चित्रपटांवरील बंदीने काही जणांना विजयोत्सव साजरा करण्याइतका आनंद होत असेलही. तो त्यांच्या समजुतीचा भाग झाला; परंतु या अशा समजुती असलेल्यांचे प्राबल्य वाढणे हे महासत्तापदाचे स्वप्न पाहणाऱ्या देशास शोभून दिसणारे नाही; किंबहुना अशा बंदिस्त विचारांचा प्रदेश महासत्तापदास पोहोचणे अशक्य असते. यास अपवाद असलाच तर तो चीनचा. तेव्हा ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ या चित्रपटांचे भवितव्य सरकारने जनतेच्या हाती सोडून मोठे झाल्याचे दाखवून द्यावे. या विषयावर सांगोपांग विवेचन १५ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘मोठे कधी होणार?’ या अग्रलेखात करण्यात आले आहे. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये पुढच्या गुरुवापर्यंत व्यक्त व्हायचे आहे. मत मांडणे सोपे जावे यासाठी चित्रपट समीक्षक व अभ्यासक गणेश मतकरी यांना लिहिते केले आहे. त्यांच्या मतांचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.