X

भविष्य : दि. ७ ते १३ सप्टेंबर २०१८

आपण एखादी इच्छा करावी आणि त्याला पूरक वातावरण लाभावे असे फार थोडय़ा वेळेला होते.

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

मेष – आपण एखादी इच्छा करावी आणि त्याला पूरक वातावरण लाभावे असे फार थोडय़ा वेळेला होते. पण या बाबतीत तुम्ही या आठवडय़ात लकी ठरणार आहात. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना खूश करण्याकरिता एखादी स्पेशल ऑफर द्याल.  नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च हातात घ्या. घरामध्ये काटकसरीने राहायचे असे तुम्ही ठरवाल, पण हातातून कसे पसे सुटले ते तुम्हाला कळणार नाही. नवीन कामाला सुरुवात करायचे  ठरवाल.

वृषभ – कोणाला काय वाटते याचा विचार न करता या आठवडय़ात तुम्ही जीवनाचा उपभोग घ्यायचे ठरवाल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना खूश करण्याकरिता एखादी खास योजना आखाल. त्यामुळे तुमचे काम वाढेल. नोकरीमध्ये तुम्ही तुमच्या कामामध्ये शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न कराल, पण वरिष्ठ तुम्हाला तसे करू देणार नाहीत. त्यामुळे तुमची चिडचिड होईल. घरामध्ये काटकसरीने सण साजरा करायचा असे तुम्ही ठरवाल.

मिथुन – स्वभावत: तुमची रास हौशी आहे. जे काम तुम्ही हातात घेता त्यामधून तुमची कल्पकता इतरांना दिसून येते. या आठवडय़ात तुमच्या या विविधरंगी स्वभावाचे इतरांना दर्शन होईल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना काय पाहिजे आहे याचा नेमका अंदाज लागेल. त्यांना सवलती देऊन फायद्याचे प्रमाण वाढेल. नोकरीमध्ये कमी वेळात जास्त काम केल्यामुळे वरिष्ठ तुमची स्तुती करतील. घरामधील वातावरण आनंदी व उत्साही असेल.

कर्क – तुमची रास परंपरा जपणारी आहे. जेव्हा एखादा सण पुढे असतो त्या वेळी सर्व काही व्यवस्थितपणे पार पडले पाहिजे याकरिता तुम्ही खूप मेहनत घेता. या आठवडय़ात हा तुमचा स्वभाव प्रकर्षांने दिसून येईल. व्यापार-उद्योगात स्पध्रेमध्ये टिकून राहण्यासाठी एखादी महागडी योजना बाजारात आणाल. त्यातून चांगली कमाई होईल. नोकरीच्या ठिकाणी अत्यावश्यक कामे वगळता इतर  कोणत्याच कामात तुम्ही रस घेणार नाही.

सिंह – अनेक गोष्टी करण्याकरिता आपण प्रयत्न करत असतो, पण योग्य वेळ आल्याशिवाय त्यामध्ये हवी तशी प्रगती होत नाही. तशी वेळ या आठवडय़ात येईल. व्यापार-उद्योगात कामाचा तणाव इतका असेल की दिवसाचे २४ तास तुम्हाला अपुरे पडतील. भविष्यामध्ये त्यातून चांगले पसे मिळतील. नोकरीच्या ठिकाणी स्वत: काम कमी कराल, हाताखालच्या व्यक्तींकडून काम करून घ्याल. घरामध्ये मोठी खरेदी पार पडेल.

कन्या – उत्तम विचारशक्ती, कल्पनाशक्ती लाभलेली तुमची रास आहे. जे काम तुम्ही हातात घेता ते वेळेत आणि शिस्तीत पार पाडता. या गुणाचा तुम्हाला आता उपयोग होईल. व्यवसाय-उद्योगात  नेहमीचे काम चांगल्या रीतीने पार पाडल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान असेल. घरामधल्या व्यक्तींना एखाद्या मोठय़ा माणसाचे दर्शन होईल. नोकरीच्या ठिकाणी ठरविलेली कामे वेळेत पूर्ण कराल.

तूळ – तराजू ही तुमच्या राशीची खूण आहे. प्रत्येक बाबतीत  समतोल राखण्याचा प्रयत्न या आठवडय़ातसुद्धा कराल. पशाच्या बाबतीत सर्व गणित मागेपुढे होईल. व्यापारीवर्ग गिऱ्हाईकांना खूश करतील. नोकरीच्या ठिकाणी ठरविलेले काम तुम्ही वेळेच्या आधी उरकाल. बेकार कामगारांना तात्पुरते काम मिळेल. घरामधील वातावरण चतन्यमय असेल. महिला आपली एखादी इच्छा पूर्ण करून घेतील. तरुण मंडळी सामूहिक कामात एकत्र येतील.

वृश्चिक – जी गोष्ट तुम्ही मनावर घेता त्यामध्ये स्वत:ला झोकून देता. या आठवडय़ामध्ये असेच एखादे उद्दिष्ट तुमच्यापुढे असेल. व्यापारीवर्गाला चांगले ग्रहमान आहे. पसे मिळविण्याकरिता मोठी गुंतवणूक करावी लागेल. एखादा नवीन सौदा होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या दृष्टीने जे महत्त्वाचे काम आहे त्या कामाला तुम्ही प्राधान्य द्याल. घरामध्ये सगळ्यांनी आपल्याला महत्त्व दयावे याकडे तुमचे लक्ष असेल.

धनू –  स्वभावत: तुमची रास बंडखोर वृत्तीची आहे. पण या आठवडय़ात घरातल्या सदस्यांचा तुमच्यावर बराच प्रभाव असेल. त्यांना तुम्ही खूश ठेवाल. व्यापार-उद्योगात जनसंपर्क आणि जाहिरातबाजी या दोन्हीचा उपयोग झाल्यामुळे चांगले काम होईल. नोकरीच्या ठिकाणी काम करण्यापेक्षा ते संपवण्याची तुम्हाला घाई असेल. घरामध्ये एखादी चांगली खरेदी होईल, पण तसे करताना ऋण काढून सण साजरा करू नका.

मकर – या आठवडय़ामध्ये तुमच्या आनंदामध्ये इतरांना सहभागी करून घ्या. व्यापार-उद्योगात जेवढे जास्त काम तेवढे जास्त पसे असे समीकरण असेल. जाहिरात प्रसिद्धीमुळे तुमचे फायद्याचे प्रमाण वाढेल. नोकरदार व्यक्तींना काम सुरू करण्याच्या आधी काम संपवण्याची घाई असेल. घरामध्ये एखादा खास कार्यक्रम आयोजित कराल. बऱ्याच दिवसांनंतर लांबच्या नातेवाईकांशी गाठभेट होईल.

कुंभ – या आठवडय़ामध्ये तुम्हाला तुमचे घर आणि करिअर या दोन्ही गोष्टींना सारखेच महत्त्व द्यावे लागेल. थोडीशी धावपळ होईल, पण तुम्ही सर्व गोष्टी नियोजनाने साध्य करू शकाल. व्यापारात एखाद्या नव्या प्रोजेक्टची सुरुवात कराल.   नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना खूश ठेवण्यासाठी एखादे काम पूर्ण करून टाकाल. घरामध्ये तुमच्यामधील सौंदर्यदृष्टी इतरांना दिसून येईल. जे काम कराल ते आखीव-रेखीव आणि वेळेमध्ये असेल.

मीन – गुरू हा आशावादी ग्रह तुमचा अधिपती असल्यामुळे तुम्ही नेहमी आनंदी व उत्साही असता. या आठवडय़ात तुमच्या या स्वभावाचे दर्शन होईल. व्यापार-उद्योगात रोखीपेक्षा उधारीचे व्यवहार जास्त असतील. नोकरीच्या ठिकाणी तुमचे मन दुसरीकडेच भटकत असेल. घरामध्ये आनंदी, उत्साही वातावरण निर्माण करण्याकरिता सर्वाना खूश ठेवाल. आदरणीय व्यक्तीची हजेरी लागेल.

First Published on: September 7, 2018 1:01 am