खुलेपणाने मांडा तुमची मते

Untitled-26 ‘‘लोकसत्ताचा हा स्तुत्य उपक्रम आहे. माध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटला जातो, पण तो का हे विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून कळू शकेल. सध्या चर्चेत असणारे आणि रोजच्या जीवनावर परिणाम करणारे ‘स्मार्ट सिटी’ सारखे विषय, अर्थकारणातील घडामोडी यांबाबत विद्यार्थ्यांची उत्सुकता नक्कीच या उपक्रमामुळे वाढेल आणि ते त्याची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतील. विद्यार्थी विचारप्रवृत्त झाला की त्यावर व्यक्त होण्याची गरज विद्यार्थ्यांनाच वाटू लागते. मुळात मुलांना विचार करण्याची सवय लागणे हे आवश्यक आहे. विचार आपल्या भाषेत मांडणे, समोरच्यापर्यंत पोहोचवणे, त्यावरील प्रतिक्रियांना सामोरे जाणे ही प्रक्रिया अशा एखाद्या उपक्रमाच्या माध्यमातूनच पूर्ण होऊ शकते. यामुळे लोकशाहीची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजतील. त्याच वेळी एखाद्या विषयावर व्यक्त होताना गरजेची असणारी सावधगिरी, जबाबदारी यांची जाणीव विद्यार्थ्यांना होईल. पारितोषिक हा दुय्यम मुद्दा आहे. पण या स्पर्धेमुळे आपोआपच वाचन, त्यावर विचार आणि त्याचे लेखन अशी शिस्त विद्यार्थ्यांना लागू शकेल.’’
– प्राचार्य चंद्रकांत रावळ, बीएमसीसी

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी..
* स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी सुरू झाली असून त्यासाठी
indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळावर भेट द्यावी. नोंदणी झाल्यावर विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
* ही स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली असणार आहे. लिखाणातील मुद्दे, त्यांची वैचारिक समज आदींच्या आधारे दर आठवडय़ास दोन विद्यार्थ्यांचे निबंध निवडले जातील.
* यातील पहिल्या निबंधाला सात हजार, तर दुसऱ्या क्रमांकाच्या निबंधाला पाच हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.
* ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर व मुख्य अंकात प्रसिद्धी दिली जाईल. विजेत्यांना त्यांच्याच महाविद्यालयात समारंभात प्राचार्याच्या हस्ते पारितोषिक दिले जाईल.
अधिक माहितीसाठी वाचत राहा ‘लोकसत्ता..’