उद्योगात काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याची तुमची इच्छा असेल. बराच काळ चाललेले काम बंद करून त्याऐवजी दुसरे काम करावेसे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ परवानगी देतील असे गृहीत धरून कोणतेही काम परस्पर करू नका नाहीतर त्यांना राग येईल. घरामध्ये मोठया व्यक्तींशी बोलताना त्यांचा अपमान होणार नाही हे लक्षात ठेवा. प्रिय व्यक्ती लांब गेल्याने एकटे पडल्यासारखे वाटेल.

वृश्चिक माणसे एखाद्या निमित्ताने जीवनात येतात आणि लांब जातात असा अनुभव येईल. व्यापार उद्योगातील महत्त्वाच्या कामासंबंधी बोलणी सप्ताहाच्या सुरुवातीलाच करा. त्याविषयी निष्णात व्यक्तींशी चर्चा करून मग निर्णय घ्या. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ सांगतात ते नीट ऐका नाही तर  गोंधळ होईल. घरामध्ये जोडीदाराशी क्षुल्लक कारणावरून दुरावा निर्माण होईल. त्यातून मोठा निष्कर्ष काढू नका. तब्येतीकडे लक्ष ठेवा.

धनू एक चांगले तर एक वाईट तुमच्या वाटय़ाला येणार आहे. तुमच्या करियरमधल्या कामाला हळूहळू तुम्ही गती दयाल. पण घरामध्ये मात्र तुमचे इतरांपुढे काहीच चालणार नाही. व्यापारी वर्गाला आठवडयाची सुरुवात चांगली होईल. पूर्वी केलेल्या कामाचे पसे हातात पडतील. नोकरीच्या ठिकाणी नेहमीच्या कामामधे गोंधळ होण्याची शक्यता आहे. घरामधे छोटया-मोठया कारणावरून तुमचा अहं दुखावला जाईल.

मकर कधी कधी आपली वाटणारी माणसे लांब जातात असा अनुभव या आठवडयात येईल. व्यापारउद्योगात बदलत्या वातावरणात काम करायला लागेल.  नोकरीच्या ठिकाणी एखादे काम तुम्हाला समजले नाहीतर वरिष्ठांकडून ते समजून घ्या.  नोकरी बदलताना घाईगडबड करू नका. घरामध्ये मोठया व्यक्तींचा सल्ला तुम्हाला पटणार नाही. त्यावरून थोडेफार वादविवाद होतील. प्रिय व्यक्तींची अनुपस्थिती जाणवेल.

कुंभ व्यापार उद्योगात सावध धोरण ठेवा.  अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. सप्ताहाचा मध्य तुम्हाला लाभदायक ठरेल. नोकरीत ज्या कामाचा तुम्ही कंटाळा केला होता तेच काम करावे लागेल. पण एकदा कामाला लागल्यानंतर तुमचा उत्साह वाढेल. बेकार व्यक्तींनी संधीचा फायदा घ्यावा. घरामध्ये एखाद्या प्रश्नावरून मोठया व्यक्तींशी तात्त्विक मतभेद होतील. तुम्ही कोणतेही टोकाचे निर्णय घेवू नका. प्रिय व्यक्तींपासून थोडा दुरावा निर्माण होईल.

मीन कधी कधी आपले अंदाज फसतात.  या आठवडय़ामध्ये असे होणे शक्य आहे. ते टाळण्यासाठी हितचिंतकाचा सल्ला घ्या. आठवडयाची सुरुवात चांगली झाल्याने तुम्हाला हुरूप येईल. पसे वसूल करताना कोणाशीही हुज्जत घालू नका. नोकरीच्या ठिकाणी प्रत्येक काम काळजीपूर्वक करा. घरामध्ये मोठया व्यक्तीची मते तुम्हाला न पटल्यामुळे दुरावा निर्माण होईल. पण त्यांचे ऐकणे हितावह ठरेल.

First Published on June 1, 2018 1:01 am

Web Title: astrology from 1st to 7th june 2018