News Flash

‘लोकसत्ता’चा तरुणाईसाठी मार्गदर्शक उपक्रम -मुग्धा जोशी

‘लोकसत्ता’च्या ‘देखता- मृगजळाचे पूर’ या अग्रलेखावर मुग्धाने ब्लॉग लिहिला होता.

नाशिकच्या मुग्धा जोशी हिला डॉ. एस. एच. कोचरगावकर यांच्या हस्ते प्रथम पुरस्कार देण्यात आला.

आजच्या युवाशक्तीकडे विचार आहेत, पण त्याला योग्य वळण देण्याची गरज आहे. ब्लॉग बेंचर्ससह लोकसत्ताचे सर्व उपक्रम तरूणाईला मार्गदर्शक असल्याचे मत ‘लोकसत्ता ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेती मुग्धा जोशी हिने मांडले. ‘लोकसत्ता’च्या ‘देखता- मृगजळाचे पूर’ या अग्रलेखावर मुग्धाने ब्लॉग लिहिला होता. येथील भोसला सैनिकी महाविद्यालयात मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षांत असणाऱ्या मुग्धाला मंगळवारी प्राचार्या डॉ. एस. एच. कोचरगावकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सात हजार रूपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.आजची तरुणाई केवळ क्रीडा, फॅशन वा चित्रपट यासंबंधीचे वाचन करत नाही, तर जगभरातील सर्व घडामोडींचे आकलन ती तितक्याच तन्मयतेने करते. ‘लोकसत्ता’च्या उपक्रमांमधून तरूणाईला पैलू पाडण्याचे काम होत असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुग्धाने केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 4:02 am

Web Title: loksatta blog benchers prize giving ceremony
Next Stories
1 उत्तर महाराष्ट्र बैठकीच्या नियोजनाविषयी शिवसेनेच्या नेत्यांकडून मार्गदर्शन
2 ‘अशोका बिल्डकॉन’ची ‘ईडी’कडून तपासणी
3 अशोका बिल्डकॉन कार्यालयावर ‘ईडी’चे छापे
Just Now!
X