‘ब्लॉग बेंचर्स’ना विचार मांडण्याची संधी
आण्विक पुरठवठादार देशांच्या गटाचे सदस्यत्व मिळण्यासाठी ओबामा यांनी भारताला पाठिंबा दिला असला तरी त्याने हरखून जाण्यात अर्थ नाही. कारण आण्विक पुरवठादार देश संघटनेत प्रवेश मिळवण्यासंदर्भात ओबामा अंतिम अधिकारी नाहीत. यातच भारतापाठोपाठ पाकिस्ताननेही या सदस्यत्वासाठी अर्ज केल्याने भारताला सदस्यत्व द्यावे की नाही या मुद्दय़ावर चांगलीच आंरराष्ट्रीय कोंडी झाली असून आतले आणि बाहेरचे यांतला हा संघर्ष कोणते वळण घेतो हे पाहणे उद्बोधक ठरावे. ही मोदी यांच्या कथित आंतरराष्ट्रीय मैत्री संबंधांचीही कसोटी आहे असे मत मांडणाऱ्या ‘मैत्रीची कसोटी’ या गुरुवार, ९ जूनच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखावर या आठवडय़ात विद्यार्थ्यांना मत मांडायचे आहे.
आण्विक पुरवठादार देश संघटनेत भारतास प्रवेश मिळावा म्हणून अमेरिका प्रयत्न करेल असे आश्वासन ओबामा यांनी दिल्यानंतर भले शाब्बास स्वरूपाची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली असून ती अज्ञानमूलक असल्याचा उल्लेख या अग्रलेखात करण्यात आला आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये आपली भूमिका मांडायची आहे. पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील.
या अग्रलेखावंर विद्यार्थ्यांना मत मांडणे सोपे व्हावे यासाठी ‘लोकसत्ता’ने तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून दिल्लीतील सोसायटी फॉर पॉलिसी स्टडीजचे वरिष्ठ साहाय्यक संशोधक अनिकेत भावठणकर आणि पुण्यातील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट येथील सहयोगी प्राध्यापक परिमल माया सुधाकर यांना बोलते केले आहे. त्यांच्या मताचा विद्यार्थ्यांना मत मांडताना उपयोग होणार आहे. वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी हा लेख देण्यात आला आहे.
लक्षात ठेवावे असे..
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉग-इन करून विद्यार्थ्यांना आपले भूमिका मांडता येते. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.