News Flash

दि. २९ डिसेंबर २०१७ ते ४ जानेवारी २०१८

मेष गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये ज्या अडचणींना तुम्ही तोंड दिलेत त्या अडचणी संपल्यामुळे तुम्ही उत्साही दिसाल. व्यापारउद्योगात नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील. देशात किंवा परदेशामध्ये तुम्हाला तुमचे

दि. २९ डिसेंबर २०१७ ते ४ जानेवारी २०१८

मेष गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये ज्या अडचणींना तुम्ही तोंड दिलेत त्या अडचणी संपल्यामुळे तुम्ही उत्साही दिसाल. व्यापारउद्योगात नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील. देशात किंवा परदेशामध्ये तुम्हाला तुमचे काम वाढवावेसे वाटेल. नोकरदार व्यक्तींना काहीतरी नवीन करून दाखविता येईल. त्यांनी सुचविलेले विचार वरिष्ठांना आवडतील. घरामध्ये प्रत्येक कामात तुम्ही उत्सवमूर्ती बनाल.

वृषभ एकंदरीत  ग्रहमान फारसे अनुकूल नाही. सोन्याची जशी अग्निपरीक्षा होते त्याप्रमाणे तुम्हाला कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागेल. व्यापारउद्योगात उत्पन्न वाढविण्याकरिता एखादा नवीन मार्ग शोधावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी अवघड कामाच्या वेळेला वरिष्ठ तुमची आठवण काढतील. पण त्याचे श्रेय द्यायला तयार होणार नाहीत. घरामधल्या सर्वजणांना सांभाळून घेण्याची जबाबदारी तुमची असेल, त्यामुळे तुम्हाला दमूनथकून गेल्यासारखे वाटेल. हवामानातील बदलामुळे प्रकृतीला त्रास होण्याची शक्यता आहे.

मिथुन जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती पूर्ण झाल्यामुळे नवीन वर्षांची सुरुवात चांगली झाली असे तुम्हाला वाटत राहील. व्यापारउद्योगात तुमची दूरदृष्टी तुम्हाला उपयोगी पडेल. जे काम तुम्ही कराल त्यामधून तुमची कल्पकता दिसून येईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या शब्दाला मान देतील, त्यामुळे तुमची कॉलर ताठ असेल. घरामध्ये आवडत्या व्यक्तींसमवेत एखादा छोटासा मेळावा साजरा होईल. या कामात तुमचा पुढाकार असेल. तरुणांचे विवाह जमतील.

कर्क जे काम तुम्हाला करायचे आहे त्यासाठी कोणावर तरी अवलंबून रहावे लागेल. या गोष्टीमुळे तुमची चिडचिड होईल. सभोवतालच्या व्यक्तींना सांभाळून घेऊन तुम्हाला काम करून घ्यावे लागेल. व्यापार-उद्योगात भरपूर काम करण्याची तुमची इच्छा असेल. प्रत्येक कामात छोटे मोठे अडथळे असतील. ते दूर करण्याकरिता  शक्ती खर्च होईल. नोकरीमध्ये संस्थेमध्ये घडणाऱ्या बदलांमुळे एक प्रकारची अस्वस्थता जाणवेल. घरामध्ये तालावर नाचणे तुम्हाला भाग पडेल.

सिंह तुमची रास प्रचंड महत्त्वाकांक्षी आहे. एखादी गोष्ट तुमच्या मनामध्ये आली की ती पूर्ण होईपर्यंत तुम्हाल चन पडत नाही. या स्वभावाला पूरक ग्रहमान आहे. त्यामुळे नवीन वर्षांची सुरुवात चांगली होईल. व्यापारी वर्गाला चालू असलेले काम मोठय़ा प्रमाणावर वाढवावेसे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या शब्दाला मान मिळेल. काही जणांना परदेशी जाण्याची संधी उपलब्ध होईल. घरामध्ये वर्षांची सुरुवात लाभदायक होईल.

कन्या येत्या वर्षांत खूप काम करून पसे मिळवायचे असा तुमचा इरादा असेल. परंतु चतुर्थस्थानामधला शनी त्याला गालबोट लावणारा आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा नोकरी व्यवसाय आणि घर या दोन्ही आघाडय़ांवर सारखेच लक्ष द्यायला हवे.  या आठवडय़ात व्यापारउद्योगात एखादी नावीण्यपूर्ण कल्पना तुम्हाला आकर्षति करेल. घरामध्ये प्रत्येकाच्या गरजा लक्षात घेऊन तुम्हाला सर्व योजना आखाव्या लागतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या अपेक्षा बऱ्याच असतील, पण तुम्ही मात्र ज्यातून आपल्याला फायदा आहे त्या पूर्ण कराल.

तूळ ग्रहमान जणू काही तुमची इच्छापूर्ती करणारे आहे. तुमचे इरादे बुलंद असतील. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये ज्या अडचणींना तुम्ही तोंड दिलेत त्याची आता भरपाई होईल. व्यापार उद्योगात लहानसहान काम करण्यापेक्षा एक मोठा हात मारावासा वाटेल. नोकरीमध्ये वरिष्ठांनी एखादी सवलत देण्याचे कबूल केले असेल तर ती तुम्हाला मिळू शकेल. घरामध्ये इतरांची इच्छा असो वा नसो, तुमच्या शब्दाला मान द्यावा लागेल. नवीन जागेमध्ये स्थलांतर करण्याचे योग संभवतात.

वृश्चिक तुमच्या कल्पकतेला आता भरपूर वाव असेल. साडेसातीचा अवघड टप्पा तुम्ही पार केल्यामुळे तुम्हाला आत भरपूर काम करावेसे वाटेल. जी कामे अगदी सहज आणि सोपी वाटली होती त्यामध्ये तुम्हाला डोके लढवावे लागेल. व्यापार-उद्योगात उत्पन्न वाढविण्याकरिता एखादा नवीन मार्ग शोधावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी कामाच्या प्रमाणामध्ये तुम्हाला सफलता मिळेल. घरामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल असे गृहीत धरू नका.

धनू ग्रहांची तुम्हाला साथ मिळणार असल्यामुळे साडेसातीचा जास्त विचार करू नका. डोके शांत ठेवून काम करा. स्वतची लक्ष्मणरेषा ओलांडू नका. एवढे तुम्ही केलेत तर बरेचसे प्रश्न आपोआप सुटतील. व्यापारीवर्गाला हा आठवडा चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर काही महत्त्वाची कामे गती घेऊ लागतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कल्पना वरिष्ठांना आवडतील. घरामध्ये श्रेय मिळण्याच्या उद्देशाने काम करू नका.

मकर तुमची रास शनिप्रधान रास आहे. जरी साडेसातीची सुरुवात झाली असली तरी इतर ग्रहांची तुम्हाला साथ असल्यामुळे काळजी करण्याचे काम नाही. मनाचा निर्धार ठेवलात तर तुम्ही चांगले यश मिळवू शकाल. व्यापारउद्योगात भरपूर पसे मिळावेत अशी तुमची इच्छा असेल. त्याकरिता काहीतरी वेगळे आणि चांगले काम करावेसे वाटेल. मोठय़ा व्यक्तींकडून तुम्हाला उत्तेजन मिळाल्याने तुमचा उत्साह बळावेल. नोकरीच्या ठिकाणी कामाचे स्वरूप बदलण्याची शक्यता आहे. घरामध्ये तुमचा इतरांना आधार वाटेल.

कुंभ ग्रहस्थितीमुळे नवीन वर्षांत तुमचे इरादे बुलंद राहतील. प्रत्येक आघाडीवर भरपूर चांगले काम करावे ही भावना तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. व्ययस्थानामधला रवी आणि शुक्र नेपच्यूनशी लाभयोग करेल. व्यापारात तुमच्या कल्पना स्पर्धकांना कळणार नाहीत याची खबरदारी घ्या. नोकरीच्या ठिकाणी जे काम इतरांना जमले नाही ते काम तुम्ही शक्कल लढवून पूर्ण करून दाखवाल. घरामध्ये तुम्ही तुमचे विचार न रागवता सगळ्यांना समजावून सांगा म्हणजे त्यांना ते पटतील.

मीन ग्रह तुम्हाला चांगले असल्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. प्रयत्नांती परमेश्वर या म्हणीची आठवण ठेवून तुमचे काम चालू ठेवा. अडथळे आले तरीही त्यातून मार्ग निघेल असा आशावाद मनात ठेवावा. व्यापारउद्योगात कोणीही तुमच्या मदतीला येणार नाही असे गृहीत धरून तुमचे प्रयत्न वाढवा. नोकरीच्या ठिकाणी तुमची कार्यपद्धती उत्तम असेल. तुमच्या परोपकारी स्वभावाचा फायदा उठवतील.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2017 1:01 am

Web Title: astrology star sign 29 december to 4 january 2018
Next Stories
1 दि. २२ ते २८ डिसेंबर २०१७
2 दि. १५ ते २१ डिसेंबर २०१७
3 दि. ८ ते १४ डिसेंबर २०१७
Just Now!
X