28 January 2020

News Flash

राशिभविष्य : दि. २६ जुलै ते १ ऑगस्ट २०१९

मनात नसताना बऱ्याच गोष्टींना होकार द्यावा लागेल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-मंगळाच्या केंद्रयोगामुळे मनाविरुद्ध गोष्टी घडल्यास रागाचा पारा वर वर चढेल. भावनांचा उद्रेक होऊ देऊ नका. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल. मनात नसताना बऱ्याच गोष्टींना होकार द्यावा लागेल. सहकारी वर्ग आपली बाजू समजून घेऊ शकला तरी साहाय्य करू शकणार नाही. जोडीदार आपल्या अनुपस्थितीत कौटुंबिक जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडेल. आपल्या रागावर ताबा ठेवून आनंदी क्षणांचा आपण लाभ घ्याल.

वृषभ रवी-चंद्राच्या लाभयोगामुळे मोजक्या कष्टात अपेक्षित फळ मिळेल. नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या भेटीगाठी होतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या शब्दांचा मान राखाल. सहकारी वर्गाला लागेल ती मदत तत्परतेने कराल. उदारपणे सत्पात्री दान कराल. जोडीदारासह जुळवून घ्याल. लहान-मोठय़ा प्रवासाचे आगाऊ बेत आखाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. छातीत दुखणे, स्नायूंमध्ये पेटके येणे यावर वैद्यकीय उपचार घ्यावा लागेल.

मिथुन शनी-चंद्राच्या प्रतियोगामुळे काही अडचणींवर चतुराईने मात करावी लागेल. बुद्धिकौशल्याची चुणूक दाखवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आपणास पािठबा देतील. चालू प्रकल्पाचे काम लांबणीवर पडेल. सहकारी वर्गाकडून वेळेत काम पूर्ण होऊनही इतर घटकांमुळे अनपेक्षित प्रश्न उपस्थित होतील. जोडीदार आपल्यासाठी हवा तसा वेळ काढू शकत नाही याची खंत न बाळगता आपली खोळंबलेली कामे उरकून घ्याल. श्वसन संस्था सांभाळा.

कर्क आत्माकारक रवी व मनाचा कारक चंद्र यांच्या लाभयोगामुळे कौटुंबिक सुख चांगले मिळेल. मित्रमंडळींकरिता वेळ राखून ठेवाल. नोकरी-व्यवसायात अचानक घेतलेल्या निर्णयात काही महत्त्वाचे बदल करावे लागतील. सहकारी वर्गाला त्यांच्या चुका सुधारण्याची संधी द्याल. योग्य मार्गदर्शन कराल. जोडीदाराचे सगळेच विचार आपल्याला पटावेत असा अट्टहास नको. सर्दी, पडसे, ताप, मायग्रेन यांसारख्या आजारांनी त्रासून जाल.

सिंह चंद्र व गुरू या दोन सत्त्वगुणी ग्रहांच्या समसप्तम योगामुळे ज्येष्ठ व्यक्तींच्या मदतीने प्रगती कराल. नोकरी-व्यवसायात ओळखीतून कामे मार्गी लागतील. सहकारी वर्गाला कायद्याच्या संबंधित मदत उपलब्ध करून द्याल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती कराल. अडचणीतून मार्ग काढून सर्वाच्या हिताचा निर्णय घ्याल. जोडीदाराची साथ चांगली लाभेल. एकमेकांना आधार द्याल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. हातापायांच्या बोटांची हाडे दुखल्यास औषधोपचार करावेत.

कन्या चंद्र-बुधाच्या युती योगामुळे बुद्धिमत्ता व मानसिक ग्रहणशक्ती यांची एकमेकांना चांगली साथ मिळेल. मुद्देसूद बोलाल. लेखन व वाचनाची आवड जपाल. नोकरी-व्यवसायात कायदेशीर कारवाईत पुढाकार घ्याल. संस्थेच्या हिताचे निर्णय मान्य कराल. जोडीदारासह चांगले सूर जुळतील. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. कामाचा ताण घेऊ नका.

तूळ शनी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे आपली कर्तव्ये चोखपणे पार पाडाल. नोकरी-व्यवसायात नियमबद्ध व चाकोरीतील कामे झटपट हातावेगळी कराल. सहकारी वर्गाच्या तक्रारी समजून घ्याल. साधकबाधक विचार व्यवस्थापकांपुढे मांडाल. जोडीदारासह विचारांची देवाणघेवाण कराल. घाईघाईने अंतिम निर्णय न घेता जोडीदाराच्या मताला मान द्याल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. अपचनामुळे अन्नावरील वासना जाईल. चव लागणार नाही. लंघन करावे.

वृश्चिक चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे उत्साह व निश्चय टिकून राहील. प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. सहकारी वर्ग तितकासा साहाय्यकारी नसेल. पण या गोष्टीचे वाईट वाटून घेऊ नका. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. एकमेकांच्या अडचणीत मदत कराल. आíथक बाजू भक्कम ठेवाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. सर्दी, पडसे, डोकेदुखी, छाती भरून येणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

धनू तमोगुणी शनी व रजोगुणी मंगळाच्या षडाष्टक योगामुळे अचानक अनपेक्षित घटनांना सामोरे जावे लागेल. मनस्ताप न करून घेता धिराने उभे राहावे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मताला विरोध करू नये. त्यांची नाराजी आपल्याला पेलवणार नाही. सहकारी वर्ग त्यांचे प्रश्न आपल्यापुढे मांडेल. मदतीचे आश्वासन न देणे हेच बरे! जोडीदाराच्या मतांशी सहमत नसाल तरी सध्याच्या स्थितीत फक्त ऐकून घ्याल. मार लागणे, पडणे याची शक्यता आहे.

मकर मंगळ-नेपच्यूनच्या षडाष्टक योगामुळे आíथक गुंतवणूक विचारपूर्वक कराल. भविष्यातील मोठी स्वप्ने रंगवणे वा भूतकाळातच रमणे यापेक्षा वर्तमानातील परिस्थितीचा अभ्यास कराल. नोकरी-व्यवसायात याचा नक्कीच लाभ होईल. सहकारी वर्गाला त्यांच्या अडचणीतून वाट काढून पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन कराल. जोडीदार आपली स्थिती समजून घेईल. भावनिक आधार देईल. कौटुंबिक वातावरणातील तणाव कमी कराल.

कुंभ चंद्र-नेपच्यूनच्या बौद्धिक राशींमधून होणाऱ्या नवपंचम योगामुळे मानसिक व आत्मिक शक्ती वाढेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे बहुमोल साहाय्य लाभेल. आíथक उन्नती होईल. सहकारी वर्गाकडून कामे वेळेत करून घ्याल. जोडीदाराची नाराजी आपल्या प्रेमाने दूर कराल. दोघे मिळून घरातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्याल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. छातीत जळजळ होणे, कफ भरणे इ.साठी वैद्यकीय सल्ला घ्यावा.

मीन रवी-हर्षलच्या केंद्रयोगामुळे नावीन्याची आवड जोपासाल. नोकरी-व्यवसायात अधिकारी व्यक्तींकडून लाभ होतील. वरिष्ठांचा पािठबा मिळेल. अधिक जबाबदाऱ्या पेलाल. सहकारी वर्ग मदतीची तयारी दाखवेल. जोडीदाराची चौकस बुद्धी उपयोगी पडेल. कौटुंबिक वातावरण उत्साहाचे राहील. मधुमेहावर ताबा ठेवा. नियमित व्यायाम उपयोगी पडेल.

First Published on July 26, 2019 1:01 am

Web Title: astrpology from 26th july to 1 august 2019
Next Stories
1 राशिभविष्य : दि. १९ ते २५ जुलै २०१९
2 राशिभविष्य : दि. १२ ते १८ जुलै २०१९
3 राशिभविष्य : दि. ५ ते ११ जुलै २०१९
Just Now!
X