वाजपेयी व नंतर मनमोहन सिंग सरकारने काश्मीरमधील सर्व गटांशी चर्चा सुरू ठेवल्याने १५ वष्रे काश्मीर शांत होते. मात्र आता मोदी सरकारच्या धोरणामुळे तेथे पुन्हा गोंधळ सुरू झाला आहे असे स्पष्ट मत ‘कणखर की आडमुठे?’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ब्लॉग लिहायचा आहे.

गेल्या आठवडय़ात दगडफेक करणाऱ्या कोवळय़ा मुलीचे छायाचित्र जगातील सर्व प्रमुख वृत्तपत्रे आणि वाहिन्यांनी प्रसुत केले आणि काश्मिरातील परिस्थिती किती हाताबाहेर जात आहे, त्यावर भाष्य केले. पाकिस्तानला नेमके हेच हवे आहे. या प्रश्नाचे जितके जास्त आंतरराष्ट्रीयीकरण होईल तितके ते पाकिस्तानच्या पथ्यावर पडणारे असेल. जम्मू काश्मीरचे हे आंतरराष्ट्रीयीकरण भारताच्या लोकशाही दाव्यांवर अविश्वास दाखवणारे असेल हेही आपण लक्षात घेतलेले बरे. तेव्हा या प्रश्नावर आपले सरकार पाकिस्तानशी चर्चा करण्याची तयारी दाखवते, पण आपल्या काश्मिरींशी मात्र बोलण्यास नकार देते हे चित्र आपल्याविषयी काही अरे सांगणारे नाही, असे या अग्रलेखात व्यक्त करण्यात आली आहे. पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना मत नोंदविता येईल. हे लेख https://loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील.

या लेखन स्पर्धेसाठी या वेळी ‘कणखर की आडमुठे?’ हा अग्रलेख देण्यात आला आहे. प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना भूमिका मांडता येते.