खुलेपणाने मांडा तुमची मते
‘लोकसत्ता’ने विद्यार्थ्यांच्या हिताचाच उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व, लिखाणाच्या शैलीवर दूरगामी परिणाम होण्यास मदत होईल. स्पर्धेमुळे विद्यार्थी गांभीर्याने वाचन करून अर्थपूर्ण लिहिण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करतील. नेमकेपणाने विचार मांडण्याची कला ‘ब्लॉग बेंचर्स’च्या माध्यमातून साध्य होईल. ब्लॉग बेंचर्स हा उपक्रम वेगवेगळ्या महाविद्यालयांचे प्राचार्य व्यवस्थितपणे अमलात आणू शकतात. या उपक्रमात भाग घेण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ठरवलेला वयोगट पुरेसा आहे. सध्या तरी आम्ही ‘वॉलपेपर’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून लहान स्वरूपाचे लेख, कविता मागवतो. नंतरच्या एका मोठय़ा पुठ्ठय़ावर चिटकवून सूचना फलकावर ते लावतो. त्या तुलनेत ‘ब्लॉग बेंचर्स’ हा उपक्रम अतिशय मोठा आणि विस्तृत स्वरुपाचा असून ‘लोकसत्ता’मुळे तो जास्तीत जास्त महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास निश्चितपणे मदत होईल.
– डॉ. संजय चरलवार (प्राचार्य, मोहता विज्ञान महाविद्यालय, सक्करदरा, नागपूर)

स्पध्रेत सहभागी होण्यासाठी..
’स्पध्रेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी सुरू झाली असून त्यासाठी
www. loksatta.com /blogbenchers या संकेतस्थळावर भेट द्यावी. नोंदणी
झाल्यावर विद्यार्थी स्पध्रेत सहभागी होऊ शकतात.
’ही स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली असणार आहे. लिखाणातील मुद्दे, त्यांची वैचारिक समज आदींच्या आधारे दर आठवडय़ास दोन विद्यार्थ्यांचे निबंध निवडले जातील.
’यातील पहिल्या निबंधाला सात हजार, तर दुसऱ्या क्रमांकाच्या निबंधाला पाच हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.
’‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर व मुख्य अंकात प्रसिद्धी दिली जाईल. विजेत्यांना त्यांच्याच महाविद्यालयात समारंभात प्राचार्याच्या हस्ते पारितोषिक दिले जाईल.
अधिक माहितीसाठी वाचत राहा ‘लोकसत्ता..’