News Flash

भविष्य : दि. २० ते २६ एप्रिल २०१८

ज्या कामात अडथळे येत होते, त्यामध्ये आता तुम्ही जातीने लक्ष घालाल.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com
मेष ज्या कामात अडथळे येत होते, त्यामध्ये आता तुम्ही जातीने लक्ष घालाल. व्यापारउद्योगातील एखादे महत्त्वाचे प्रोजेक्ट हातात घ्यावेसे वाटेल. त्याची पूर्वतयारी करून ठेवाल. नोकरीमध्ये वरिष्ठांची तुमच्यावर भिस्त असल्याने तुम्हाला खूप काम करावे लागेल. एखाद्या कामानिमित्त खास सवलतीकरिता तुमची निवड होईल. घरामध्ये महत्त्वाचे निर्णय तुमच्यावर सोपवून बाकी सर्वजण निर्धास्त राहतील.

वृषभ मानलं तर समाधान अशी तुमची स्थिती आहे. जे आपल्याजवळ नाही त्याचा विचार न करता जे आपल्याजवळ आहे त्याचा फायदा उठवा. व्यापारउद्योगात बाजारातील बदलांकडे बारकाईने लक्ष असू द्या. वारा वाहील तशी पाठ फिरवण्याचे धोरण ठेवा. नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी तुलना करून दुखी न होता आपले काम काटेकोरपणे करा. घरामध्ये तुमच्या आवडीचा एखादा बेत ठरेल.

मिथुन तुमची रास द्विस्वभावी रास आहे. या आठवडय़ात विचार आणि कृतीत समन्वय राखलात तर तुम्ही तुमचे चांगले काम करू शकाल. व्यापारउद्योगात आठवडय़ाची सुरुवात धनलाभाने होईल. नोकरीच्या ठिकाणी नियोजनबद्ध कामाचा बराच उपयोग होईल. नोकरीतले बदल शक्यतो टाळा. घरामध्ये तुमचा सल्ला इतरांना उपयोगी पडेल. छोटी मोठी दुरुस्ती किंवा डागडुजी यात पसे खर्च कराल.

कर्क तुमच्या जिद्दी आणि महत्त्वाकांक्षी स्वभावाला खतपाणी घालणारे हे ग्रहमान आहे. एखादी गोष्ट सहजगत्या पार पडत नाही असे पाहून तुम्ही त्याच्या मागे हात धुऊन लागाल. व्यापारउद्योगात ज्या व्यक्तींनी तुम्हाला विरोध केला होता, त्यांच्याशी मत्रीचा हात पुढे कराल. पशाची आवक व्यवस्थित असल्यामुळे एखादे धाडस करावेसे वाटेल. बेकार व्यक्तींना नोकरी मिळेल. घरामध्ये सगळ्यांना पसंत असणारी एखादी कामगिरी तुमच्या हातून घडेल.

सिंह ग्रहमान संमिश्र आहे. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. कोणतेही काम इतरांवर न सोपवता त्यामध्ये स्वत: जातीने लक्ष घाला. व्यापारउद्योगात कामाचा व्याप वाढत जाईल. एखादी नवीन ऑर्डर मिळेल. बेकार व्यक्तींना बऱ्याच कष्टानंतर काम करण्याची शक्यता आहे. चालू नोकरीत यश मिळेल. तुमचा कामाचा दर्जा उत्तम राहील. घरामध्ये एखाद्या मोठय़ा व्यक्तीकडून एखादी भेटवस्तू मिळेल.

कन्या बहुतेक कामे तुम्हाला चांगली जमतात, पण शारीरिक कामात तुम्ही कमी पडता. या आठवडय़ात प्रत्येक काम स्वत: न करता टीमवर्कवर विश्वास ठेवा. व्यवसायउद्योगात जागेचे स्थलांतर होण्याची शक्यता आहे. काळाची गरज म्हणून तुम्हाला नवीन तंत्रज्ञान शिकून घ्यावेसे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी जे काम इतरांना जमले नाही ते तुम्हालाच करावे लागेल. बदली हवी आहे त्यांनी प्रयत्न करावेत. घरामध्ये एखादी शुभवार्ता समजेल.

तूळ ग्रहमान तुमचा उत्साह वाढविणारे आहे. ज्या कामामध्ये पूर्वी निराशा आली होती ते काम हातात घेऊन पूर्ण करण्याची तुमची इच्छा असेल. व्यापारउद्योगात एखादी नवीन कल्पना अमलात आणायचे ठरवाल. नोकरीच्या ठिकाणी वेगळ्या प्रोजेक्टकरिता कदाचित तुमची निवड होण्याची शक्यता आहे. त्याकरिता संस्थेकडून वेगळे प्रशिक्षण दिले जाईल. घरामध्ये जोडीदाराचे हट्ट पुरवाल. बुजूर्ग व्यक्तींकडून सहकार्य लाभेल.

वृश्चिक ग्रहमान तुमच्या संधिसाधू वृत्तीला पूरक आहे. जसा माणूस आणि परिस्थिती असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमचे धोरण बदला. या आठवडय़ामध्ये अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याकडे लक्ष असेल. व्यापारउद्योगात नवीन व्यक्तींची ओळख विशेष उपयोगी पडेल. नोकरीच्या ठिकाणी संस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी कामे वरिष्ठ विश्वासाने तुमच्यावर सोपवतील. घरामध्ये कोणाशी गरसमज झाले असतील तर समेट घडेल.

धनू असे म्हणतात की केलेले काम कधीही वाया जात नाही, याचा प्रत्यय या आठवडय़ात येईल. व्यापार-उद्योगात एखादी नवीन योजना तुमचा उत्साह वाढवेल. मात्र त्यामध्ये किती गुंतवणूक करायची यासंबंधी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. ज्यांना नोकरीत बदल करायचा आहे, त्यांनी गुप्तपणे त्याची माहिती काढावी. घरामध्ये तुम्ही तुमचा शब्द खरा करून दाखवाल. ही गोष्ट कष्टदायक पण खर्चाची असणार आहे.

मकर शनी हा ग्रह तुमच्या राशीचा अधिपती असल्यामुळे सतत उद्योगात राहणारी तुमची रास आहे. त्यातूनच तुम्हाला नवनवीन कल्पना सुचतात. या आठवडय़ात काहीतरी वेगळे आणि भव्यदिव्य करावे ही संवेदना तुम्हाला शांत बसू देणार नाही.  नोकरदार व्यक्तींना जशी गरज असेल त्याप्रमाणे आपले धोरण ठेवावे लागेल. त्यात नाइलाजाचा भाग जास्त असेल. घरामध्ये तुमचा सल्ला इतरांना आवडेल. मात्र अंमलबजावणी खर्चीक असेल.

कुंभ पेरल्याशिवाय उगवत नाही या म्हणीची आठवण करून देणारे ग्रहमान आहे. एखादे अवघड काम तुम्हाला या आठवडय़ात करावे लागेल. पण काम झाल्यानंतर तुम्ही कष्ट विसरून जाल. व्यापारउद्योगात तुमचा बराचसा वेळ लांबवलेली कामे पूर्ण करण्यात जाईल. हातात असलेले पसे राखून ठेवा. नोकरीच्या ठिकाणी जो काम करतो त्यालाच काम करावे लागते असा अनुभव आल्यामुळे तुमची थोडीशी चिडचिड होईल.

मीन आठवडय़ाच्या सुरुवातीला तुमचा उत्साह अपूर्व असेल. प्रत्येक काम वेळेत करण्याचा तुमचा इरादा असेल व्यापारउद्योगात अपेक्षित पसे हातात पडल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. ज्यांचा छोटा व्यवसाय आहे त्यांना एखादे अवघड काम मिळेल. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार करतील. घरामधल्या मोठय़ा व्यक्ती तुम्हाला मानसिक आधार देतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 1:02 am

Web Title: astrology from 20th to 26th april 2018
Next Stories
1 भविष्य : दि. १३ ते १९ एप्रिल २०१८
2 भविष्य : दि. ६ ते १२ एप्रिल २०१८
3 भविष्य : दि. ३० मार्च ते ५ एप्रिल २०१८
Just Now!
X