News Flash

ब्लॉग बेंचर्सचा नवा विषय ‘अम्मा गेल्या, अम्मा चालल्या’

मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपासून शशिकला यांना दूर ठेवण्याचा मनसुबा तडीस गेला

तामिळनाडूच्या  मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्या चिन्नमा शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवले. हे उत्तमच असले तरी यामागे घडलेल्या घडामोडींमागचे योगायोग हे लक्षवेधी आहेत. या लक्षवेधी घडामोडींचा वेध ‘अम्मा गेल्या, अम्मा चालल्या’ या अग्रलेखात घेण्यात आला आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपासून शशिकला यांना दूर ठेवण्याचा मनसुबा तडीस गेला, म्हणून पन्नीरसेल्वम किंवा भाजप यांची डोकेदुखी संपणार असे नाही. शशिकला तुरुंगातही जातील पण, तामिळनाडूच्या राजकीय संस्कृतीत त्यामुळे तसूभरही बदल होणार नाही. तामिळनाडूच्या राजकारणातील या घडामोडींचा आढावा या अग्रलेखात घेण्यात आला आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ब्लॉग लिहायचा आहे. या अग्रलेखावर मत मांडणे विद्यार्थ्यांना सोपे जावे यासाठी ‘लोकसत्ता’ने राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी यांना बोलते केले आहे. त्यांच्या मतांचा विद्यार्थ्यांना ब्लॉग लिहिताना उपयोग होणार आहे.

पुढच्या गुरूवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://www.loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी हा लेख देण्यात आला आहे. अर्थिक सुधारणा, क्रिकेट, पर्यावरण, उद्योग, जातीयवाद आदी विषयांवर प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखांवर विद्यार्थ्यांनी प्रत्येकवेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला.

या लेखन स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरूवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्यांच्या निर्भिड लेखणीला वाट करून देणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातील विद्यापीठांची व महाविद्यालयांचीही मोलाची साथ लाभली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना www.loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉग-इन करून विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 12:37 am

Web Title: share your opinion on loksatta blog benchers 91
Next Stories
1 परळीचा विश्वजीत आंधळे, पुण्याचा सुमित रणदिवे ब्लॉग बेंचर्सचे विजेते
2 ब्लॉग बेंचर्सचा नवा विषय ‘कडेलोटाच्या काठावर’
3 पुण्याची शीतल जायभाय, परळीचा विश्वजीत आंधळे ब्लॉग बेंचर्सचे विजेते
Just Now!
X