सर्वोच्च न्यायालयाचा आदेश न जुमानता, अस्मितेच्या नावाने राजकारण करण्याची पंजाब सरकारची सध्याची कृती ही गंभीर आहे. कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी ज्या सरकारवर आहे, त्या पंजाबच्या प्रकाशसिंग बादल सरकारनेच अधिकृतपणे कायदेभंगाचा पण केला असून ही परिस्थिती आपला अराजकाकडे सुरू असलेला प्रवास अधोरेखित करते. या मुद्दय़ावर रोखठोकपणे भाष्य करणाऱ्या ‘बेदिलीचे बादल’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.
पंजाब व हरयाणा यांच्यातील पाणीवाटप करार न्यायप्रविष्ट असून सध्या ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देऊनही पंजाब सरकार तो मानावयास तयार नाही, यावर या अग्रलेखात प्रकाश टाकण्यात आला आहे. पंजाब विधानसभेने आमच्या अस्मितेस आव्हान देणाऱ्या कोणाचेही आदेश पाळणार नसल्याचा ठरावही पारित केला आहे. ३१ मार्चला या विषयावर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार असून ही परिस्थिती ‘जैसे थे’ राखण्याची जबाबदारी केंद्रातील मोदी सरकारची आहे. मात्र, केंद्र मूग गिळून गप्प असल्याने देशावर जमून आलेले बेदिलीचे ‘बादल’ अधिक गहिरे होण्याची भीती या अग्रलेखात व्यक्त करण्यात आली आहे. या आठवडय़ाच्या ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये विद्यार्थ्यांना याच विषयावर आपली भूमिका मांडायची आहे.
तत्पूर्वी या विषयावरील तज्ज्ञ म्हणून जलसंपदा विभागाचे निवृत्त महासंचालक व महाराष्ट्र सिंचन सहयोग संस्थेचे अध्यक्ष नाशिक येथील दि. मा. मोरे व ‘लोकसत्ता’चे साहाय्यक संपादक संतोष प्रधान यांना ‘लोकसत्ता’ने बोलते केले आहे. या दोघांनीही या विषयावर वेगवेगळ्या बाजूंनी प्रकाश टाकला आहे. त्यांच्या मांडणीचा विद्यार्थ्यांना आपली भूमिका अधिक सुस्पष्टपणे मांडण्यास उपयोग होईल. या लेखन स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्यांच्या निर्भीड लेखणीला वाट करून देणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातील विद्यापीठांची व महाविद्यालयांचीही मोलाची साथ लाभली आहे.

लक्षात ठेवावे असे..
* प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते.
* मते नोंदविण्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत.
* indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळावर स्पर्धेतील सहभागासंबंधी माहिती उपलब्ध.
* ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते.
* नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉगइन करून विद्यार्थ्यांना आपली भूमीका मांडता येते.
* किमान २५० शब्द व मराठीतील लेखनाचाच स्पर्धेसाठी विचार केला जाईल.
सहभागी होताना अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी oksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.

* महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक शैक्षणिक पातळीवर जे काही सर्वोत्तम सुरू आहे त्यासाठी विधी अर्थात, कायदा करता येईल, पण निधी कुठून आणणार?, असा प्रश्न विद्यापीठ शिक्षणमंचचे पदाधिकारी डॉ. दीपक धोटे यांनी विचारला आहे.
* ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी असे सुचविले आहे की, विद्यापीठांनी प्रथम स्वतला सक्षम बनवून नंतरच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी करार करावा.