27 May 2020

News Flash

ब्लॉग बेंचर्सचा नवा विषय ‘आले राजे, गेले राजे’

आता त्याच राजमातांची कन्या इंदिरा गांधी यांनी केलेली चूक करू पाहते हा इतिहासाने घेतलेला सूड म्हणता येईल.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

विचारस्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या ‘त्या’ आणीबाणीच्या विरोधात लढणाऱ्यांत वसुंधराराजे यांच्या मातोश्री विजयाराजे शिंदे या आघाडीवर होत्या. आता त्याच राजमातांची कन्या इंदिरा गांधी यांनी केलेली चूक करू पाहते हा इतिहासाने घेतलेला सूड म्हणता येईल. या मुद्याचा विसर वसुंधराराजे यांना पडला तरी हरकत नाही. परंतु असा निर्णय घेणाऱ्या इंदिरा गांधी यांची पुढे किती राजकीय वाताहत झाली, हे त्यांनी विसरू नये. पुढे याच इंदिरा गांधी यांचे सुपुत्र राजीव गांधी यांनाही १९८८ साली प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करणाऱ्या कायद्याची गरज वाटली. तसा कायदा आणण्याचा प्रयत्न त्यांनी करून पाहिला. तद्नंतर त्यांचीही किती राजकीय दुर्दशा झाली हे राजे यांनी आठवावे. या दोन्हींचा अर्थ इतकाच की प्रसारमाध्यमांची गळचेपी करण्यात वेळ घालवणाऱ्या राजकारण्यांचे भविष्य तितकेसे उज्ज्वल नसते. याचे कारण तो हे विसरतो की प्रसारमाध्यमे ही केवळ निरोप्याचे काम करतात. हा निरोप दुहेरी असतो. सत्ताधारी आणि सर्वसामान्य जनता यांच्यासाठी तो असतो. या निरोपातील मजकूर चांगला असावा असे वाटत असेल तर मुळात सरकारी कृती तशी चांगली हवी. कृती, परिणाम वाईट असूनही निरोप चांगलाच असावा असे असू शकत नाही. पूर्वीच्या काळी वाईट बातमी घेऊन येणाऱ्याचा शिरच्छेद करण्याचा आदेश चक्रम राजे देत. आज या राजे प्रसारमाध्यमांची अशी अवस्था करू इच्छितात. त्यांनी लक्षात ठेवायचे ते इतकेच की ‘ती’ राजेशाही गेली. ही राजेशाही काही अमरपट्टा घेऊन आलेली नाही. या देशात स्वत:स राजे मानणारे कित्येक आले आणि गेलेही. प्रसारमाध्यमे मात्र कायम आहेत. या विषयावर सांगोपांग विवेचन ‘आले राजे, गेले राजे’ या अग्रलेखात करण्यात आले आहे. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेन्चर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे. या स्पर्धेअंतर्गत पुढच्या गुरुवारपर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल.

वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी दर आठवडय़ाला एक अग्रलेख निवडला जातो. त्यावर विद्यार्थ्यांनी आपले भाष्य करायचे असते. या आठवडयमकरता ‘आले राजे, गेले राजे’ या अग्रलेखाची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना www.loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com  मेलवर संपर्क साधावा.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2017 1:18 am

Web Title: share your opinion on loksatta blog benchers 127
Next Stories
1 ‘ब्लॉग बेंचर्स’चा नवा विषय ‘लिमिटेड माणुसकी’
2 ब्लॉग बेंचर्सचा नवा विषय ‘मी आणि माझे’
3 स्वप्नाली सासवडे, शेख रुबीन शेख मौला ब्लॉग बेंचर्सचे विजेते
Just Now!
X