News Flash

शंकर इगवे, सतीश नवले ‘ब्लॉग बेंचर्स’ विजेते

यंदाचा ‘ऑस्कर’ सोहळा नुकताच पार पडला.

यंदाचा ‘ऑस्कर’ सोहळा नुकताच पार पडला. आत्तापर्यंतच्या सोहळ्यांपेक्षा तो अधिक झगमगाटी, अधिक देदीप्यमान होता असेही नाही. तो नव्हताही. या सोहळ्याने डोळ्यांचे पारणे फिटले असेल, नसेल. पण या सोहळ्यातील सहभागी कलावंतांनी राजकीय भान दाखवीत त्यावर निर्भीड भाष्य करताना पाहून विचारांचे पारणे फिटत होते, हे नि:संशय. चित्रपटातील कचकडय़ाच्या दुनियेत वावरणाऱ्या तितक्याच कचकडय़ाच्या कलाकारांचे सोहळे आणि विचारशक्ती यांचा काही संबंध असतो याचा आपणास अनुभव नाही. म्हणूनच ऑस्करचे मोठेपण उलगडून दाखविणे आवश्यक ठरते.. हा विचार ‘लोकसत्ता’च्या ‘ताठ कण्याचे वर्तमान’ या अग्रलेखात मांडण्यात आला होता. या अग्रलेखावर मत मांडणारा मुंबईतील ‘रुपारेल महाविद्यालया’चा विद्यार्थी शंकर इगवे ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत पहिल्या पारितोषिकाचा विजेता ठरला. तर या स्पर्धेत नाशिकमधील ‘औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालया’चा विद्यार्थी सतीश नवले याने दुसरे पारितोषिक पटकावले.

शंकर यास सात हजार आणि प्रमाणपत्र तर सतीश यास पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार असून या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी www.loksatta.com/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 12:41 am

Web Title: loksatta blog benchers winner 42
Next Stories
1 ब्लॉग बेंचर्सचा नवा विषय ‘ती तगायला हवी..’
2 वैभव मुळीक आणि सौरभ कदम ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते
3 ब्लॉग बेंचर्सचा नवा विषय ‘तंत्राग्नी’
Just Now!
X