12 December 2018

News Flash

दि. ९ ते १५ मार्च २०१८

सरकारी आणि कोर्टकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करा.

मेष एखादे मोठे काम हाती घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला कंबर कसून तयार व्हावे लागेल. इतरांची फारशी मदत तुम्हाला मिळणार नाही. व्यापारउद्योगात तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले काम मार्गी लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठ एखादे आमिष दाखवून तुमच्याकडून जास्त काम करून घेतील. नवीन नोकरीच्या कामामध्ये थोडासा उशीर होण्याची शक्यता आहे. धनलाभ झाल्याने आठवडय़ाची सांगता चांगली होईल.

वृषभ अर्थतत्त्वाची तुमची रास आहे. ज्यावेळेला तुमच्या खिशात पैसे असतात त्यावेळेला तुमचे मन शांत असते. व्यापार उद्योगात जे पैसे हातात पडतील त्याचा केवळ गरजेकरिता वापर करा. सरकारी आणि कोर्टकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी एखादी सवलत द्यायचे कबूल केले असेल तर ती सवलत मिळू शकेल. घरामध्ये कोणताही कार्यक्रम इतरांवर अवलंबून ठेवू नका. त्यामध्ये गोंधळ होईल.

मिथुन ग्रहमान परस्परविरोधी आहे. जे काम तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, त्यामध्ये इतरांकडून सहकार्य मिळणार नाही. पण तुम्ही ‘हाती घ्याल ते तडीस न्याल’ या पद्धतीने ठरविलेल्या कामात मुसंडी माराल. व्यापार-उद्योगात मोठे प्रोजेक्ट हातात घेण्याचा तुमचा विचार असेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून मिळालेले आश्वासन पूर्ण केले जाईल. घरामधल्या मोठय़ा व्यक्तींकडून मिळालेल्या सल्ल्यामुळे अवघड कामातला तिढा सुटेल.

कर्क गेल्या २-३ महिन्यांतील  ग्रहस्थिती आता सुधारल्यामुळे एक प्रकारचा हुरूप येईल. व्यापारउद्योगात ‘रात्र थोडी सोंगे फार’ अशी तुमची स्थिती असेल. तुम्ही घडय़ाळ्याच्या काटय़ानुसार काम कराल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी पूर्वी एखादे आश्वासन दिले असेल तर ते पूर्ण करण्याकरिता त्यांना आठवण करा. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करता करता तुमची दमछाक होईल.

सिंह तुमच्या कामात कोणीही ढवळाढवळ केलेली तुम्हाला चालत नाही. सभोवतालच्या व्यक्तींवर थोडा विश्वास ठेवलात तर कामही वेळेत होईल आणि तुम्हालाही बरे वाटेल. व्यापार उद्योगात  पशाची चणचण सोडविण्याकरिता तात्पुरते कर्ज घ्यावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी आपले काम संपल्याशिवाय सहकाऱ्यांना मदत करू नका. घरामध्ये तुम्ही ‘वडय़ाचे तेल वांग्यावर’ काढाल. त्यामुळे इतरांशी दुरावा निर्माण होईल.

कन्या ग्रहस्थिती सुधारत असल्यामुळे तुमचे मनोधर्य वाढेल. प्रकृतीच्या काही चिंता असतील तर त्या कमी होतील. व्यापार उद्योगात गिऱ्हाईकांच्या अपेक्षांना तोंड देण्यासाठी कामाचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक आहे. नोकरीमध्ये वरिष्ठ तुम्ही केलेल्या कामाचे पसे मिळतील. एखादी सवलत देऊन तुमच्याकडून जास्त पसे घेतील. घरामध्ये तुमच्या सल्ल्याचा एखाद्याला उपयोग होईल. सांसारिक जीवनात एखादे वादविवाद होतील.

तूळ एक चांगले तर एक वाईट तुमच्या वाटय़ाला येणार आहे. ज्या व्यक्तींवर तुम्ही भरवसा ठेवणार आहात. त्यांच्याकडून मदत मिळणार नाही. व्यापार-उद्योगात एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने घ्यायचे असा अनुभव येईल. नोकरीच्या ठिकाणी आठवडा प्रचंड धावपळीत जाईल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींनी दिलेला सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल. एखाद्या सदस्याच्या प्रकृती/ स्वास्थ्याविषयी चिंता वाटेल.

वृश्चिक प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपण केलेल्या कामाची कोणीतरी दखल घ्यावी आणि त्याचे कौतुक करावे. असा योगायोग या आठवडय़ात चालून येईल. व्यापार उद्योगाच्या ठिकाणी तांत्रिक कारणामुळे अडून राहिलेल्या कामाला मुहूर्त लाभेल. स्पर्धकांना त्याची असूया वाटेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा कामाचा वेग उत्तम राहील. घरामध्ये नवीन वस्तू खरेदीचा विचार विनिमय होईल.

धनू दोन आघाडय़ांवर वेगवेगळे अनुभव देणारा हा आठवडा आहे. तुमच्या करियरमध्ये तुम्ही मेहनत घ्याल, पण व्यक्तिगत जीवनामध्ये मनाच्या कोपऱ्यामध्ये एक प्रकारची पोकळी राहील. व्यापारी वर्गाला पूर्वी केलेले काम चांगले उपयोगी पडेल. सप्ताहाच्या मध्यात अपेक्षित पैसे मिळतील. नोकरीच्या ठिकाणी थोडेसे स्वार्थी बनाल. घरामध्ये इतरांच्या स्वार्थीपणाचा रागही येईल आणि वाईट वाटेल. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे.

मकर सुरुवात थोडीशी कंटाळवाणी वाटेल. ज्या कामाचा तुमच्याशी काहीही संबंध नाही असे काम करावे लागल्यामुळे तुमचा वेळ वाया जाईल. व्यापारउद्योगात महत्त्वाची  कामे जी पूर्वी काही कारणाने लांबलेली होती, त्यांना आता वेग यायला लागेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला स्वत:च्या कामाबरोबर एखाद्या सहकाऱ्याचे कामही करावे लागेल. घरामध्ये नेहमीच्यातली एखादी व्यक्ती नसल्यामुळे थोडासा एकाकीपणा जाणवेल.

कुंभ ग्रहमान प्रोत्साहन देणारे आहे. आपण केलेल्या कामाची कोणीतरी दखल घ्यावी ही तुमची इच्छा या आठवडय़ात पूर्ण होईल. पण आपुलकीच्या व्यक्तींना त्यांचे महत्त्व वाटणार नाही. व्यापार उद्योगात जादा भांडवलाकरिता बँक आणि इतर मार्गाने पैसे उपलब्ध होतील. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाचे काम तुमच्यावर सोपवले जाईल. घरामध्ये तुम्हाला लक्ष घालता येणार नाही. त्यामुळे घरात रुसवेफुगवे होतील.

मीन केलेले काम कधीही वाया जात नाही, त्याचा कुठे ना कुठेतरी उपयोग होतो याची जाणीव करून देणारे ग्रहमान आहे. व्यापारउद्योगात तुमच्याकडे काही खास कौशल्य असेल तर त्याला आता बरीच मागणी राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ मोठय़ा विश्वासाने संस्थेची एखादी जबाबदारी सोपवतील. घरामध्ये जे मंगलकार्य लांबले होते त्याची नांदी होईल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on March 9, 2018 1:01 am

Web Title: astrology from 9th to 15th march 2018