01vijay1मेष काळाचे चक्र कोणाहीकरिता थांबत नाही. कोणताही निर्णय घाईने घेऊ नका. व्यापार-उद्योगात स्पर्धकांच्या गोटात काय चालले आहे याकडे नीट लक्ष ठेवा. पशाची आवक वाढवण्याकरिता प्रयत्न कराल. नोकरीमध्ये तुमच्या संस्थेत होणारे बदल कोडे निर्माण करतील. तुमचे विचार उघडपणे व्यक्त करू नका. घरामध्ये मोठय़ा व्यक्तीच्या जीवनात काही घडामोडी अचानक घडण्याची शक्यता आहे. त्यांना सांभाळून घ्यावे लागेल.

वृषभ तडकाफडकी कोणताही निर्णय घेण्याचा तुमचा स्वभाव नाही. बऱ्याच वेळेला कुटुंबातील व्यक्तींना काय वाटेल याचा तुम्ही आधी विचार करता आणि नंतर निर्णय घेता. व्यापार-उद्योगात नवीन आíथक वर्षांकरिता काही बेत आखून ठेवले असतील तर त्यामध्ये फेरफार होण्याची शक्यता आहे. स्पर्धकांकडे लक्ष ठेवा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या शब्दाला मान द्या. कामाच्या स्वरूपात बदली पाहिजे असेल तर प्रयत्न करा. घरामध्ये सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडाव्यात असा तुमचा हट्ट असेल.

10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
Shukra Gochar 2024
शुक्राचे राशी परिवर्तन होताच जुळून आलेत ३ शुभ राजयोग; ‘या’ राशींचे बदलेल भाग्य? २३ एप्रिलपर्यंत होऊ शकतात फायदेच फायदे
April 2024 Monthly Horoscope in Marathi
३० एप्रिलपर्यंत सोन्याचे दिन; १२ राशींपैकी कुणासाठी गुढीपाडवा ठरेल गोड व कुणाला लाभेल रामनवमी? वाचा राशी भविष्य
Good Friday: 29th March Panchang & Rashi Bhavishya
२९ मार्च पंचांग: कर्क, मीनसह ‘या’ राशींच्या लोकांचं आज चारचौघात होईल कौतुक; शुक्रवारी कुणाला लाभेल वैभव

मिथुन तुमच्या मनामध्ये ज्या कल्पना बरेच दिवस तरळत होत्या त्या कल्पनांना थोडा फार वाव मिळेल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांच्या गरजेनुसार तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये आणि कार्यपद्धतीमध्ये फेरफार करावे लागतील. जुन्या ओळखींचा उपयोग झाल्यामुळे नवीन ऑर्डर मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या पद्धतीने कार्यक्रम आखाल. पण आयत्या वेळेला त्यामध्ये फेरफार होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचा राग येईल. घरामध्ये प्रत्येकाची गरज भागवण्याकरिता तुम्हाला सिद्ध व्हावे लागेल.

कर्क सहसा तुम्ही कोणतेही बदल तडकाफडकी करत नाही. ते करण्यापूर्वी सभोवतालच्या व्यक्तींना काय वाटेल, याचा बराच विचार करता. पण या आठवडय़ामध्ये तुम्ही थोडेसे आग्रही बनाल. व्यापार-उद्योगात एखादे खर्चीक काम हातात घ्याल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ ठरविलेल्या कामात बदल करून अचानक वेगळे काम तुम्हाला सांगतील. पण हा बदल तात्पुरता असेल. घरामध्ये कोणाशी वादविवाद झाले असतील तर त्यामध्ये समेट घडेल.

सिंह सहसा तुम्ही राजमार्ग सोडत नाही. पण या आठवडय़ात स्वत:चे उद्दिष्ट पार पाडण्यासाठी तुम्हाला वेगळ्या नीतीचा वापर करावा लागेल. व्यापार-उद्योगात गेल्या तीन-चार आठवडय़ांत झालेल्या गरसोयीवर  तोडगा निघेल. कामाला वेग आल्याने तुमच्यात एक नवीन उत्साह संचारेल. नोकरदार व्यक्तींना किचकट कामातून स्वत:ची सुटका करून घेता येईल. घरामधील वादविवाद मिटण्याची शक्यता आहे.

कन्या एखादी गोष्ट पूर्ण करण्याकरिता या आठवडय़ात तुम्हाला नेहमीइतके कष्ट उपयोगी पडणार नाहीत. उसने अवसान आणून काम करावे लागेल.  व्यापार-उद्योगात कामाच्या निमित्ताने एखाद्या विचित्र व्यक्तींशी गाठभेट होईल. त्या व्यक्तींचा तुमच्यावर बराच प्रभाव राहील. पण अखेर तुम्ही मूळ पदावर याल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या सूचना तुम्हाला आवडणार नाहीत. त्यामुळे तुम्ही मारून मुटकून काम कराल. मात्र कामामध्ये चुका राहू देऊ नका. घरामध्ये कोणतीही गोष्ट समजावायला गेलात तर ते प्रकरण तुमच्यावरच शेकेल.

तूळ एकदा एखादे काम तुम्ही सुरू केले की त्यामध्ये सारखे बदल झालेले तुम्हाला आवडत नाही. पण या आठवडय़ात वरिष्ठ मोठय़ा व्यक्तींचे मूड सांभाळण्याकरिता तुम्हाला तुमच्या कामात बदल करायला लागतील. व्यापार-उद्योगातील काम करताना एखाद्या नाठाळ गिऱ्हाईकाशी सामना होईल. नोकरीच्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त काम मिळाल्याने दिलासा मिळेल. घरामध्ये सर्व जण तुमच्याकडून अपेक्षा ठेवतील, पण तुम्हाला काय पाहिजे ते विचारणार नाहीत.

वृश्चिक संथ पाण्यामध्ये खडे टाकल्यानंतर ज्याप्रमाणे तरंग उठतात त्याप्रमाणे सभोवतालच्या वातावरणात काही अनपेक्षित बदल होण्याची शक्यता आहे. पण ते बदल मान्य करून पुढे जावे लागेल. व्यापार-उद्योगात दिसताना बरेच काम दिसेल. गिऱ्हाईकांकडून तुमच्या कामाला मागणी असेल. पण त्यामानाने रोखीचे व्यवहार कमी होतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे मूड बदलत राहतील. घरामध्ये जोडीदाराने एखादी घोषणा केल्याने तुम्ही आधी ठरविलेले कार्यक्रम बदलावे लागतील.

धनू एकंदरीत तुमचा हा आठवडा धावपळीचा जाणार आहे. तुमच्या-कडून इतरांच्या बऱ्याच अपेक्षा असतील, त्या पूर्ण करण्यामध्ये आळस करून चालणार नाही. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात ज्या स्पर्धकांनी पूर्वी तुम्हाला त्रास दिला होता त्यांना धडा शिकविण्याचे तुम्ही ठरवाल, मात्र  हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नका. नोकरीच्या ठिकाणी ‘आधी केले, मग सांगितले’ हे धोरण तुम्हाला उपयोगी पडेल.

मकर नोकरी आणि व्यापार या ठिकाणी तुम्ही खूप काम करता, पण घरातील एखादे काम तुम्हाला सांगितले की तुमच्या कपाळावर आठय़ा पडतात. या आठवडय़ामध्ये तुम्हाला नेहमीच्या कामाचा थोडासा कंटाळा येईल. व्यापार-उद्योगात स्वत: काम कमी कराल. हाताखालच्या व्यक्तींकडून जास्त काम करून घ्याल. नोकरीच्या ठिकाणी न आवडणारे काम करायला लागल्यामुळे तुमचे मन बंड करून उठेल. घरामध्ये भावंडाविषयी एखादी अर्धवट बातमी कळेल. त्यामुळे गोंधळाचे वातावरण असेल.

कुंभ तुमचे घर आणि करिअर या दोन्ही आघाडय़ांवर अनेक घडामोडी होत राहतील. त्याला तोंड देण्यासाठी तुम्हाला सज्ज राहावे लागेल. व्यापार-उद्योगात महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क होईल. पशाची कामे लांबली असतील तर त्याला आता गती मिळू शकेल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुम्हाला आवडणारे काम सांगतील. घरामध्ये तुमच्या फटकळ वागण्यामुळे/ बोलण्यामुळे कोणाचाही अपमान करू नका. नवीन जागा खरेदी किंवा स्थलांतराचा योग नजीकच्या काळात संभवतो.

मीन गुरुप्रधान अशी तुमची रास असल्यामुळे तुम्ही नेहमी उत्साही असता. ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणचे वातावरण हलकेफुलके करता. व्यापार-उद्योगात मात्र तुमची भूमिका सावध ठेवा. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नका. नोकरीमध्ये वरिष्ठ तुम्हाला शब्दात पकडतील. तुम्ही दिलेले आश्वासन पूर्ण करून घेतील. घरामध्ये कोणाशीही बोलताना योग्य शब्द वापरा नाही तर त्यातून राईचा पर्वत होईल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com