खुलेपणाने मांडा तुमची मते
आधुनिक तंत्रज्ञान आणि लेखन यांचा उत्तम मिलाफ साधणारा ‘लोकसत्ता ब्लॉग बेंचर्स’ हा उपक्रम स्वागतार्ह आहे. या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थी नव्या तंत्रज्ञानाशी जोडले जातील. शिवाय, त्यांना लेखन कौशल्य अधोरेखित करण्यासाठी व्यासपीठही उपलब्ध झाले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये कोणी खेळात प्रावीण्य मिळवतो, कोणी वक्तृत्व तर कोणी इतर स्पर्धामध्ये ठसा उमटवितात. वक्तृत्व स्पर्धेत विषय मांडताना सखोल माहिती घेऊन ते अभ्यास करतात. दोन्ही बाजू समोर मांडतात. काही विद्यार्थी स्वत:हून आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध करण्याचा प्रयत्न करतात. अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचा आपोआप विकास होईल. त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांना बळ देणारा ठरेल. विद्यार्थ्यांच्या मेंदूला खाद्य हवे. स्पर्धेत लेखातून समोर येणारे बहुतांश विषय चालू घडामोडींशी निगडित असतील. लेख व त्यावर तज्ज्ञांनी मांडलेले मत यामुळे विद्यार्थ्यांना त्या विषयाचा सर्वागीण अभ्यास करता येईल. त्यामुळे त्यांची प्रगल्भता वाढण्यास मदत होईल. आमच्या महाविद्यालयातर्फे आवश्यक ते सहकार्य देऊन अधिकाधिक विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील, असा प्रयत्न केला जाईल.

Untitled-25

– डॉ. दिलीप धोंडगे
(प्राचार्य, केटीएचएम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नाशिक)

 

स्पध्रेत सहभागी होण्यासाठी..
* स्पध्रेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी सुरू झाली असून त्यासाठी
www. loksatta.com /blogbenchers या संकेतस्थळावर भेट द्यावी. नोंदणी झाल्यावर विद्यार्थी स्पध्रेत सहभागी होऊ शकतात.
* ही स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली असणार आहे. लिखाणातील मुद्दे, त्यांची वैचारिक समज आदींच्या आधारे दर आठवडय़ास दोन विद्यार्थ्यांचे निबंध निवडले जातील.
* यातील पहिल्या निबंधाला सात हजार, तर दुसऱ्या क्रमांकाच्या निबंधाला पाच हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.
* ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर व मुख्य अंकात प्रसिद्धी दिली जाईल. विजेत्यांना त्यांच्याच महाविद्यालयात समारंभात प्राचार्याच्या हस्ते पारितोषिक दिले जाईल.

अधिक माहितीसाठी वाचत राहा ‘लोकसत्ता..’