18 November 2017

News Flash

दि. ७ ते १३ जुलै २०१७

एका वैचारिक संक्रमणाच्या उंबरठय़ावर तुम्ही असाल.

विजय केळकर | Updated: July 7, 2017 1:01 AM

राशिचक्र

01vijay1मेष एका वैचारिक संक्रमणाच्या उंबरठय़ावर तुम्ही असाल. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला पुढकार घ्यावासा वाटेल. व्यापार-उद्योगात एखादे नवीन तंत्र आत्मसात करून कामाचा वेग आणि दर्जा वाढवावा असा त्याचा उद्देश असेल.  नोकरीमध्ये तुम्हाला तुमची कार्यपद्धती बदलणे भाग पडेल. त्याचा नव्याने अभ्यास करावा लागेल. सांसारिक जीवनात इतरांच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील.

वृषभ अत्यंत स्थिर विचारांची तुमची रास आहे. या आठवडय़ात तुम्हाला एखादी नवीन कल्पना सुचल्यामुळे तुम्ही त्यामधे बदल करायला तयार व्हाल. व्यापार-उद्योगामधे गिऱ्हाईकांना आकर्षति करण्याकरिता तुम्ही वेगळी कार्यपद्धती अमलात आणाल. त्यातून लगेच पसे मिळणार नाहीत. नोकरीमध्ये संस्थेची गरज आणि बदलते धोरण या दोन कारणांमुळे तुम्हाला तुमचे ठरवलेले वेळापत्रक बदलावे लागेल. थोडीशी चिडचिड होईल. घरामध्ये एखाद्या मुद्यावरून वयोवृद्ध व्यक्तींशी मतभेद होतील. त्यांना तुमची बाजू समजून सांगला.

मिथुन आíथकदृष्टय़ा हे ग्रहमान तुम्हाला चांगले असल्यामुळे तुम्ही आता नव्या जोमाने आणि उत्साहाने कामाला लागाल. व्यवसाय-उद्योगामध्ये प्रतिस्पध्र्याना प्रत्युत्तर द्यायला आता तुम्ही सिद्ध व्हाल. जास्त फायदा मिळवून देणारे काम नजरेच्या टप्प्यात येईल. नोकरीमध्ये वरिष्ठांनी एखादी विशेष सवलत किंवा भत्ता देण्याचे मान्य केल्याने तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. बदली किंवा कामाच्या पद्धतीत बदल पाहिजे असेल तर तातडीने प्रयत्न करा. घरामध्ये तुम्ही तुमचे वर्चस्व गाजवाल.

कर्क रेंगाळलेल्या काही कामांना गती येईल. एखादी गोष्ट हातात घेतली की ती पूर्ण होईपर्यंत तुम्हाला चन पडणार नाही. व्यवसाय-उद्योगात उलाढाल आणि फायदय़ाचे प्रमाण वाढविण्याकरिता सध्याच्या कार्यपद्धतीत फेरफार करावेसे वाटतील. त्यासाठी जादा खेळत्या भांडवलाची गरज भासेल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या अपेक्षा वाढल्यामुळे तुम्हाला विश्रांती अशी मिळणार नाही. बेकार व्यक्तींनी त्यांचे प्रयत्न वाढवावेत. घरामध्ये डागडुजी छोटेमोठे बदल याकरिता तुम्हाला वेगळा वेळ काढावा लागेल.

सिंह आठवडय़ाच्या सुरुवातीला  मनामध्ये बरेच बेत कराल, पण नंतर ज्या घडामोडी घडतील त्यामुळे तुम्हाला निर्णय बदलणे भाग पडेल. व्यापार-उद्योगात भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व असते हे विसरून चालणार नाही.  नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी बोलताना तुमचे भविष्यातील बेत त्यांना सांगू नका. घरामध्ये तुमच्या स्पष्ट बोलण्यामुळे इतरांना तुमचा राग येईल.  मथितार्थ समजल्यावर सर्व गोष्टी सुरळीत पार पडतील.

कन्या तुमची रास अर्थतत्त्वाची रास आहे. पसा तुम्हाला खूप प्रिय असतो. तो जेव्हा पुढे दिसत असतो त्या वेळी तुम्ही तुमची वागणूक बदलता. व्यापार-उद्योगात केलेले कष्ट कधी वाया जात नाहीत याचा प्रत्यय येईल. पूर्वी केलेल्या नियोजनाचा फायदा होईल. नोकरीमध्ये कामाच्या स्वरूपात काही अचानक बदल संभवतात.  आíथक फायदा वाढवणार असल्यामुळे तुम्ही जादा काम कराल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये तुम्हाला फारसा वेळ देता येणार नाही. वडिलधाऱ्या व्यक्तींशी तात्त्विक मतभेद होतील.

तूळ प्रगती करायची असेल तर आपल्याला बदल स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागते. तशी तयारी तुम्ही जर केली तर येणाऱ्या संधीचा चांगला फायदा मिळेल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात कामाला गती आणण्यासाठी नवीन व्यक्तींशी हातमिळवणी कराल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमचे ठरविलेले कार्यक्रम अचानक बदलून टाकतील.  घरामध्ये एखाद्या कार्यक्रमानिमित्त छोटा प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. स्वत:ची हौसमौज भागल्यामुळे तुम्ही समाधानी दिसाल.

वृश्चिक ग्रहस्थिती थोडीफार सुधारत आहे. ज्या गोष्टी अगदीच हाताबाहेर गेल्या होत्या त्या आता हळूहळू नियंत्रणात येऊ लागतील. तुमचे मनोधर्य वाढेल. व्यापार-उद्योगात आíथक बाजू सुधारण्याची लक्षणे दिसू लागतील. नोकरीमध्ये एखादे बेचव काम संपल्यामुळे तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकाल. ज्यांना बदल करायचा असेल त्यांनी हळूहळू प्रयत्न करावे. घरामध्ये एखाद्या व्यक्तीशी गरसमज झाला असेल तर त्यात समेट घडून येईल.

धनू ‘नव्याची नवलाई नऊ दिवस’ या म्हणींची आठवण तुमच्याकडे बघून येईल आणि त्याचा तुमच्यावर बराच प्रभाव असेल. व्यापार-उद्योगात जे खर्च तुम्ही पूर्वी टाळलेले होते त्याची पुन्हा एकदा नांदी होईल. हाताखालच्या व्यक्तींकडून काम करून घेण्यासाठी त्यांच्याशी गोडीगुलाबीने वागावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी अतिउत्साह टाळा.  घरामध्ये आवडत्या व्यक्तींचा तुमच्यावर बराच प्रभाव असेल. त्यांचे हट्ट पुरवावे लागतील.

मकर जे काम विनाकारण रेंगाळत पडलेले होते ते काम तडीस नेण्याचा तुम्ही निर्धार कराल. त्यासाठी जे आवश्यक आहे ते सर्व करायची तुमची तयारी असेल. व्यापार-उद्योगात जे काम चालू आहे ते व्यवस्थित असेल, पण समाधान न झाल्यामुळे तुम्ही एखादी नवीन टूम शोधून काढाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आयत्या वेळेला तुमच्यावर सोपवलेले काम बदलतील. तुमचा गोंधळ उडेल तरीही तुम्ही काम पूर्ण कराल. घरामध्ये दोन पिढय़ांमधील विचारांतील तफावत जाणवेल.  मिळते जुळते घेताना त्रास होईल.

कुंभ मन आणि शरीर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या आठवडय़ामध्ये तुम्हाला चांगले काम करण्याकरिता या दोन्ही गोष्टी सांभाळणे आवश्यक आहे. व्यापार-उद्योगात प्रत्येक काम लवकर संपवण्याच्या नादात तुमच्या हातून चूक होणार नाही याची दक्षता घ्या. नोकरीमध्ये अनेक कामे एकाच वेळी करायला लागल्यामुळे तुम्ही लक्ष एकाग्र करू शकणार नाही. न आवडणारी काही बाहेरची कामे करणे भाग पडेल. घरामधल्या प्रिय व्यक्तीच्या तालावर नाचावे लागेल.

मीन ग्रहमान तुमच्या भावना नेहमीपेक्षा अधिक तीव्र करणाऱ्या आहेत. इतर वेळा एखादी गोष्ट सहज मिळाली तरी ती तुम्हाला चालते. पण आता जे पाहिजे ते ताबडतोब असा तुमचा आग्रह असेल. व्यापार-उद्योगात महत्त्वाची कामे मार्गी लावण्याचा निश्चय कराल. मात्र फार मोठा धोका पत्करू नका. नोकरीमध्ये मागण्यांकरिता वरिष्ठांकडे हट्ट धरू नका. घरामध्ये एखाद्या तात्त्विक प्रश्नावरून इतरांशी तुमचे वादविवाद होतील.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on July 7, 2017 1:01 am

Web Title: astrology from 7th to 13th july