खुलेपणाने मांडा तुमची मते
‘लोकसत्ता’च्या ‘ब्लॉगबेन्चर्स’ या उपक्रमाविषयी ऐकल्यापासून आम्ही तो आमच्या महाविद्यालयात राबविण्याविषयी खूपच उत्सुक आहोत. अर्थात हेही खरेच की आता एखाद्या विषयावर विचारपूर्वक लिहिणारी मुले आम्हाला शोधावी लागणार आहेत. कारण, सध्या मुले व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाच्या व्यासपीठालाच पसंती देऊ लागली आहेत. परंतु सोशल मीडियाच्या स्वरूपामुळे या व्यक्त होण्यालाही मर्यादा आहेत. त्यामुळे, चांगले लिहिणारी मुले खरेच शोधावी लागतील. अर्थात आमच्याकडे अनेक मराठी मुले आहेत. आम्ही आमच्या शिक्षकांच्या मदतीने असे विद्यार्थी शोधू आणि त्यांना लिहिते करू. कारण, एखाद्या विषयाला नाण्याप्रमाणे दोन बाजू असतात. त्याचा दोन्ही बाजूने विचार करण्याची सवय या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना लागेल. त्या निमित्ताने ते संदर्भ साहित्य वाचतील. आपापसात चर्चा करतील. भाष्य करतील. हा निश्चितच स्तुत्य उपक्रम आहे. त्यासाठी महाविद्यालयातील जाणकार शिक्षकांना मागदर्शक म्हणून नेमले जाईल. – दिलीप कामत, प्राचार्य, मिठीबाई कला, विज्ञान, वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय, विलेपार्ले

स्पध्रेत सहभागी होण्यासाठी..
* स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी सुरू झाली असून त्यासाठी
www. loksatta.com /blogbenchers  या संकेतस्थळावर भेट द्यावी. नोंदणी झाल्यावर विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

* ही स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली असणार आहे. लिखाणातील मुद्दे, त्यांची वैचारिक समज आदींच्या आधारे दर आठवडय़ास दोन विद्यार्थ्यांचे निबंध निवडले जातील.

* यातील पहिल्या निबंधाला सात हजार, तर दुसऱ्या क्रमांकाच्या निबंधाला पाच हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.

* ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर व मुख्य अंकात प्रसिद्धी दिली जाईल. विजेत्यांना त्यांच्याच महाविद्यालयात समारंभात प्राचार्याच्या हस्ते पारितोषिक दिले जाईल.
अधिक माहितीसाठी वाचत राहा ‘लोकसत्ता..’