25 March 2019

News Flash

दि. २ ते ८ मार्च २०१८

कोणत्याही आघाडीवर बेसावध राहून चालणार नाही.

मेष ज्या व्यक्तीवर तुम्ही मदतीकरिता अवलंबून आहात त्यांची काही तरी अडचण निघाल्याने एखादे काम तुम्हालाच मार्गी लावावे लागेल. व्यापार-उद्योगात तुमची इच्छा नसतानाही काही खर्च तुम्हाला करणे भाग पडेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाव्यतिरिक्त एखादे वेगळे काम तुम्हाला हाताळावे लागेल. घरामध्ये महत्त्वाचा आणि मोठा कार्यक्रम ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी पशाची तरतूद करावी लागेल.

वृषभ  संथ वाटणाऱ्या पाण्यात खडा पडल्यानंतर जसे तरंग उमटतात तशी तुमची स्थिती होणार आहे. कोणत्याही आघाडीवर बेसावध राहून चालणार नाही. व्यवसाय-धंद्यात पशाची गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचा खरोखर उपयोग होणार आहे का, असा प्रश्न स्वत:च्या मनाला विचारा. नोकरीच्या ठिकाणी जे काम व्यवस्थितपणे चालले आहे, त्या कामात वरिष्ठ विनाकारण फेरफार करतील.  घरामध्ये जोडीदाराशी रुसवेफुगवे होतील.

मिथुन इतरांना काय वाटते याची पर्वा न करता तुम्ही ठरविलेले काम पूर्ण कराल. त्यामुळे एक प्रकारचे आंतरिक समाधान लाभेल. व्यापारातील महत्त्वाचे सौदे होतील. त्यामुळे तुम्ही प्रतिस्पध्र्यावर मात करू शकाल. आíथक लाभ वाढण्याची शक्यता निर्माण होईल. नोकरीच्या ठिकाणी जे काम इतरांना जमले नाही ते काम तुम्ही पूर्ण करून दाखवाल. घरामधल्या प्रत्येक कामात तुमचा पुढाकार असेल. तुमची कॉलर ताठ होईल.

कर्क तुमच्या राशीत नेतृत्वगुण ठासून भरलेले आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणी एखादी जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाते. या आठवडय़ात तुम्हाला असाच अनुभव येईल. व्यापार-उद्योगात ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ असा अनुभव येईल. कोणावरही असे अवलंबून न राहता तुम्ही तुमचे काम नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडा.  नोकरीमध्ये आठवडा प्रचंड धावपळीत जाईल.  घरामध्ये तुमची चौकशी कोणीच करणार नाही.

सिंह ग्रहमान तुम्हाला उत्साह देणारे आहे. जी कामे काही कारणाने लांबलेली होती त्याला आता धक्का स्टार्ट या पद्धतीने गती द्याल. व्यापार-उद्योगात नवीन कामे स्वीकारण्याची घाई करू नका. त्याऐवजी हातातली कामे वेळेत पूर्ण करा. खेळत्या भांडवलाची थोडीशी चणचण जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या अपेक्षा तुमच्याकडून वाढतील.  घरामध्ये एखाद्या तात्त्विक मुद्दय़ावरून इतरांशी तुम्ही वादविवाद घालाल.

कन्या एखादे काम पूर्ण करण्याकरिता जे धाडस आवश्यक असते ते तुमच्यामध्ये नसते, पण या आठवडय़ामध्ये हाती घ्याल ते तडीस न्याल असा तुमचा बाणा असेल. व्यापार-उद्योगात एखादे कर्ज प्रकरण लांबले असेल तर त्याला सप्ताहाच्या मध्यात वेग येईल. नवीन कामसुद्धा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाचा व्याप जरी वाढला तरी त्यातून तुमचा फायदा असल्यामुळे तुम्ही कंटाळा करणार नाही.

तूळ ग्रहमान उलटसुलट आहे. ज्या कामाची तुम्हाला घाई आहे ते काम लांबेल. याउलट जे काम तुम्हाला नको आहे त्या कामाला गती येईल. व्यापार-उद्योगात आठवडय़ाच्या सुरुवातीला काही देणी द्यावी लागतील, परंतु तुम्ही जसजसे कामाला लागाल तसतसे पसे मिळाल्याने तुम्हाला बरे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी जो काम करतो त्याच्याच वाटय़ाला काम येते असा अनुभव येईल.  घरामध्ये प्रत्येक जण आपापल्या कामात गर्क असेल.

वृश्चिक प्रयत्नांना जेव्हा नशिबाची साथ लाभते त्या वेळेला आपले कष्ट कमी होतात आणि मिळणारे यश जास्त असते. असा सुखद धक्का तुम्हाला या आठवडय़ात बसणार आहे. व्यापार-उद्योगात ‘सबसे बडा रुपय्या’ हे तुमचे ध्येय असेल. सप्ताहाची सुरुवात आणि सप्ताहाचा शेवट आíथक प्राप्तीच्या दृष्टीने चांगला ठरेल. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठ त्यांच्या पद्धतीने काम करण्याचे स्वातंत्र्य देतील. घरामध्ये प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे घडेल.

धनू ज्या कामामध्ये विनाकारण शिथिलता आली होती त्या कामाला आता गती द्याल. व्यापार-उद्योगात हातातील पशाचा योग्य कारणाकरिता उपयोग करा. भांडवल वाढण्याकरिता बँक किंवा इतर मार्गाने कर्ज उभे करावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाच्या स्वरूपात थोडे बदल होतील, पण काम करत राहा. बेकार व्यक्तींनी नवीन नोकरीसाठी तडजोड करावी. घरामधल्या एखाद्या  प्रसंगामुळे तुमच्या रागाचा पारा वर जाईल.

मकर या आठवडय़ामध्ये तुमचा काम करण्याचा उत्साह अपूर्व असेल. अपेक्षित व्यक्तींकडून साथ मिळाली नाही तरी तुम्ही थांबून राहणार नाही. व्यापार-उद्योगात जादा भांडवलाची गरज भासेल. नोकरीच्या ठिकाणी जो काम करतो त्याच्याच मागे काम लागते असा अनुभव येईल. घरामध्ये एखाद्या कामात तुम्हाला गृहीत धरले जाईल, पण वेळेअभावी तुम्ही त्यात लक्ष घालू शकणार नाही. आठवडय़ाच्या शेवटी अनपेक्षित खर्च उद्भवेल.

कुंभ आíथकदृष्टय़ा हे सर्व ग्रहमान तुम्हाला अनुकूल आहे. त्यामुळे खूप काम करून चार पसे शिल्लक ठेवावेत असे वाटेल. व्यापार-उद्योगात आठवडय़ाची सुरुवात थोडीशी खर्चीक होईल. जोडधंद्यातून थोडे पसे कमविता येतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचा वेग आणि कार्यक्षमता उत्तम राहील. एखादे अवघड काम तुम्ही फत्ते करून दाखवाल. घरामध्ये मात्र ‘माझे तेच खरे’ असा तुमचा दृष्टिकोन राहील.

मीन ग्रहमान तुमची जिद्द वाढविणारे आहे. कोणत्याही प्रश्नापुढे हार न मानता ते काम तुम्ही उत्साहाने पूर्ण कराल. व्यापार-उद्योगात भरपूर काम असल्यामुळे तुम्हाला घडय़ाळाच्या काटय़ानुसार काम करावे लागेल. नोकरी ठिकाणी जोखमीचे काम तुमच्यावर सोपविले जाईल. काही जणांना बदली स्वीकारावी लागेल. घरामध्ये छोटय़ामोठय़ा गोष्टींत तुमची मानापमानाची भावना आड येईल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on March 2, 2018 1:01 am

Web Title: astrology from 2 to 8 march 2018