01vijayमेष यशाकरिता तुम्हाला रस्सीखेच करायला लागणार आहे. कोणत्याही कामात सहज यशाची अपेक्षा ठेवू नका. व्यवसाय-उद्योगात नवीन प्रयोग करण्याचा मोह होईल. भागीदारी किंवा मत्री कराराचे नवीन प्रस्तावही पुढे येतील, पण हातात असलेले काम घाईने संपवू नका. जोडधंदा असणाऱ्यांना एखादी ऑर्डर मिळण्याची शक्यता वाटते. नोकरीमध्ये वरिष्ठ चालू असलेले काम अचानक बदलतील. घरामध्ये वातावरणातील तणाव कमी करण्यासाठी हवापालटाचा छोटा प्रवास करावासा वाटेल.

वृषभ
मनामध्ये जरी अनेक तरंग उठत असले तरी त्यांची अंमलबजावणी करणे तितकेसे सोपे नसते, याची प्रचीती देणारा हा सप्ताह आहे. व्यापार-उद्योगामध्ये नवीन करार-मदार करण्या-साठी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. पशाची आवक थोडी कमी वाटेल. नोकरीमध्ये एखाद्या नवीन संधीकरिता वरिष्ठ तुमची निवड करतील. कदाचित त्याकरिता प्रशिक्षण द्यायला तयार होईल. परंतु तुम्ही मात्र कामाविषयी साशंक असाल. घरामध्ये लहान-मोठय़ा कारणावरून इतरांशी तुम्ही हुज्जत घालाल. स्वत:ची तब्येत सांभाळा.

मिथुन
ज्या व्यक्तीची आणि जेव्हा तुम्हाला गरज असते त्या वेळी तुम्ही त्यांच्याशी हितसंबंध वाढवता आणि तुमचे काम संपले की कळत-नकळत त्यांचा तुम्हाला विसर पडतो. व्यवसाय-उद्योगात मात्र पशाकरता किंवा इतर कारणांकरता कोणाशीही हितसंबंध बिघडू देऊ नका. गुप्तशत्रूंच्या हालचालींवर कडी नजर ठेवा. नोकरीमध्ये काही विशेष सवलतींकरिता तुमची निवड होईल. घरात एखाद्या निमित्ताने जोडीदाराशी रुसवे-फुगवे होतील. नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या जीवनातील शुभप्रसंगाला तुमची हजेरी लागेल.

कर्क
एखादी गोष्ट तुमच्या मनात आल्यानंतर त्याची कार्यवाही तातडीने झाली पाहिजे, असा तुमचा या आठवडय़ात आग्रह असेल. व्यवसाय-उद्योगात या वर्षांकरिता एखादे उद्दिष्ट तुम्ही ठरविले असेल तर ते पूर्ण करण्याची तुमची घाई असेल. जमा आणि खर्च समसमान असल्यामुळे हातात विशेष पसे राहणार नाहीत. नोकरीमध्ये एखादे काम ठरलेल्या वेळेच्या आधी पूर्ण करण्याकरिता वरिष्ठ आग्रह धरतील. घरामध्ये एखाद्या मंगलकार्याची तयारी करावी लागेल. त्यामध्ये तुमचा सहभाग मोठा असेल.

सिंह
ग्रह तुम्हाला अनुकूल असल्यामुळे तुम्ही मोठय़ा जोमाने आणि उत्साहाने काम कराल. ‘नाही’ हा शब्द तुम्हाला आवडणार नाही. किंबहुना साध्या आणि सरळ कामापेक्षा एखादे अवघड काम हातात घेऊन ते पूर्ण करण्याचा तुमचा इरादा असेल. व्यापार-उद्योगात एखाद्या स्वप्नमयी कल्पनेचा तुम्ही पाठपुरावा कराल. पशाचा ओघ विविध मार्गाने चालू असेल. फक्त हातातले पसे योग्य कारणाकरिता वापरा. बेकार व्यक्तींनी आलेल्या संधीचा अव्हेर करू नये. घरामध्ये सर्व जण एखाद्या कारणाने तुमची बडदास्त ठेवतील.

कन्या
त्याच त्याच गोष्टी करत बसण्याचा या आठवडय़ात तुम्हाला कंटाळा येईल. व्यापार-उद्योगात सध्याची चालू असलेली कार्यपद्धती सुटसुटीत करून कार्यक्षमता वाढवावीशी वाटेल. आíथक परिस्थिती मनाप्रमाणे असल्यामुळे नवीन गुंतवणुकीचे विचार मनात डोकावतील. नोकरीमध्ये एखाद्या ठिकाणी बदली किंवा कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पसे व्यवस्थित मिळतील. घरामध्ये सर्व जणांचा मूड मौजमजा करण्याकडे असेल. पूर्वी ठरलेला एखादा शुभ समारंभ पार पडेल.

तूळ
या आठवडय़ात ज्या कामातून तुम्हाला विशेष फायदा नाही, असे काम बंद करून त्याऐवजी दुसरे काम हातात घ्यावेसे वाटेल. व्यवसाय-उद्योगात नेहमीच्या पद्धतींचा आणि कामाच्या स्वरूपात फेरफार करावेसे वाटतील. त्याकरिता निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्या. नवीन वर्षांकरिता नवीन योजना मनात आखून ठेवाल. नोकरदार व्यक्तींनी सहकाऱ्यांशी, वरिष्ठांशी जपून बोलावे. घरामध्ये तुम्ही सर्वाना चांगला सल्ला द्याल तो त्यांना न पटल्यामुळे विनाकारण रुसवे-फुगवे होतील.

वृश्चिक
सहसा तुम्ही आपले विचार कोणाला उघडपणे बोलून दाखवत नाही. त्यामुळे तुमच्या मनात नेमके काय चालले आहे याचा इतरांना अंदाज लागत नाही. व्यवसाय-उद्योगात  जादा भांडवलाची गरज भासेल. पूर्वीच्या कामाची वसुली करताना गिऱ्हाईकाचे मन मोडू नका. नोकरीमध्ये एकामागून एक कामे वरिष्ठांनी सांगितल्यामुळे तुमचा गोंधळ होईल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात ताबडतोब निर्णय घ्या. घरामध्ये एखाद्या छोटेखानी मेळाव्यामुळे नातेवाईकांशी गाठभेट होईल. मात्र त्यांच्याशी बोलताना जपून राहा.

धनू तुमच्यात एक नवीन ऊर्मी निर्माण होईल. भविष्यातील परिणामांचा जास्त विचार न करता जी गोष्ट तुम्ही ठरविलेली आहे ती पूर्ण करून टाकाल. व्यापार-उद्योगातील प्रगती चांगली असल्यामुळे तुमच्यातील महत्त्वाकांक्षा जागृत होईल. नवीन वर्षांत चालू असलेल्या कामाव्यतिरिक्त काही तरी वेगळे आणि चांगले काम करण्याची इच्छा होईल. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे वरिष्ठांनी तुमच्यावर सोपवल्याने तुम्हाला जास्त वेळ काम करावे लागेल. घरामध्ये एखाद्या शुभ समारंभामध्ये तुमची हजेरी लागेल.

मकर काही व्यक्ती एखाद्या निमित्ताने आपल्या सान्निध्यात येतात आणि ते कारण संपल्यावर आपल्यापासून लांब जातात, याचे कोडे आपल्याला उमगत नाही. व्यापार-उद्योगात जोखमीची कामे इतरांवर न सोपवता स्वत:च हाताळा. एखाद्या जुन्या सहकाऱ्याच्या लांब जाण्यामुळे नोकरीच्या कामात एक प्रकारची पोकळी जाणवेल. तुमच्या कामाचा उरक वाढविण्याकरिता विशेष प्रयत्न घ्यावे लागतील. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या गरजा ओळखून त्या व्यक्तीला चांगली साथ देण्याचा प्रयत्न कराल.

कुंभ घोडय़ाला झापड लावल्याप्रमाणे तुम्ही एकावेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करता. त्यामुळे तुमच्या कामाचा दर्जा नेहमी टिकून राहतो, पण या आठवडय़ात अनेक कामे तुम्हाला एकाच वेळी हाताळाविशी वाटतील. त्याला योग्य न्याय देण्यासाठी वेळेचे आणि कामाचे नियोजन नीट करून ठेवावे. आíथक गोष्टींवर लक्ष ठेवावे लागेल. नोकरीमध्ये कामाचा वेग वाढविण्याकरिता एखादी नवीन युक्ती अवलंबाल. घरामध्ये एखाद्या कारणाने आप्तेष्टांची ये-जा राहील. त्यांच्याकडून तुम्हाला तुमच्या कामाचे कौतुक ऐकायला मिळेल.

मीन जे काम तुम्ही हाती घ्याल त्यामध्ये तुमची कल्पकता आणि रसिकता दिसून येईल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना खूश करण्याच्या नादात उधारी वाढण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी जे काम इतरांना जमले नव्हते ते काम हाताळायला वरिष्ठ आवश्यक ते अधिकार देतील. पण त्या मानाने सवलती मात्र कमी मिळतील. घरामध्ये एखाद्या समारंभाच्या निमित्ताने नातेवाईकांशी गाठभेट होईल. आवडीच्या वस्तूंची खरेदी करण्याचे बेत आखाल.