01vijay1मेष एखादा प्रश्न तात्पुरता स्थगित झाला असे वाटेल, पण तरीसुद्धा तुम्हाला बेसावध राहून चालणार नाही. व्यवसाय-उद्योगात कामाचा व्याप वाढविण्याकरिता एखादा भागीदारी किंवा मत्रीकरार करावासा वाटेल. नोकरीमध्ये अफवा किंवा सहकाऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता तुमचे कर्तव्य शांत चित्ताने पार पाडा. नवीन टेबलावर तात्पुरती बदली होईल. घरामध्ये जोडीदाराशी रुसवे-फुगवे होतील. तुमचे धोरण मवाळ ठेवा.

वृषभ वारा वाहील तशी पाठ फिरवणारी तुमची रास आहे. सहसा तुमचे निर्णय किंवा अंदाज चुकत नाहीत. याचा फायदा आता तुम्हाला मिळेल. व्यापार-उद्योगात ज्या व्यक्तींनी तुमच्यावर टीका केली होती त्यांच्या नाकावर टिच्चून एखादे चांगले काम करून दाखवाल. जुनी येणी वसूल होतील. नोकरीमध्ये कोणावरही टीका न करता जे तुमच्या मनात आहे तेच तुम्ही करून दाखवाल. घरामध्ये आवडत्या व्यक्तींकरिता एखादा खास बेत कराल. मुलांच्या प्रश्नात जातीने लक्ष घालाल.

मिथुन द्विस्वभावी रास असे तुमचे वर्णन केले जाते, त्याची आता प्रचीती येईल. नकारात्मक विचार न करता काही तरी चांगले घडेल असा विचार करून पुढे जा. व्यवसाय-उद्योगात ज्या गिऱ्हाईकांकडून पूर्वी नकार ऐकायला लागला होता त्यांच्याकडून चांगले संकेत मिळतील. आíथक स्थिती थोडीफार सुधारेल. नोकरीमध्ये जास्त काम करावेसे वाटेल. घरामध्ये एखाद्या व्यक्तीला मदत करून तुम्ही उपकृत कराल. तुमचे हितशत्रू मात्र एखाद्या कारणावरून टीका करतील.

कर्क  आपुलकीच्या व्यक्तीच्या बाबतीत तुम्ही खूप संवेदनशील असता. या आठवडय़ात अशाच एखाद्या कारणामुळे तुम्ही संवेदनशील व्हाल. व्यापार-उद्योगात रोखीचे व्यवहार इतरांवर न सोपवता शक्यतो स्वत:च हाताळा. नोकरीच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी बोलताना ‘शब्द हे शस्त्र आहे’ हे विसरू नका. घरामध्ये आवडत्या व्यक्तीच्या स्वास्थ्याकरिता, प्रगतीकरिता तुम्हाला मेहनत करावी लागेल. मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्याशी गरसमज होऊ देऊ नका.

सिंह घरामधल्या एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला खूप त्रास झाला असेल तर त्यातून तात्पुरती सुटका होईल. व्यापार-उद्योगात कामाचा वेग वाढविण्याकरिता कार्यपद्धतीत सुटसुटीत बदल कराल. पूर्वी केलेल्या कामातून पसे मिळाल्यामुळे तुमचा उत्साह बळावेल. जोडधंद्यातून उत्पन्न वाढेल. नोकरीमध्ये कोणासही फुकटचा सल्ला देऊ नका. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींविषयी गरसमज करून घेऊ नका. लांबच्या नातेवाईकांविषयी एखादी खबरबात कळेल.

कन्या कोणताही प्रश्न सोडविताना तुमची भूमिका नेहमी व्यावहारिक असते, पण या आठवडय़ात तुम्ही थोडेसे भावनाशील बनाल. व्यापार-उद्योगात आलेल्या संधीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. अपेक्षित पसे एखाद्या तांत्रिक कारणामुळे लांबण्याची शक्यता आहे. उद्योगपतींना परदेशात दौरा करावासा वाटेल. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाच्या संधीकरिता वरिष्ठ तुमची निवड करतील. घरामध्ये बुजुर्ग व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल.

तूळ पशासंबंधी काही कामे मार्गी लागली असे तुम्हाला वाटत असतानाच थोडे दिवस सर्व काही ठप्प झाल्यासारखे वाटेल. निराश होऊ नका. तुमचे प्रयत्न चालू ठेवा. व्यवसाय-उद्योगात ज्या कामाला नाट लागला होता त्यामध्ये थोडीफार सुधारणा होईल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमची अडचण लक्षात घेऊन एखाद्या साथीदाराची तुम्हाला मदत देतील. घरामध्ये एखाद्या सदस्याच्या बाबतीत चिंता निर्माण झाली असेल तर त्यावर मार्ग निघेल.

वृश्चिक काही प्रश्नांनी तुमचे चित्त विचलित झालेले असेल तर असा प्रश्न तात्पुरता मागे पडल्यामुळे तुमचे मन शांत होईल, पण त्यावर खूप काही बेत करू नका. व्यापार-उद्योगात जे काम तुम्ही करणार आहात त्यामध्ये तांत्रिक अडथळे आल्यामुळे तात्पुरता अडसर येईल. नोकरीमध्ये आपण बरे आणि आपले काम बरे असा दृष्टिकोन ठेवा. कोणाला कसलाही सल्ला देऊ नका. घरामध्ये जोडीदाराच्या वागण्यामुळे कोडय़ात पडाल. वादविवाद न घालता तुम्ही थोडा कमीपणा घ्या.

धनू  जी गोष्ट तुम्हाला पाहिजे असते ती मिळाली की तुमच्या इच्छा-आकांक्षा वाढायला सुरुवात होते. त्यामध्ये अडथळे आले की तुम्ही वैराग्याची भाषा बोलू लागाल. या मानसिक संघर्षांतून तुम्ही बाहेर पडलात तर चांगले काम करू शकाल. व्यापार-उद्योगात उत्पन्नाचे प्रमाण वाढविण्यासाठी नवीन व्यक्तींशी हातमिळवणी करावी लागेल. जोडधंद्यातून काम मिळेल. नोकरीच्या ठिकाणी ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ हा कानमंत्र तुम्हाला उपयोगी पडेल.

मकर तुमच्या स्वभावातील दोन वेगवेगळे कंगोरे या आठवडय़ात स्पष्ट होतील. व्यवहारी दृष्टिकोन ठेवून काम करण्याचा प्रयत्न कराल, पण त्या कामात अडथळे आले की, ‘सर्व काही नशिबावर अवलंबून असते’ असे उद्गार तुमच्या तोंडून निघतील. व्यापार-उद्योगात हितसंबंधही महत्त्वाचे असतात याचा प्रत्यय येईल. नोकरीमध्ये नशिबापेक्षा तुमच्या प्रयत्नांवर जास्त अवलंबून राहणे चांगले. घरामध्ये इतरांना तत्त्वज्ञानाचे डोस पाजाल, पण स्वत: स्वच्छंदीपणाने राहाल.

कुंभ एखादा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल. त्यामधला उपाय तुमच्या लक्षात येईल. पण कृती करण्याच्या वेळी माशी िशकण्याची शक्यता आहे. नाराज न होता तुमचे प्रयत्न चालू ठेवा. व्यापार-उद्योगाच्या कामात नवीन संधीचा फायदा घ्यायचे तुम्ही ठरवाल, थोडे प्रयत्न केल्यानंतर तुमच्या असे लक्षात येईल की हा म्हणजे सावलीला पकडण्याचा प्रकार आहे. नोकरी-कामामध्ये सुस्ती येईल. घरामध्ये तुमचे आडमुठेपणाचे धोरण इतरांना आवडणार नाही.

मीन जरा परिस्थिती सुधारली असे वाटून तुम्ही सुस्कारा टाकता तोच काहीतरी बिनसण्याची शक्यता आहे. निराश न होता खंबीरपणे उभे राहा म्हणजे सर्व प्रश्न सुटतील. व्यापाराच्या क्षेत्रात कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. नोकरीच्या ठिकाणी संस्थेत घडणाऱ्या घडामोडींकडे लक्ष ठेवा. प्रवासाच्या वेळी महत्त्वाची कागदपत्रे नीट सांभाळा. घरामध्ये एखाद्या व्यक्तीला तुम्ही चांगला सल्ला द्याल, पण त्या व्यक्तीला तो सल्ला न पटल्याने तुम्हाला वाईट वाटेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com