08 July 2020

News Flash

राशिभविष्य : दि. १ ते ७ नोव्हेंबर

जोडीदारासह थोडे जुळवून घ्यावे लागेल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-हर्षलच्या नवपंचम योगामुळे बौद्धिक प्रगती कराल. साहसी निर्णय घेताना त्याच्या परिणामांची जबाबदारीदेखील स्वीकाराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या सल्ल्याने पुढे जाल. सहकारी वर्गाकडून हर प्रकारची मदत मिळेल. जोडीदारासह थोडे जुळवून घ्यावे लागेल. वाद टाळावेत. पचन संस्था सांभाळा.

वृषभ एकमेकांना पूरक असलेल्या चंद्र व शुक्र या दोन ग्रहांच्या केंद्र योगामुळे कलेच्या क्षेत्रात रस घ्याल. फक्त व्यवहार न बघता भावनांचीही कदर कराल. हाती घेतलेले काम योजनाबद्ध करून पूर्णत्वास न्याल. नोकरी-व्यवसायात कष्टाचे चीज होईल. मणका व उत्सर्जन संस्थेचे आरोग्य सांभाळावे.

मिथुन रवी-चंद्राच्या लाभ योगामुळे मानसिक संघर्ष कमी होईल. अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडेल. नोकरी-व्यवसायात आशादायी वातावरण असेल. सहकारी वर्गावर अवलंबून राहू नका. काही कामे जातीने लक्ष देऊन करून घ्यावी लागतील. जोडीदारासह वाद घालू नका. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. अपचन टाळा.

कर्क चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे एकंदरीत ऊर्जा शक्ती वाढेल. जोमाने कार्य कराल. वरिष्ठांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नवे करार मान्य कराल. सहकारी वर्ग, मित्रमंडळी, नातेवाईकांकडून साहाय्य मिळेल. जोडीदाराची परिस्थिती समजून घ्या. अपचन व वातविकार सतावतील.

सिंह चंद्र-नेपच्यूनच्या लाभ योगामुळे कलात्मकतेमध्ये वाढ होईल. नव्या संकल्पना सुचतील. नोकरी-व्यवसायात व्यावसायिक नातेसंबंधही जपाल. नवे करार, नवी नोकरी स्वीकारताना योग्य दक्षता घ्यावी. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात अडचणींशी सामना करावा लागेल. रक्ताभिसरण संस्थेचे प्रश्न उद्भवतील.

कन्या चंद्र-शुक्राच्या लाभयोगामुळे एखाद्या गोष्टीतील सौंदर्य जाणाल. कल्पकतेने विचार करून आपले मुद्दे मांडाल. स्पष्टवक्तेपणाचा योग्य वापर कराल. नोकरी-व्यवसायात कायद्याच्या भाषेचा आधार घ्याल. जोडीदारासह एकत्रितपणे लहान-मोठे प्रवास कराल.

तूळ चंद्र-गुरूच्या लाभ योगामुळे सत्शील, आनंदी जीवन जगाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. सहकारी वर्गाकडून योग्य मदत मिळेल. जोडीदाराच्या विचारांना विरोध न करता त्याचे म्हणणे ऐकून घ्याल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. श्वसन व उत्सर्जन संस्थेसंबंधित आजार बळावतील.

वृश्चिक बुध-चंद्राच्या केंद्र योगामुळे व्यवहारचातुर्याने वागाल. मानसिक व बौद्धिक शक्ती वाढेल. मनाचा समतोल राखाल. नोकरी-व्यवसायात कामगिरी फत्ते कराल. समयसूचकतेमुळे अडचणींवर मात कराल. सहकारी वर्गाबरोबर मतभिन्नता दिसून येईल. सध्या आवाज न उठवता धीर धरा. जोडीदाराची योग्य साथ लाभेल. पित्त व अपचनाचा त्रास होईल.

धनू चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे शारीरिक ऊर्जा वाढेल. भावनांवर ताबा ठेवा. नोकरी-व्यवसायात मनाविरुद्ध गोष्टी घडल्याने अस्वस्थता वाढेल. जोडीदाराच्या मन:स्थितीचा अंदाज घेऊन आपला मुद्दा मांडावा. फार ताणू नये. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याचा प्रयत्न कराल. पथ्य पाळावे.

मकर चंद्र-बुधाच्या केंद्र योगामुळे मानसिक चंचलता वाढेल. आचार व विचार यांतील तफावत कमी करण्याचा प्रयत्न कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मताप्रमाणे वागावे लागेल. जोडीदारासह वेळ आनंदात जाईल. अशक्तपणा वाटल्यास रक्ततपासणी करून घ्यावी.

कुंभ शनी-चंद्राच्या लाभ योगामुळे किचकट कामे करावी लागतील. अशा कामांमध्ये सातत्य राखाल. नोकरी-व्यवसायात नियमानुसार आगेकूच कराल. भावनिक गुंतवणूक न करता कर्तव्य पार पाडाल. ज्येष्ठ वरिष्ठांचे योग्य मार्गदर्शन लाभेल. सहकारी वर्गाच्या समस्या व्यवस्थापकांपुढे मांडाल. मित्रमंडळींच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न कराल. डोकेदुखी व सायनसचा त्रास बळावेल.

मीन शनी-चंद्राच्या युती योगामुळे अनेक अडचणींवर मात करून पुढे जावे लागेल. शब्द जपून वापरा. नोकरी-व्यवसायात कष्टाचे चीज होईल. पण संयम आवश्यक. सहकारी वर्गाकडून मदतीची अपेक्षा ठेवू नका. नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने कराल. पाठीचा मणका व रक्तदाब याची काळजी घ्यावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 1:01 am

Web Title: astrology from 1st to 7th november 2019 zws 70
Next Stories
1 राशिभविष्य : दि. ११ ते १७ ऑक्टोबर २०१९
2 राशिभविष्य : दि. ४ ते १० ऑक्टोबर २०१९
3 राशिभविष्य : दि. २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०१९
Just Now!
X