News Flash

ब्लॉग बेंचर्स विजेत्याचे सामाजिक औदार्य!

आपल्याच महाविद्यालयात आपल्याला पारितोषिक देण्यात आल्याने आनंद द्विगुणित झाल्याचे प्रबोधने सांगितले.

बक्षिसाची रक्कम ‘नाम फाऊंडेशन’ला

‘देखता मृगजळाचे पूर’ या अग्रलेखावरील लेखन स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मुंबईच्या प्रबोध माणगांवकरला साठय़े महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कविता रेगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पाच हजार आणि प्रमाणपत्र असे या पारितोषिकाचे स्वरुप आहे. विशेष म्हणजे शेतकरी कुटुंबातून मुंबईला शिक्षणासाठी आलेल्या प्रबोधने आपल्याला मिळालेल्या बक्षिसाची पूर्ण रक्कम ‘नाम फाऊंडेशन’ संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे.कोणत्याही विषयाच्या खोलात न जाता, समाज माध्यमांवर उथळपणे व्यक्त होणाऱ्या तरुणवर्गाच्या लेखणीला विधायक वळण देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ‘ब्लॉग बेंचर्स’ या लेखन स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.   प्रबोध याने ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत आपल्या लेखन शैलीतून विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी करत दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. आपल्याच महाविद्यालयात आपल्यालोकसत्ता टीम  ला पारितोषिक देण्यात आल्याने आनंद द्विगुणित झाल्याचे प्रबोधने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 4:01 am

Web Title: loksatta blog benchers winner giving winning price to naam foundation for helping farmer
Next Stories
1 घरखरेदी करताना सावधान!
2 मनसेची गुढीपाडव्याची सभा कायद्याच्या कचाटय़ात
3 मुंबईत पावसाचा शिडकावा; मराठवाडय़ात जोरदार हजेरी
Just Now!
X