खुलेपणाने मांडा तुमची मते
murlidhar‘ब्लॉग बेंचर्स’ उपक्रमातून मुले विश्लेषणात्मक विचार करायला प्रवृत्त होतील. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांचे विकसित विचार पुढे येतील. अशा प्रकारची चळवळ उभी करण्याच्या दृष्टीने ‘लोकसत्ता’ने टाकलेले पाऊल स्वागतार्ह आहे. दुसरे म्हणजे मुले वाचन करीत नाहीत, असे म्हणून त्यांना कमी लेखून चालणार नाही. काही मुले ‘एक्स्ट्रा ऑर्डिनरी’ही असू शकतात. जे नाहीत त्यांना विचार प्रवृत्त करायला लावणारी ही स्पर्धा आहे. विद्यार्थ्यांनाही त्यांची वैचारिक पातळी वाढवण्यास मदत होईल. त्यांच्यात समीक्षण वृत्ती वाढेल. आजच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांची विश्लेषणात्मक विचारक्षमताच विकसित होत नाही. तो दिलेला अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने पाठ करतो आणि लिहितो. त्याला एखाद्या विषयावर प्रतिक्रिया लिहायची आहे, असे जरी लक्षात आले तरी तो वाचेल. व्यक्त होईल. लिहिते होण्याची, विश्लेषणात्मक विचार करण्याची संधी महाविद्यालयीन जीवनापासून विकसित होऊन त्याची चळवळ होण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल ठरणार आहे. – डॉ. मुरलीधर चांदेकर, प्राचार्य, व्हीएमव्ही महाविद्यालय, वर्धमाननगर, नागपूर

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी..
* स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी सुरू झाली असून त्यासाठी
indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळावर भेट द्यावी. नोंदणी झाल्यावर विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
* ही स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली असणार आहे. लिखाणातील मुद्दे, त्यांची वैचारिक समज आदींच्या आधारे दर आठवडय़ास दोन विद्यार्थ्यांचे निबंध निवडले जातील.
* यातील पहिल्या निबंधाला सात हजार, तर दुसऱ्या क्रमांकाच्या निबंधाला पाच हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.
* ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर व मुख्य अंकात प्रसिद्धी दिली जाईल. विजेत्यांना त्यांच्याच महाविद्यालयात समारंभात प्राचार्याच्या हस्ते पारितोषिक दिले जाईल.
अधिक माहितीसाठी वाचत राहा ‘लोकसत्ता..’