News Flash

‘लोकसत्ता’मुळेच आर्थिक, सामाजिक आकलन

loksatta blog benchers winner, loksatta, Economic assessments, social assessments

‘लोकसत्ता ब्लॉगबेंचर्स’ उपविजेता राहणे याचे प्रतिपादन
Untitled-5
‘लोकसत्ता’च्या अग्रलेखातील आर्थिक विश्लेषण, सामाजिक माहिती व तटस्थता यामुळे आकलन वाढते. शिवाय सामाजिक विषयांवर व्यक्त होण्यासाठी तरूणांना ‘लोकसत्ता ब्लॉग बेंचर्स’चे प्रभावी माध्यम आता उपलब्ध झाले आहे, असे प्रतिपादन या स्पर्धेतील गेल्या आठवडय़ातील द्वितीय क्रमांकाचा विजेता विजय रहाणे याने केले.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील  रहाणे याने दुसरा क्रमांक मिळविला. सोमवारी कृषी विद्यापीठातच झालेल्या कार्यक्रमात हे पारितोषिक त्याला प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षस्थानी शास्त्रज्ञ डॉ. यु. डी. चव्हाण होते. ‘लोकसत्ता’चे मुख्य वितरक सुभाष भांड आणि प्रतिनिधी उपस्थित होते. प्रमाणपत्र व रोख पाच हजार रूपये, असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.

रहाणे  म्हणाला,   लोकसत्तातील अग्रलेखांमुळेच सामाजिक प्रश्नांवर व्यक्त होण्याची व त्यावर लिखाणाची प्रेरणा मिळाली, पारितोषिकामुळे त्यावर पसंतीचे शिक्कामोर्तब झाल्याचा आनंद मोठा आहे.

कृषी शास्त्रज्ञ डॉ. चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’मुळे विद्यार्थ्यांना वैचारिक व्यासपीठ मिळाले, असे सांगितले.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विजय रहाणे याला  सोमवारी कृषी विद्यापीठातच झालेल्या कार्यक्रमात   पारितोषिक  प्रदान करण्यात आले. शास्त्रज्ञ डॉ. यु. डी. चव्हाण  यावेळी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 3:39 am

Web Title: economic social assessments getting from loksatta said loksatta blog benchers winner
टॅग : Economic
Next Stories
1 पीएच.डी.चा कालावधी हा अनुभव म्हणून ग्राह्य़ 
2 शिक्षक परिषदेतर्फे साखळी उपोषण सुरू
3 अभियांत्रिकी संस्थांतील गैरव्यवहाराबाबत आंदोलनाला अभाविपचाही पाठिंबा
Just Now!
X