आंतरराष्ट्रीय दबावामुळे नवे बौद्धिक संपदा धोरण आखणे आपणास भाग पडले असले तरी त्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदनच केले पाहिजे. यापुढील काळात कल्पनेचे रक्षण करणे हे अधिकाधिक जिकीरीचे होत जाणार आहे. या बदलत्या आव्हानांसाठी कायदेही बदलणे गरजेचे होते. ती गरज या नव्या धोरणामुळे काही अंशी पूर्ण होणार आहे. तसेच उचापती वा जुगाड करून वेळ मारून नेणाऱ्यांना यामुळे आळा बसू शकणार आहे. या विषयावर भूमिका मांडणाऱ्या ‘जुगाड संस्कृतीचा अंत?’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये मत मांडायचे आहे.
पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. या विषयावर ‘लोकसत्ता’ने आयआयटीचे निवृत्त प्राध्यापक उदय आठवणकर आणि बौद्धिक संपदा हक्क विषयातील तज्ञ गणेश हिंगमिरे यांना बोलते केले आहे. त्यांच्या मतांचा विद्यार्थ्यांना आपले मत मांडताना उपयोग होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.

indian economy marathi news
UNCTAD: भारताची अर्थव्यवस्था २०२४ मध्ये किती टक्क्यांनी वाढणार? संयुक्त राष्ट्राचा अहवाल जाहीर; व्याजदराचाही उल्लेख!
The report of the National Human Rights Commission condemned the violation of human rights under the message
संदेशखालीत मानवाधिकारांचे उल्लंघन! राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अहवालात ठपका
mpsc Mantra  Current Affairs Question Analysis
mpsc मंत्र : चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण
Bhiwandi lok sabha
महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?