अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदाचे बोलले. छोटय़ा-मोठय़ा कलाकाराच्या वाढदिवशी शुभेच्छा ट्वीट करणारे, मोठय़ा देशांच्या प्रमुखांना स्वत:च बिलगणारे, ‘मन की बात’ साऱ्या जगाला सांगणारे असे आपले बहुबोलके पंतप्रधान गोप्रेमींच्या हिंस्र धुडगुसावर सातत्याने मौन बाळगत होते. ते मौन त्यांनी आज अखेर सोडले आणि त्यांनी गोरक्षकांना का खडसावले. यामुळे आता पुढच्या परदेश दौऱ्यात कोणी समजा त्यांना विचारलेच की तुमच्या देशात गोरक्षणावरून इतका हिंसाचार सुरू आहे आणि तुम्हीच काहीच कसे करीत नाही तर आपले पंतप्रधान या खडसावण्याचा दाखला देत ताठ मानेने म्हणू शकतील मी नाही त्यातला असे मत मांडणारा आज प्रसिद्ध झालेला ‘मी नाही त्यातला!’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेन्चर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

या स्पर्धेअंतर्गत पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल.  हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील.

वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉग बेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी दर आठवडय़ाला एक अग्रलेख निवडला जातो. त्यावर विद्यार्थ्यांनी आपले भाष्य करायचे असते. या आठवडय़ाकरिता ‘मी नाही त्यातला!’ या अग्रलेखाची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे.

लक्षात ठेवावे असे..

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी

l loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.