कोणीही कोणाचीही हत्या करणे वाईटच. कोणतीही हत्या मानवतेला काळिमाच फासणारी. परंतु प्रश्न असा की किमान नियमदेखील आपण पाळणार की नाही? आपल्या नियंत्रणाखाली नसलेल्या दहशतवाद्यांना आपण रोखू शकत नाही तर निदान नियंत्रणाखाली असलेल्या भक्तांना शिस्त लावण्याचे प्रयत्न व्हायला हरकत नव्हती. ते झाले नाही; म्हणून हे जीव अकारण गेले.. तिसऱ्या जगाच्या इतिहासात देवाधर्माच्या यात्रांत जितक्यांनी प्राण गमावले तितके बळी आतापर्यंतच्या युद्धांतही गेले नसतील, अशी टिपण्णी बुधवारी प्रसिद्ध झालेला ‘तीर्थी धोंडा पाणी..’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

या स्पर्धेअंतर्गत पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल.  हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी दर आठवडय़ाला एक अग्रलेख निवडला जातो. त्यावर विद्यार्थ्यांनी आपले भाष्य करायचे असते. या आठवडय़ाकरिता ‘तीर्थी धोंडा पाणी..’ या अग्रलेखाची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे मत नोंदविणे सोपे जावे यासाठी लोकसत्ताने अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अविनाश पाटील यांना बोलते केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers  या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना भूमिका मांडता येते.