सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष रवी-हर्षलच्या नवपंचम योगामुळे रविच्या कर्तृत्वाला हर्षलाची तडफदार भूमिका साहाय्यकारी ठरेल. आत्मविश्वासाने कार्यक्षेत्रात पुढे जाल. नोकरी-व्यवसायात आपल्या कृतीतून इतरांवर प्रभाव पाडाल. सहकारी वर्गाला योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन कराल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. दोघे मिळून कौटुंबिक प्रश्न सोडवाल. आवाक्याबाहेरच्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. दूषित पाण्यापासून पोटाचे आरोग्य सांभाळा. दुर्लक्ष नको.

वृषभ शुक्र-गुरुच्या केंद्र योगामुळे स्वच्छंदी जीवन जगाल. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी आपण फारसे कष्ट घ्यायला तयार नसाल. नोकरी-व्यवसायात मानसन्मानाची अपेक्षा ठेवाल. सहकारी वर्गाकडून अपेक्षित कामे करवून घ्याल. जोडीदाराची मानसिक चंचलता वाढेल. त्याची स्थिती समजून घ्याल. कौटुंबिक वातावरणातील ताणतणाव दूर करण्यासाठी जोडीदार विशेष मेहनत घेईल. हृदय, मणका, उत्सर्जन संस्था यांचे आरोग्य जपावे. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

मिथुन चंद्र-बुधाच्या लाभयोगामुळे भावना व व्यवहाराचा सुयोग्य समतोल साधाल. ऐनवेळी स्मरणशक्ती व समयसूचकता कामी येईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. कार्यक्षेत्रात प्रगतिकारक वाटचाल कराल. कल्पनाशक्तीचा योग्य वापर कराल. इतरांवर छाप पाडाल. जोडीदारासह शब्दाने शब्द न वाढवता परिस्थितीशी जुळवून घ्याल. कौटुंबिक वातावरण हास्यविनोदाने खेळीमेळीचे ठेवाल. पचनसंस्था व पित्ताशय यांचे आरोग्य जपा.

कर्क गुरु-चंद्राच्या केंद्र योगामुळे अडीअडचणींवर झगडून मात कराल. घरासंबंधी चांगले निर्णय घ्याल. अतिरिक्त खर्चावर आळा घालाल. नोकरी-व्यवसायात ठरवलेल्या कामांत अचानक बदल करावा लागेल. सहकारी वर्गाकडून मदत मिळेल. जोडीदाराची दगदग धावपळ होईल. अशा स्थितीत त्याला भावनिक आधार द्याल. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवाल. नातेवाईकांसाठी भेट-वस्तूंची खरेदी कराल. शिर दबणे, हातापायाला मुंग्या येणे हे त्रास सतावतील.

सिंह चंद्र-मंगळाच्या युतीयोगामुळे आपली मते दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न कराल. परंतु याचा फारसा चांगला परिणाम होणार नाही. नोकरी-व्यवसायात नीट विचार करून मगच अंतिम निर्णय घ्या. घाई करू नका. सहकारी वर्ग कोर्ट-कचेरीच्या कामात मदत करेल. जोडीदारासह वेळ आनंदात जाईल. जुने वाद दूर साराल. कौटुंबिक वातावरण शिस्तबद्ध पण आनंदी राहील. पायात पेटके येत असल्यास रक्त तपासणी करावी. व्हिटॅमिन डेफिशियन्सी असू शकेल.

कन्या बुध-हर्षलच्या नवपंचम योगामुळे नावीन्यपूर्ण गोष्टी आपले लक्ष वेधून घेतील. नोकरी-व्यवसायात संयम राखा. आपल्या विचारांच्या वेगाने इतर लोक काम करू शकत नाहीत, याचा त्रास करून घेऊ नका. संशोधकांना नव्या संधी मिळतील. सहकारी वर्गाकडून मोलाची मदत मिळेल. जोडीदारासह लहान-मोठा प्रवास कराल. एकत्रितपणे वेळ आनंदात घालवाल. नातेवाईकांच्या भेटी होतील.

तूळ रवि-मंगळाच्या युती योगामुळे कार्यशक्ती वाढेल. आत्मविश्वासाने अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकाराल व नेटाने पार पाडाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार वागणे कठीण जाईल. सहकारी वर्गाकडून जास्तीत जास्त कामाची अपेक्षा कराल. त्यांना लागेल ती मदत कराल. काही लाभदायक घटना घडतील. जोडीदारासह जुळवून घ्यावे लागेल. शब्द जपून वापरा. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. डोळ्यांचे विकार सतावतील.

वृश्चिक रवि-बुधाच्या युती योगामुळे विद्याव्यासंग वाढेल. बौद्धिक छंद जोपासाल. नोकरी-व्यवसायात एखाद्या गोष्टीचा एकांगी विचार न करता साकल्याने विचार करावा लागेल. वरिष्ठांशी तत्त्वासाठी वाद घालाल. आपल्या म्हणण्यातील सत्यता सिद्ध करून दाखवाल. सहकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. जोडीदाराची बाजू वरचढ ठरेल. त्याच्या सल्ल्याने कौटुंबिक समस्या दूर कराल. घरातील वातावरण धावपळीचे असेल. आर्थिक प्रश्न धीराने सोडवाल.

धनू भाग्यस्थानातील बुध-मंगळाच्या युती योगामुळे बुधाची बुद्धी व मंगळाची शक्ती यांचा मिलाप होईल. धाडसी निर्णय घ्याल. नोकरी-व्यवसायात विचार न करता आपले म्हणणे मांडू नका. सहकारी वर्गातील ज्येष्ठ व्यक्ती मोलाची मदत करतील. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात आपला ठसा उमटवेल. त्याच्या कष्टांचे चीज होईल. आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी होतील. युरीन इन्फेक्शन, जळजळ होणे असे त्रास अंगावर न काढता वैद्यकीय तपासणी करावी.

मकर बुध-शनिच्या नवपंचम योगामुळे कष्ट करण्याची तयारी ठेवाल. कामचलाऊगिरी खपवून घेतली जाणार नाहीत. नोकरी-व्यवसायात कायमस्वरूपी किंवा दीर्घ मुदतीसाठी उपयुक्त ठरेल असे उपाय योजाल. वरिष्ठ आपल्या कामाची बारकाईने तपासणी करतील. संयम बाळगा. सहकारी वर्ग आपल्या बाजूने उभा राहील. जोडीदाराची धावपळ-दगदग वाढेल. त्वचाविकार डोकं वर काढतील. रक्त तपासणीतून योग्य निदान होणार नाही.

कुंभ शुक्र-नेपच्यूनच्या समसप्तम योगामुळे संवेदनशीलता वाढेल. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याकडून अपेक्षाभंगाचे दु:ख सहन करावे लागेल. दु:ख जोंबाळत बसण्यापेक्षा कला, साहित्य, बौद्धिक छंदात मन रमवाल. नोकरी-व्यवसायात नवनिर्मितीचा आनंद मिळेल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. सहकारी वर्गाकडून मदत मिळेल. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात प्रगतीची वाट सापडेल. अधिकार वाढतील. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. मनोधर्य वाढवाल.

मीन शनी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे भावनांवर ताबा ठेवाल. कर्तव्याला प्राधान्य द्याल. नोकरी-व्यवसायात नियमबद्ध व काटेकोरपणे केलेल्या कामाची वरिष्ठ दखल घेतील. सहकारी वर्ग साहाय्य करेल. जोडीदार आपल्या कार्यक्षेत्रात अधिकच व्यस्त असेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी अनेक अडचणींवर मात कराल. न झेपणारे काम स्वीकारू नका.