News Flash

भविष्य : दि. ३१ ऑगस्ट से ६ सप्टेंबर २०१८

जेव्हा तुमचा मूड सगळ्यांना मदत करण्याचा असतो, अशा वेळी स्वार्थी मंडळी तुमचा गरफायदा उठवतात.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com
मेष जेव्हा तुमचा मूड सगळ्यांना मदत करण्याचा असतो, अशा वेळी स्वार्थी मंडळी तुमचा गरफायदा उठवतात. या आठवडय़ामध्ये थोडेसे व्यवहारी बनलात तर तुमचाच फायदा होईल. व्यापारउद्योगात कामकाज चांगले राहील. इतरांना सढळ हाताने मदत करण्यापूर्वी खरे हितचिंतक आणि दिखाऊ साथीदार यामधील भेद समजून घ्या. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाची जबाबदारी स्वत:च पार पाडा. घरामध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण असेल.

वृषभ जे प्रश्न काही काळापुरते मागे पडले होते, ते प्रश्न पुन्हा एकदा डोके वर काढतील त्यामुळे तुम्ही कोडय़ात पडाल. व्यापारउद्योगात खूप काम करूनही म्हणावे तितके पसे मिळणार नाहीत. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना अशा कामाची आठवण येईल जे काम तुम्ही विसरून गेला होतात. त्यामुळे तुमची धावपळ होईल. घरामध्ये तुमचे वागणेबोलणे इतरांना पटणार नाही. कोणालाही कसलाही सल्ला देऊ नका.

मिथुन ग्रहमान संमिश्र आहे. आठवडय़ाची सुरुवात थोडीशी तणावाने होईल. आपण काम करू शकू की नाही याविषयी मनात शंका असेल.  धक्कास्टार्ट या पद्धतीने कामाला सुरुवात करा. व्यापारउद्योगात स्पर्धकांची तुलना करू नका. कोणतीही नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी आपली मर्यादा काय आहे ते लक्षात घ्या. घरामध्ये इतरांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या. पण कोणतीही प्रतिक्रिया घाईने व्यक्त करू नका.

कर्क अनेक कामे एकाच वेळी करायची असल्यामुळे तुमच्या मनाचा गोंधळ उडेल. त्यातून आपुलकीच्या व्यक्ती तुम्हाला पाहिजे असलेली साथ देतील. व्यापारउद्योगात सर्व काम चांगले होईल, रोखीचे व्यवहार नीट तपासून बघा. नोकरीच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढल्यामुळे वरिष्ठांच्या सूचनेकडे दुर्लक्ष होईल. बेकार व्यक्तींनी घाईने नोकरी स्वीकारू नये. घरातील सदस्य त्यांच्या मागण्या तुमच्यापुढे ठेवतील.

सिंह प्रत्येक कामात आपल्याला मोठेपणा मिळनविण्यासाठी वेळ आणि पसे खर्च करताना तुम्हाला भान राहत नाही. या आठवडय़ात ही एक गोष्ट सोडता पूर्ण आठवडा चांगला आहे. व्यापारउद्योगात  पशाची आवक चांगली असेल. नोकरीमध्ये तुमच्या संस्थेला तुमच्या कामाची गरज असल्यामुळे तुम्हाला जादा सवलती मिळू शकतील. घरामध्ये दोन पिढय़ांतील विचारांतील तफावत छोटय़ा-मोठय़ा कारणांवरून जाणवेल.

कन्या सगळ्याच आघाडय़ांवर तुम्हाला लक्ष द्यायचे असल्यामुळे तुमच्या मनाचा गोंधळ उडेल. त्यामुळे कोणत्या कामाला किती वेळ द्यायचा याचे नियोजन करा. व्यापारउद्योगात एखादी गोष्ट मनाविरुद्ध करायला लागल्यामुळे तुमचा थोडासा गोंधळ उडेल. नोकरीच्या ठिकाणी पूर्वी केलेले काम वरिष्ठ वेगळ्या पद्धतीने करायला सांगतील. घरामध्ये एखाद्या सदस्याच्या जीवनाविषयीचा प्रश्न निर्माण झाला असेल तर त्यावर मार्ग निघेल.

तूळ केलेले कष्ट कधीही वाया जात नाहीत असा अनुभव देणारा हा आठवडा आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला आत्मविश्वास कमी असेल. पण जसजसे तुम्ही कामाला लागाल तसतसा तो वाढेल. व्यापारउद्योगात रात्र थोडी सोंगे फार अशी तुमची स्थिती होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी जे काम तुमच्या मनामध्ये आहे ते पूर्ण झाल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असेल. घरामध्ये मौजमजेचा माहोल असेल.

वृश्चिक आठवडय़ाच्या सुरुवातीला कोणत्या कामाला किती प्राधान्य द्यायचे याविषयी तुमच्या मनामध्ये गोंधळ असेल, पण त्यावर तुम्ही युक्तीने मार्ग शोधून काढाल. व्यापारीवर्ग बाजारपेठेमध्ये आपली प्रतिष्ठा वाढविण्याकरिता विशेष प्रयत्न करेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुम्हाला विशेष सवलत बहाल करतील. घरामधल्या व्यक्तींचे हट्ट पुरविणे तुम्हाला भाग पडेल. विशेष प्रावीण्य असलेले काम तुम्ही स्वत:हून हाती घ्याल.

धनू ग्रहमान जरी चांगले नसले तरी तुम्ही  बिनधास्त बनून जो दिवस पुढे आहे त्याचा आनंद लुटाल. व्यापारउद्योगात जे काम चालू आहे ते मन लावून करा. नोकरीमध्ये वरिष्ठ एखादे वेगळे काम सांगून तुमचा गोंधळ उडवतील. त्यामुळे चालू असलेल्या कामात दुर्लक्ष होईल. तेही त्यांना चालणार नाही. घरामध्ये एखादा कार्यक्रम ठरविताना प्रत्येक सदस्याचे तोंड वेगळ्या दिशेला असेल.

मकर एकाच वेळी अनेक कामे करायची असल्यामुळे कोणत्या कामाला महत्त्व द्यायचे असा गोंधळ तुमच्या मनामध्ये असेल. प्रत्येक काम लक्षपूर्वक करा. व्यापारउद्योगात आठवडय़ाची सुरुवात चांगली होईल. भविष्यातला फायदा वाढविण्यासाठी तुम्ही अहोरात्र मेहनत घ्याल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या चांगुलपणाचा गरफायदा घेतील. जे तुमचे काम नाही ते कामही करावे लागेल. संपूर्ण आठवडा धावपळीत जाईल.

कुंभ आठवडय़ाच्या सुरुवातीला काहीच काम करू नये असे तुम्हाला वाटेल. पण नंतर एक एक कामाची आठवण आल्यानंतर तुम्हाला गती मिळेल. व्यापारउद्योगात तुमची इच्छा असो व नसो तुम्हाला प्रसिद्धी करावी लागेल, त्याकरिता थोडेसे पसे आणि वेळ राखून ठेवा. नोकरीच्या ठिकाणी विनासहकार नाही उद्धार हे लक्षात ठेवून सगळ्यांशी प्रेमाने वागा. घरामध्ये आवश्यक गोष्टींची खरेदी केली जाईल.

मीन मानलं तर समाधान अशी तुमची स्थिती आहे. पाहिजे ती गोष्ट  मिळविण्याकरिता धक्कास्टार्ट पद्धतीचा अवलंब करावा लागेल. व्यापारउद्योगात पेरल्याशिवाय उगवत नाही याची आठवण येईल. तुमची इच्छा असो वा नसो तुम्हाला जाहिरात आणि प्रसिद्धीकरिता पसे खर्च करावे लागतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी सांगितलेले काम न केल्याने त्यांचा राग ओढवेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2018 1:01 am

Web Title: astrology from 31 august to 3 september 2018
Next Stories
1 भविष्य : दि. २४ ते ३० ऑगस्ट २०१८
2 भविष्य : दि. १७ ते २३ ऑगस्ट २०१८
3 भविष्य : दि. १० ते १६ ऑगस्ट २०१८
Just Now!
X