21 February 2019

News Flash

भविष्य : दि. ४ ते १० मे २०१८

जे काम तुम्ही हातात घेता त्यामध्ये स्वत:ला झोकून देता.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com
मेष

जे काम तुम्ही हातात घेता त्यामध्ये स्वत:ला झोकून देता. त्याचे फायदे आणि तोटे या आठवडय़ात तुम्हाला अनुभवायला मिळतील. व्यापार-उद्योगातील रेंगाळत पडलली कामे एक घाव दोन तुकडे या पद्धतीने करून स्वत:ची जबाबदारी हातावेगळी कराल. नोकरीतील कामाच्या निमित्ताने मोठय़ा व्यक्तींच्या वर्तुळात राहायला मिळेल. बेकार व्यक्तींना चांगले ग्रहमान आहे. घरामधल्या व्यक्ती तुमचा चांगला सल्ला धुडकावून लावतील.

वृषभ
प्रत्येक माणूस आशावादी असतो. या आठवडय़ात तुम्हाला अनपेक्षित प्रश्नाला तोंड द्यावे लागेल. अशा वेळी मन शांत ठेवा म्हणजे त्यावर उत्तर मिळेल. व्यापार-उद्योगातील काम शॉर्टकट न घेता नेहमीची पद्धत उपयोगी पडेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या शब्दाला मान द्या. सहकाऱ्यांच्या शब्दावर जास्त विश्वास ठेवू नका. घरामध्ये शांत असणारे तुम्ही एखाद्या प्रश्नामुळे चिडून जाल. महत्त्वाचा निर्णय रागाच्या भरात घेऊ नका.

मिथुन
कधी कधी अतिआत्मविश्वास घातकी ठरतो तसा अनुभव तुम्हाला या आठवडय़ात येईल. ज्या गोष्टीविषयी बिलकूल कल्पनाही नव्हती त्या गोष्टी घडल्यामुळे तुम्हाला तुमचा ठरलेला बेत बदलावा लागेल. व्यापार-उद्योगात भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व असते हे लक्षात ठेवा. नोकरीमध्ये सहकाऱ्यांच्या शब्दावर विसंबून राहून तुमची मते बनवू नका. घरामध्ये माझे तेच खरे असा तुमचा दृष्टिकोन राहील.

कर्क
सतत उद्योगात राहणारी तुमची रास आहे. या तुमच्या स्वभावाला खतपाणी घालणारे हे ग्रहमान आहे. व्यापार-उद्योगात छोटय़ा कामावर तुमचे समाधान होणार नाही. त्यामुळे काही वेगळे प्रयोग करून बघावेसे वाटतील. नोकरीच्या ठिकाणी बदलत्या वातावरणाचा अंदाज यायला वेळ लागेल. वरिष्ठांना खूश करण्याकरिता तुम्ही बढाया माराल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींशी एखाद्या मुद्दय़ावरून तात्त्विक मतभेद होतील.

सिंह
स्वभावत: तुमची रास धाडसी आहे. एखादे मोठे स्वप्न तुम्हाला कायम आकर्षति करेल. व्यापार-उद्योगात तुमच्या कार्यपद्धतीमध्ये अचानक काही फेरफार होतील. नवीन व्यक्तींसमवेत नवीन कामासंबंधी वाटाघाटी होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी वेडय़ावाकडय़ा सूचना दिल्या तरी त्याचा राग मानू नका. घरामध्ये तुम्ही इतरांवर दादागिरी कराल, त्याला इतर सदस्यांकडून विरोध होईल.

कन्या
एखादी वेडीवाकडी कल्पना तुमच्या मनात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चालू असलेले काम बिनसणार नाही याची दक्षता घ्या. व्यापार-उद्योगात एखादा मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्याचे भविष्यात काय परिणाम होतील याचा अंदाज घ्या. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या बाबतीमध्ये दिसते तसे नसते म्हणून जग फसते असा अनुभव येईल. तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.

तूळ
या आठवडय़ात तुमचे मूड क्षणोक्षणी बदलत राहतील. व्यापार-उद्योगात आठवडय़ाच्या सुरुवातीला अनपेक्षित मार्गाने चांगले काम किंवा पसे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या आवश्यक गरजा सहज भागतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या अतिउत्साहपणाचा फायदा घेऊन  नवीन काम लादतील. काहीजणांना परदेशी जाण्याचे संकेत मिळतील. घरामध्ये तुमचे म्हणणे इतरांना पटल्यामुळे सर्व गोष्टी सुरळीपणे पार पडतील.

वृश्चिक
तुमची रास जिद्दी आहे. एखादे काम होत नाही असे बघितल्यानंतर त्याचा नाद सोडून न देता तुम्ही तुमचे प्रयत्न वाढविता, कारण तुम्हाला थोडीशी चीड आलेली असते.  व्यापार-उद्योगात या आठवडय़ामध्ये एखादे अवघड काम हातात घ्याल. त्यामध्ये साम, दाम, दंड या नितीचा वापर करून ते काम मार्गी लावा. नोकरीच्या ठिकाणी कोणतीही घोषणा न करता आधी केले मग सांगितले असे तुमचे धोरण ठेवा.

धनू
तुमची रास परोपकारी स्वभावाची आहे. पण या आठवडय़ामध्ये थोडेसे स्वार्थी झालात तर तुमचाच फायदा होईल. व्यापार-उद्योगात कष्टाला तुम्ही कमी पडणार नाही. छोटी छोटी कामे करण्यापेक्षा मोठे काम करून फायदा वाढविण्याचा तुमचा मानस असेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे भविष्यातील बेत गुप्त ठेवा. तुम्हाला काय वाटते याचा विचार न करता वरिष्ठांच्या शब्दाला मान द्या. घरामध्ये प्रिय व्यक्तीशी तात्त्विक मतभेद होतील.

मकर
या आठवडय़ात माझे तेच खरे असा तुमचा अट्टहास असेल. त्याचे इतरांना आश्चर्य वाटेल. व्यापार-उद्योगात जरी तुमची महत्त्वाकांक्षा जास्त असली तरी ती पूर्ण करण्याकरिता आवश्यक त्या व्यक्तीशी संपर्क व्हायला आठवडय़ाचा शेवट येईल. नोकरीच्या ठिकाणी अत्यावश्यक असलेली कामे तुम्ही ताबडतोब कराल. पण इतर गोष्टींचा आळस कराल. घरामधल्या प्रश्नावर घाईने निर्णय घेऊ नका.

कुंभ
या आठवडय़ात तुमचे मूड बदलत राहतील. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका. व्यापार-उद्योगात जी गोष्ट तुमच्या मनाला पटणार नाही त्या भानगडीत न पडता तुमच्या पद्धतीने काम करा. आठवडय़ाचा शेवट लाभदायक ठरेल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका. तुमचे काम बिनचूक आणि वरिष्ठांच्या सूचनेनुसार करा. घरामधल्या व्यक्तींच्या शब्दाला मान द्या. प्रवासाच्या वेळेला घाईगडबड टाळा.

मीन
चार पैसे हातात आल्यामुळे तुमचे नतिक धर्य वाढणार आहे. व्यापार-उद्योगात ज्या व्यक्ती तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांच्या शब्दाला भुलून जाऊ नका. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामातून तुमचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा आहे अशा कामात तुम्ही लक्ष घाला. घरामध्ये मोठेपणा दाखविण्याकरिता तुम्हाला एखादी जबाबदारी स्वीकारावी लागेल.

First Published on May 4, 2018 1:02 am

Web Title: astrology from 4th may to 10th may 2018