तालिबान व आयसिस या दहशतवादी संघटना सध्या एकमेकांविरोधात उभ्या आहेत. या दोन संघटनांच्या उभारणी मागे जगातील दोन मोठी राष्ट्रे दडली आहेत. यात तालिबानला अमेरिकेची रसद मिळाली तर आयसिसलाही काही प्रमाणात रशियाची मदत मिळाली. परिणामी या दोन संघटना अमेरिका व रशिया या दोन महासत्तांची अनौरस संतती ठरतात. या विषयाचे गांभिर्य उलगडणाऱ्या आजच्या ‘अनौरसांचे आव्हान’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.
अग्रलेखाच्या विषयावरील भाष्य – श्रीकांत परांजपे, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक आणि ब्रिगे. (निवृत्त) हेमंत महाजन, संरक्षणविषयक तज्ज्ञ
मुदत – येत्या गुरुवारपर्यंत
स्पर्धेत सहभागासाठी – indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यावी.
‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच असलेल्या ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडावी. या ठिकाणी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते.
नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉग-इन करून विद्यार्थ्यांना आपले भूमिका मांडता येते. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास संपर्कासाठी : loksatta.blogbenchers@expressindia.com