भुजबळ व मल्या यांच्यासंबंधी अग्रलेखावर व्यक्त होण्याची संधी
महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपांमुळे अटकेत असलेले छगन भुजबळ व हजारो कोटींचे कर्ज थकवून पलायन केलेला उद्योगपती विजय मल्या या दोघांना देशातील हिशेबशून्य व्यवस्थेने दिलेले अभय आणि माया जमा करताना लाभलेली राजकारण्यांची साथ यावर सडेतोड भाष्य करणाऱ्या ‘सडक्यातले किडके’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉगबेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

छगन भुजबळांवर कारवाई होणे ही सर्वपक्षीय नेत्यांची सोय असून अशी कारवाई झाली म्हणजे भ्रष्टाचारविरोधातील साफसफाईला सुरुवात झालेली नाही, यावर या अग्रलेखात प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच, कर्ज थकवून गेलेला मल्या व अटकेतील भुजबळ हे ज्या हिशेबशून्य व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतात ते हिशेबशून्यत्व सर्व पक्षीय असल्याचे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे. या आठवडय़ाच्या ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये विद्यार्थ्यांना याच विषयावर आपली भूमिका मांडायची आहे.
तत्पूर्वी याच विषयावर माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि एआयबीईए या बँकांशी निगडित संघटनेचे सरचिटणीस विश्वास हुडगी यांना ‘लोकसत्ता’ने बोलते केले आहे. त्यांच्या मांडणीचा विद्यार्थ्यांना आपली भूमिका अधिक सुस्पष्टपणे मांडण्यास उपयोग होईल.

लक्षात ठेवावे असे..
* प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते.
* मते नोंदविण्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत.
* indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळावर स्पर्धेतील सहभागासंबंधी माहिती उपलब्ध.
* ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते.
* नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉगइन करून विद्यार्थ्यांना आपली भूमीका मांडता येते.
* किमान २५० शब्द व मराठीतील लेखनाचाच स्पर्धेसाठी विचार केला जाईल.
सहभागी होताना अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी ’‘loksatta.blogbenchers@expressindia.com  या ई-मेलवर संपर्क साधावा.