07 July 2020

News Flash

दि. २५ ते ३१ डिसेंबर २०१५

या आठवडय़ात तुमच्या यशाचे प्रमाण कष्टांवर अवलंबून असेल.

astrमेष या आठवडय़ात तुमच्या यशाचे प्रमाण कष्टांवर अवलंबून असेल. व्यापार-उद्योगात नवीन हितसंबंध निर्माण होतील. मात्र त्यावर पूर्ण विसंबून राहू नका. नोकरीमध्ये तुमच्या कल्पकतेला आणि कष्टाळू स्वभावाला भरपूर वाव असेल. एखाद्या नवीन पद्धतीच्या कामाकरिता वरिष्ठ तुमची निवड करतील. घरामध्ये किरकोळ डागडुजी, येणाऱ्या-जाणाऱ्यांचे आगतस्वागत आणि इतर कार्यक्रमांमुळे आनंद वाढेल. २०१६ सालात प्रवेश करताना तुम्हाला सतत सावध दृष्टिकोन ठेवणे अत्यावश्यक आहे.

वृषभ या कामाविषयी तुम्हाला खात्री नव्हती, त्यामध्ये अचानक चांगली कलाटणी मिळाल्यामुळे तुम्ही थोडेसे आश्चर्यचकित व्हाल. व्यापार-उद्योगात कामकाज चांगले राहील. पण त्यावर तुमचे समाधान होणार नाही. नोकरीमध्ये दगदग जाणवेल. २०१५ सालात वर्षभर तुम्हाला गुरू आणि शनी या दोन मोठय़ा ग्रहांनी चांगली साथ दिली. त्यामुळे व्यवसाय आणि नोकरी यामध्ये चांगले काम झाले. शिवाय घरामध्ये सौख्यकारक घटना घडल्या. आता नवीन वर्षांत प्रवेश करताना ग्रहमान असेच असणार आहे.

मिथुन तुम्ही तुमच्या तंद्रीमध्ये मग्न असाल. व्यापार-उद्योगात नेहमीच्या कामापेक्षा एखाद्या नवीन कल्पनेत रममाण व्हाल. नोकरीमध्ये संस्थेकडून मिळणाऱ्या सुख-सुविधांचा जास्तीत जास्त फायदा उठवाल. नवीन नोकरीकरिता प्रयत्न करणाऱ्यांना यशदायक सप्ताह आहे. घरामध्ये एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. नवीन वर्षांत पदार्पण करताना ग्रहस्थिती साधारण असणार आहे. त्यामुळे प्रयत्नांच्या प्रमाणात यश मिळण्याची मनाची तयारी करून ठेवा.

कर्क कोणतेही कार्य असो, त्यांच्यामध्ये तुम्ही नेहमीच उत्साहाने सहभागी होता. या आठवडय़ात जीवनाचा आस्वाद घेण्याकडे कल असेल. व्यापार-उद्योगात नेहमीच्या कामाव्यतिरिक्त अनपेक्षित कमाई होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये कामाच्या स्वरूपात बदल होण्याचे संकेत मिळतील, ज्यामुळे तुमचा फायदा होईल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये आप्तेष्ट व नातेवाईक यांचा गराडा राहील. नवीन वर्षांत पदार्पण करताना ग्रहांची साथ तुम्हाला लाभत असल्यामुळे तुमचे इरादे बुलंद असतील.

सिंह इच्छा आहे तेथे मार्ग आहे हे तुम्ही न बोलता तुमच्या कृतीतून सिद्ध कराल. व्यापार-उद्योगात नवीन वर्षांकरिता काही खास बेत आखून ठेवाल. नोकरीमध्ये कोणाच्याही मदतीची वाट न बघता प्रत्येक काम वेळेत आणि जबाबदारीने पार पाडाल. २०१५ सालाच्या सुरुवातीला व्यवस्थानातील गुरू आणि चतुर्थस्थानातील शनीमुळे प्रत्येक आघाडीवर तुमची नाकेबंदी झाली होती. आता २०१६ मध्ये प्रवेश करताना अनेक ग्रह तुमच्या दिमतीला असल्यामुळे नवीन वर्षांचे स्वागत तुम्ही मोठय़ा उत्साहाने कराल.

कन्या वरून तुम्ही शांत दिसाल, पण मनामध्ये वेगवेगळ्या योजना आणि कल्पना िपगा घालत बसतील. व्यापार-उद्योगात वाढ करण्याचे वेध लागतील. नोकरीमध्ये तुमची एखादी मागणी वरिष्ठ मान्य करतील. व्यक्तिगत जीवनात एखादी दीर्घकाळाची कल्पना साकार कराल. घरामधला माहोल एकंदरीतच उत्साही असेल. २०१५ सालाच्या सुरुवातीस गुरूची तुम्हाला साथ होती, त्यामुळे तुम्ही बरेच काम करू शकलात. आता नवीन वर्षांत पदार्पण करताना मर्यादा लक्षात घेतल्या तर तुम्ही उत्तम कामगिरी बजावू शकाल.

तूळ ग्रहांचे राशीबदल आणि ग्रहयोग तुम्हाला अनुकूल असल्यामुळे तुम्ही आता उत्साही दिसणार आहात. व्यापार-उद्योगात एखादी नवीन योजना अमलात आणण्याचे मनात असेल. त्याची पूर्वतयारी करा. नोकरीमध्ये बदल हवे असतील तर वरिष्ठांना खूश ठेवा. घरामध्ये आवडत्या व्यक्तींशी एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गाठभेट होईल. त्यांच्याबरोबर करमणुकीचे किंवा प्रवासाचे बेत ठरतील. २०१६ सालामध्येसुद्धा प्रवेश करताना काहीतरी नवीन आणि छान घडावे, अशी चांगली भावना तुम्हाला गतिमान ठेवेल.

वृश्चिक रोजच्या कामातल्या कटकटीतून बाहेर पडून तुम्हाला जीवनाचा आस्वाद घ्यावासा वाटेल. व्यापार-उद्योगात पशांची आवक मनाप्रमाणे राहील. बेकार व्यक्तींना काम मिळेल. सध्याच्या नोकरीत तुम्ही भरपूर काम कराल, पण त्याचे श्रेय मिळेल की नाही याची शंका मात्र मनात तरळत राहील. घरामध्ये मंगलकार्याच्या निमित्ताने खरेदी होईल. २०१५ सालात शनी तुमच्याच राशीत असल्यामुळे साडेसातीची झळ पोहोचली असेल, पण नवीन वर्षांत पदार्पण करतानाही तुमची ग्रह-स्थिती कमी-जास्त प्रमाणात अशीच असणार आहे.

धनू व्यापार-उद्योगात जे काम चालू आहे त्यात तुम्हाला फारसा रस नसेल, पण जे काम तुम्हाला पुढे करायचे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. त्यासाठी आवश्यक ती माणसांची आणि पशाची जुळवाजुळव कराल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या विशेष कौशल्याला महत्त्व देऊन चांगले काम सोपवतील. घरगुती समारंभामुळे जरी तुमचे पसे खर्च झाले तरी आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ घालविता आल्याने बरे वाटेल. नवीन वर्षांत पदार्पण करताना राश्याधिपती गुरूची चांगली साथ मिळाल्याने तुम्ही बरेच आशावादी दिसाल.

मकर तुमच्या या कष्टाळू स्वभावाला न्याय देणारे या आठवडय़ाचे ग्रहमान आहे. त्यामुळे सर्व आघाडय़ांवर तुम्ही प्रचंड उत्साहाने काम कराल. व्यवसाय-उद्योगात तुमचे अंदाज आणि आडाखे बरोबर ठरतील. त्यामुळे प्रगतीचा पुढील मार्ग तुम्हाला खुला झाल्यासारखा वाटेल. आर्थिक बाजू तुमच्या गरजेपुरती सुधारेल. नोकरीमध्ये तुमची एखादी मागणी असेल तर वरिष्ठांचा मूड पाहून ती त्यांच्यापुढे ठेवायला हरकत नाही. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. घरामध्ये पूर्वी ठरलेला एखादा कार्यक्रम मनाप्रमाणे पार पडेल.

कुंभ कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही विचार करण्यात बराच वेळ घालविता. पण आता मात्र तुम्हाला कृतीची घाई असेल. उत्तम दर्जा ठेवून वेळेत काम करणारी तुमची रास आहे. या दोन्ही गुणांची आता सभोवतालच्या व्यक्तींना प्रचीती येईल. व्यापार-उद्योगात नवीन पद्धतीने काम करण्याचा विचार कराल. नोकरीमध्ये विशिष्ट कामासाठी वेगळ्या प्रशिक्षणाकरिता निवड होईल. तुम्ही बराच भाव खाल. घरामध्ये आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या जीवनातील एखादा सोहळा पार पडत असेल तर तेथे तुमची हजेरी लागेल.

मीन दोन मासे अशी तुमच्या राशीची खूण आहे. सतत तुमच्या मनात काहीतरी वेगळे विचार चालू असतात. या आठवडय़ातही याच्यापेक्षा तुमची स्थिती वेगळी नसेल. व्यवसाय- उद्योगात नवीन वर्षांत एखादी उलाढाल वाढवण्याचे बेत ठरवाल. नोकरीमध्ये नावीन्यपूर्व काम करण्याची वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. घरात एखादा सोहळा पार पडेल. तरुणांच्या कौशल्याला वाव असेल. नवीन वर्षांत प्रवेश करताना काही मर्यादा असल्या तरी तुम्ही पूर्वीइतकेच आशावादी दिसाल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2015 1:01 am

Web Title: lokprabha weekly horoscope 2
टॅग Horoscope
Next Stories
1 दि. १८ ते २४ डिसेंबर २०१५
2 दि. ११ ते १७ डिसेंबर २०१५
3 दि. ४ ते १० डिसेंबर २०१५
Just Now!
X