News Flash

वर्षां पवार आणि रोशन आळशी ब्लॉग बेंचर्सचे विजेते

राज्यातील बहुतेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत सहभाग वाढत आहे.

नवउद्योगांच्या ‘साथी’वर परखड भाष्य करणाऱ्या ‘तंत्राग्नी’ या अग्रलेखावर तितक्याच रोखठोकपणे भूमिका मांडणारी ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’ची वर्षां पवार ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत पहिल्या पारितोषिकाची विजेती ठरली आहे. तर, या स्पर्धेत मुंबईच्या ‘रामनारायण रुईया महाविद्यालया’चा रोशन आळशी याने दुसरे पारितोषिक पटकावले.

‘तंत्राग्नी’ अग्रलेखावर मत मांडणाऱ्या वर्षां आणि रोशन यांनी दर्जेदार लेखन करीत ‘ब्लॉग बेंचर्स’स्पर्धेत बाजी मारली आहे. वर्षां हिला सात हजार रुपये आणि प्रमाणपत्र तर रोशन यास पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल. या अग्रलेखावर व्यक्त होताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विचारी वृत्तीला चालना देत उत्तम लेखन केले.

राज्यातील बहुतेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत सहभाग वाढत आहे. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. यात

प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते.

विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षक तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी

होऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना www.loksatta.com/Blogbenchers  या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 12:56 am

Web Title: loksatta blog benchers winners varsha pawar
Next Stories
1 ब्लॉग बेंचर्सचा नवा विषय ‘मी तो केवळ भारवाही..’
2 शांतता म्हणजेच मूकसंमती
3 शंकर इगवे, सतीश नवले ‘ब्लॉग बेंचर्स’ विजेते
Just Now!
X