कोणतेही सरकार प्रतीकात्मकतेलाच महत्त्व देणारे असल्याने कोसळत्या बाजारातून परावर्तित होणाऱ्या नकारात्मक संदेशास ते घाबरत असते; म्हणून बाजार चढता राहिलेला बरा. कारण बाजार ही एक नशा आहे. सच्चा नशेकरी एका नशेतून बाहेर आल्यावर दुसऱ्या नशेच्या शोधात असतो. बाजाराचे तसे असते. भांडवली बाजाराच्या उसळीने सर्वसामान्यांनी हुरळून जाण्याचे कारण नाही. वास्तव वेगळे आहे. पण ते दिसू न देण्यात बाजारास लागलेल्या कोल्हे-लांडग्यांचे हितसंबंध असतात. सुशिक्षितांनी ते समजून घ्यायला हवे, इतकेच, असे मत बुधवारी प्रसिद्ध झालेला ‘लांडगे आणि कोल्हे’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

या स्पर्धेअंतर्गत पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल.  हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉग बेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी दर आठवडय़ाला एक अग्रलेख निवडला जातो. त्यावर विद्यार्थ्यांनी आपले भाष्य करायचे असते. या आठवडय़ाकरिता ‘लांडगे आणि कोल्हे’ या अग्रलेखाची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे मत नोंदविणे सोपे जावे यासाठी ‘लोकसत्ता’ने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अविनाश पाटील यांना बोलते केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना भूमिका मांडता येते.