News Flash

भविष्य : दि. २४ ते ३० ऑगस्ट २०१८

कोणतेही काम छोटय़ा प्रमाणात केलेले तुम्हाला आवडत नाही.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com
मेष कोणतेही काम छोटय़ा प्रमाणात केलेले तुम्हाला आवडत नाही. त्यातून स्वत:ची प्रतिमा उजळली पाहिजे असा तुमचा आग्रह असतो. या आठवडय़ात तुमच्या या दोन्ही इच्छा पूर्ण होतील. व्यापार-उद्योगात एखाद्या नवीन योजनेचा श्रीगणेशा होईल. तुमचे प्रयत्न आणि नशीब या दोन्हीची साथ लाभल्यामुळे अवघड कामात मुसंडी माराल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये आवडत्या व्यक्तींबरोबर छान कार्यक्रम ठरवाल.

वृषभ जे काम अगदी शेवटच्या टप्प्यात आले होते आणि थांबून राहिले होते त्या कामाला गती मिळाल्यामुळे तुमचा जीव भांडय़ात पडेल. व्यापार-उद्योगातील काही कामे पूर्ण करण्यासाठी मध्यस्थांची मदत घेणे भाग पडेल. सप्ताहाच्या मध्यात अपेक्षित पसे हाती पडतील. घरामध्ये तुमचा स्वार्थ साधण्यासाठी तुम्हाला सगळ्यांची खुशामत करावी लागेल. लांबच्या नातेवाईकांशी भेटीमुळे आठवडय़ाचे वेगळेपण जाणवेल.

मिथुन काही प्रश्न पुन्हा एकदा नव्याने डोके वर काढण्याची शक्यता आहे. पण या वेळी त्याच्यामुळे होणाऱ्या बऱ्यावाईट परिणामांना स्वीकारायला तुम्ही तयार असणार आहात. व्यापारउद्योगात एखाद्या नवीन मार्गाने पसे मिळवण्याचा मार्ग तुमच्या दृष्टिक्षेपात येईल. नोकरीमध्ये मात्र वरिष्ठ तुमच्या अडचणी कळूनसुद्धा तुम्हाला सवलत द्यायला तयार होणार नाहीत. घरामध्ये भांडय़ाला भांडे लागेल. प्रकृतीच्या बाबतीत विशेष जागरूक राहणे आवश्यक आहे.

कर्क या आठवडय़ात तुम्हाला तुमचे घर आणि नोकरी-व्यवसाय व दोन्ही आघाडय़ांकडे लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे कामाचे योग्य नियोजन महत्त्वाचे ठरेल. व्यापार-उद्योगात महत्त्वाची कामे सप्ताहाच्या मध्यात पार पडतील. नोकरीमध्ये अर्धवट राहिलेले काम पूर्ण केल्याने तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकाल. घरामध्ये काही डागडुजी करायची असेल तर त्यासंबंधी नियोजन करून ठेवाल. नवीन जागा, वाहन खरेदीचे विचार मनात डोकावतील.

सिंह ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणी तुमच्या वागण्या-बोलण्यामुळे तुम्ही सर्वाना आकर्षति करता. या आठवडय़ामध्ये या गुणाचा तुम्हाला व्यावसायिक आणि व्यक्तिगत जीवनात चांगला उपयोग होईल. तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला एखाद्या कमिटीवर मानाचे स्थान दिले जाईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी पूर्वी दिलेले एखादे आश्वासन पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. घरामध्ये एखाद्या वादविवादात तुम्ही समेट घडवून आणाल.

कन्या ग्रहमान संमिश्र आहे. व्यक्तिगत जीवनातील एखादे लांबलेले काम मार्गी लागल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. व्यापार-उद्योगात पशाची जमवाजमव करताना बरेच कष्ट पडतील. सप्ताहाच्या शेवटी एखाद्या मार्गाने धनप्राप्ती होण्याचे संकेत मिळतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना विशिष्ट काम विशिष्ट वेळात व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा असेल. घरामध्ये मौजमजेचा माहोल असेल.

तूळ महत्त्वाचे ग्रह तुम्हाला अनुकूल आहेत. ज्या संधीची तुम्ही बरेच दिवस वाट पाहात होता, ती संधी चालून येईल. व्यापार-उद्योगात हातात आलेली संधी घालवायची नाही या विचाराने तुम्ही २४ तास काम करायची तयारी ठेवाल. कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या चांगुलपणाचा गरफायदा घेतील. घरामध्ये तुमच्याकडून इतरांच्या अपेक्षा खूपच असतील.

वृश्चिक ग्रहमान तुमचा कामाचा वेग प्रचंड वाढविणार आहे. कोणत्याही अडथळ्यांचा जास्त विचार न करता तुम्ही ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण करून टाकाल. आíथक स्थिती सुधारेल. नोकरीच्या ठिकाणी एखादा कार्यक्रम ठरला असेल तर त्यामध्ये हिरिरीने भाग घ्याल. त्यातून तुमचा फायदा होईल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये तुमच्यातील कल्पकता आणि बुद्धिमत्ता छोटय़ा छोटय़ा कामातून दिसून येईल.

धनू बदलणारे ग्रहमान तुम्हाला चांगले आहे. व्यापार-उद्योगात हातातोंडाशी आलेली पण काही कारणाने लांबलेली कामे मार्गी लागतील. पशासंबंधी कामांना गती येईल. कारखानदारांना एखादे धाडस करावेसे वाटेल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक करतील. पूर्वी केलेल्या कामातून काही विशेष भत्ते मिळाल्यामुळे तुम्हाला हायसे वाटेल. घरामध्ये प्रिय व्यक्तीच्या जीवनातील एखादा सुखद प्रसंग निश्चित होईल.

मकर ग्रहमान तुमचा उत्साह वाढविणारे आहे. बऱ्याच नवनवीन कल्पना तुमच्या मनात येतील. व्यापार-उद्योगात अर्थप्राप्ती वाढविण्यासाठी असलेल्या कामामध्ये थोडासा विस्तार करावासा वाटेल. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांना एखादे काम मिळेल. नोकरीच्या ठिकाणी एखादा नवीन सहकारी तुमच्याबरोबर आल्यामुळे कामाचा उरक वाढेल. घरामध्ये सर्व काही चांगले असेल, पण प्रत्येकजण आपापल्या कामात गर्क असेल.

कुंभ ग्रहमान सुधारत असल्यामुळे तुमच्या हालचालींमध्ये गती येईल. ज्या कामाचा तुम्ही कंटाळा केला होता ते काम आता तुम्हाला हाती घ्यावेसे वाटेल. व्यापार-उद्योगात मालाची विक्री आणि फायदा होण्यासाठी एखादी नवीन कल्पना तुमच्या मनात येईल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुम्हाला प्रोत्साहन देऊन तुमच्याकडून जास्त काम करून घेतील. घरामध्ये एखादी चांगली बातमी कळेल. तरुणांचे विवाह ठरतील.

मीन काहीतरी मिळविण्याकरिता काहीतरी गमवावे, अशा प्रकारचे ग्रहमान आहे. सगळी कामे स्वत:ला करावी लागतील. व्यापार-उद्योगात एखादे काम पूर्ण करून पैसे अडकून पडले असतील तर ते हाती पडण्याचा मार्ग मोकळा होईल. नोकरीच्या ठिकाणी शॉर्टकट घेण्याच्या नादात तुमचे काम वाढण्याची शक्यता आहे. घरामध्ये काही अपेक्षित कारणांकरिता पसे खर्च करावे लागतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2018 1:01 am

Web Title: astrology from 24th to 30th august 2018
Next Stories
1 भविष्य : दि. १७ ते २३ ऑगस्ट २०१८
2 भविष्य : दि. १० ते १६ ऑगस्ट २०१८
3 भविष्य : दि. ३ ते ९ ऑगस्ट २०१८
Just Now!
X