विचार करण्याची आणि तो मुद्देसूद मांडण्याची सवय ‘लोकसत्ता’मुळे लागली – स्पर्धेतील विजेत्यांची भावना

Neha Hiremath murder case to be transferred to CID
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध
gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
How many candidates appeared in the last offline set exam The set will be held twice a year
शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेला किती उमेदवारांची उपस्थिती? सेट वर्षातून दोनवेळा होणार?
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

‘आतापर्यंत वाचक होतोच. आता ‘लोकसत्ता’ने लिहितेही केले. आपला विचार करण्याची आणि तो मुद्देसूद मांडण्याची सवय ‘लोकसत्ता’मुळे लागली,’ अशा भावना पहिल्याच आठवडय़ातील ‘ब्लॉगबेंचर्स’ नी व्यक्त केल्या. ‘लोकसत्ता ब्लॉगबेंचर्स’ या स्पर्धेच्या पहिल्या आठवडय़ात प्रथम क्रमांक मिळवणारी कराड येथील प्रजन्या कदम आणि पुण्यातील राजस लिमये यांना त्यांच्या महाविद्यालयाच्या प्राचार्याच्या हस्ते गुरुवारी पारितोषिक देण्यात आले.

‘लोकसत्ता ब्लॉगबेंचर्स’ या स्पध्रेत पहिल्या आठवडय़ात कराडच्या शासकीय तंत्रनिकेतनाची विद्यार्थिनी प्रजन्या कदम हिने प्रथम क्रमांक पटकावला. संगणक पदविका अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षांत शिकणाऱ्या प्रजन्याला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आर. जे. बलवान यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सात हजार रुपयांचा धनादेश असे पारितोषिक देण्यात आले.

‘लोकसत्ताने दिलेल्या संधीमुळे विद्यार्थिनी आपले अभ्यासपूर्ण लिखाण राज्यस्तरावर प्रभावीपणे मांडू शकली. अशा उपक्रमांमुळे तरुणांच्या वैचारिक व अभ्यासपूर्ण विचारमंथनाला चालना मिळेल,’ अशा भावना बलवान यांनी व्यक्त केल्या.

या वेळी प्रभारी उपप्राचार्य बी. व्ही. पालमपल्ली, प्रजन्याचे वडील महादेव कदम, आई अर्चना कदम आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे पुण्याच्या स. प. महाविद्यालयांत राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीचे (एमए) शिक्षण घेणाऱ्या राजस लिमये या विद्यार्थ्यांने राजसला महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पाच हजार रुपयांचा धानदेश असे पारितोषिक देण्यात आले.

दहावीनंतर मी लोकसत्ताची वाचक झाले. मोठय़ा भावाने लोकसत्ता कायम वाचनात ठेवण्याचे सुचवले आणि वाचता वाचता मी आज लिहिती झाले. लोकसत्तामधील अर्थकारण व देश-विदेश या संदर्भातील बातम्या व लेख गांभीर्याने वाचून त्याचा अभ्यास करणे हा छंदच झाला आहे. ‘लोकसत्ता ब्लॉगबेंचर्स’मधील माझ्या लिखाणाची घेतली गेलेली दखल मला निश्चित प्रोत्साहन देणारी आहे.

प्रजन्या कदम

विचाराला वेगळी दिशा लोकसत्तामुळे मिळत गेली. मी यापुढेही या स्पर्धेत लिहिणार आहे. किंबहुना आता अधिक प्रयत्न करून प्रथम क्रमांकाच्या दर्जाचे लेखन करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पारितोषिकाचा आनंद तर आहेच. त्याचबरोबर दर आठवडय़ासाठी नवे आव्हानही आहे.’’

राजस लिमये