विजेत्या प्रज्ञा लांडे हिचे मत; प्रणव खाडे याला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान

‘लोकसत्ता’च्या ‘ब्लॉग बेंचर्स’ या उपक्रमांतर्गत लिहिण्याचा आगळावेगळा अनुभव मिळाला, लेखनाची प्रेरणा मिळाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात ‘लोकसत्ता’विषयी आगळेवेगळे स्थान निर्माण झाल्याचे मत मॉरिस महाविद्यालयातील पदव्युत्तर संस्कृत विभागाची विद्यार्थीनी प्रज्ञा बबनराव लांडे हिने व्यक्त केले.

‘ब्लॉग बेंचर्स’ उपक्रमांतर्गत ‘जुगाड संस्कृतीचा अंत’ हा अग्रलेखावरील स्पर्धेत  महाराष्ट्रातून तिचा पहिला क्रमांक आला. त्यानिमित्त सत्काराचा  कार्यक्रम महाविद्यालयाच्या स्वातंत्र्य भवनात आयोजित करण्यात आला.भावाचे प्रोत्साहन आणि घराजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयातून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये मत व्यक्त करणे शक्य झाल्याचे प्रज्ञाने सांगितले. यावेळी संचालक डॉ. भाऊ दायदार यांच्या हस्ते ७ हजार रुपयांचा धनादेश, पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र प्रदान करून तिला गौरवण्यात आले.

‘जुगाड संस्कृतीचा अंत’ या अग्रलेखावरील स्पध्रेत हिंगोलीच्या  प्रणव सुभाषराव खाडे याने दुसरा क्रमांक पटकावला. त्याला ५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

दखल आनंददायी-प्रणव

िहगोली : ब्लॉग बेंचर्समुळे वेगवेगळ्या विषयांवर विचार मांडता येतात आणि त्याची दखल घेतली जाते ही बाब आनंददायी आहे, असे प्रणव खाडे याने सांगितले.

लोकसत्ता ब्लॉग बेंचर्स स्पर्धेत ‘जुगाड संस्कृतीचा अंत? या विषयावर येथील आदर्श महाविद्यालयातील विद्यार्थी प्रणव खाडे याने दुसरे बक्षीस मिळवले. या विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉ. बी. एन. बर्वे, शिक्षण संस्थेचे सचिव रमेशचंद्र बगडिया यांच्या हस्ते सत्कार करून ५ हजार रुपयांचे बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले. मार्च महिन्यातही ‘बेदिलीचे बादल’ या अग्रलेखावरील स्पध्रेत प्रणवने दुसरे बक्षीस मिळवले होते. ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ या वक्तृत्व स्पध्रेच्या औरंगाबाद विभागीय फेरीतही प्रणवने तिसरा क्रमांक मिळवला होता.

वाचन संस्कृती विकसित होऊन विचारात सुस्पष्टता येण्यास, तसेच स्पर्धा परीक्षेसाठी वाचनाचे महत्त्व आहे. गुणी विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचे काम ‘लोकसत्ता’ने केले, असे गौरवपूर्ण उद्गार  प्राचार्य बर्वे यांनी काढले.शिक्षण संस्थेचे सचिव  बगडिया यांनीही  प्रणवला २ हजार १०० रुपयांचे रोख बक्षीस प्राचार्याच्या हस्ते दिले.