तालिबान व आयसिस या दहशतवादी संघटना सध्या एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. या दोन संघटनांच्या उभारणी मागे जगातील दोन मोठी राष्ट्रे दडली आहेत. यात तालिबानला अमेरिकेची रसद मिळाली तर आयसिसलाही काही प्रमाणात रशियाची मदत मिळाली. परिणामी या दोन संघटना अमेरिका व रशिया या दोन महासत्तांची अनौरस संतती ठरतात. या विषयाचे गांभीर्य उलगडणाऱ्या आज, शुक्रवारच्या ‘अनौरसांचे आव्हान’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील.

या अग्रलेखावंर विद्यार्थ्यांना मत मांडणे सोपे व्हावे यासाठी ‘लोकसत्ता’ने आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक श्रीकांत परांजपे आणि सुरक्षा विषयक तज्ज्ञ ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांना बोलते केले आहे. त्यांच्या मतांचा विद्यार्थ्यांना मत मांडताना उपयोग होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.