‘ब्लॉग बेंचर्स’चा ताजा विषय : पर्यावरणाच्या ‘बैला’ला..

तामिळनाडूमधील ‘जल्लीकट्टू’ या बैलांच्या खेळावरील बंदीच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध झालेल्या ‘पर्यावरणाच्या ‘बैला’ला..’ अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

११ जानेवारीला प्रसिद्ध झालेल्या या अग्रलेखात स्पर्धेवरील वादाच्या निमित्ताने ‘पर्यावरण’ या विषयाचा व्यापक आढावा घेण्यात आला आहे. परंपरेच्या नावाखाली प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्या या खेळावर सर्वोच्च न्यायालयाने घातलेली बंदी केंद्रीय पर्यावरण विभागाने एका अध्यादेशाद्वारे उठविली. त्याची अत्यंत कठोर, तिरकस आणि मुद्देसूद मांडणीतून निर्भत्सना करणाऱ्या या अग्रलेखावर विद्यार्थ्यांनी आपली भूमिका मांडायची आहे.

तत्पूर्वी याच विषयावर पर्यावरणाचे अभ्यासक अतुल देऊळगावकर आणि कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. उदय वारूंजीकर या दोन तज्ज्ञांनाही ‘लोकसत्ता’ने बोलते केले आहे. वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेचा हा तिसरा लेख आहे. अर्थिक सुधारणा आणि क्रिकेट या विषयांवर प्रसिद्ध अग्रलेखांवर विद्यार्थ्यांनी दोन्ही आठवडय़ात भरभरून प्रतिसाद देत ‘ब्लॉग’द्वारे सहभाग नोंदविला.  निर्भिड लेखणीला वाट करून देणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील विद्यापीठांची व महाविद्यालयांचीही मोलाची साथ लाभली आहे.

लक्षात ठेवावे असे..

  • या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे आहे.
  • मते नोंदविण्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ.
  • indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळावर स्पर्धेतील सहभागासंबंधी माहिती उपलब्ध.
  • ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते.
  • नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉगइन करून विद्यार्थ्यांना आपले भूमिका मांडता येते.
  • आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते.
  • किमान २५० शब्द व मराठीतील लेखनाचाच स्पध्रेसाठी विचार केला जाईल.
  • सहभागी होताना अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी ’ loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.