23 February 2019

News Flash

‘जुगाड संस्कृतीचा अंत?’ अग्रलेखावर व्यक्त व्हा

पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल.

आंतरराष्ट्रीय दबावामुळे नवे बौद्धिक संपदा धोरण आखणे आपणास भाग पडले असले तरी त्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदनच केले पाहिजे. यापुढील काळात कल्पनेचे रक्षण करणे हे अधिकाधिक जिकीरीचे होत जाणार आहे. या बदलत्या आव्हानांसाठी कायदेही बदलणे गरजेचे होते. ती गरज या नव्या धोरणामुळे काही अंशी पूर्ण होणार आहे. तसेच उचापती वा जुगाड करून वेळ मारून नेणाऱ्यांना यामुळे आळा बसू शकणार आहे. या विषयावर भूमिका मांडणाऱ्या ‘जुगाड संस्कृतीचा अंत?’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये मत मांडायचे आहे.

पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. या विषयावर ‘लोकसत्ता’ने आयआयटीचे निवृत्त प्राध्यापक उदय आठवणकर आणि बौद्धिक संपदा हक्क विषयातील तज्ञ गणेश हिंगमिरे यांना बोलते केले आहे. त्यांच्या मतांचा विद्यार्थ्यांना आपले मत मांडताना उपयोग होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा

First Published on May 24, 2016 3:12 am

Web Title: comment on loksatta agralekh through blog benchers 2