ब्लॉग बेंचर्सचा नवा विषय ‘जन्मदिन की स्मृतिदिन?’

अर्थविश्लेषक टीसीए श्रीनिवास राघवन यांनी अलीकडेच दाखवून दिल्यानुसार त्यातील सर्वात मोठी अडचण आहे

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

अर्थविश्लेषक टीसीए श्रीनिवास राघवन यांनी अलीकडेच दाखवून दिल्यानुसार त्यातील सर्वात मोठी अडचण आहे ती सरकारवरचा उडालेला विश्वास. आपल्या पैशास कागज का टुकडा जाहीर करणारे, पाठोपाठ वस्तू आणि सेवा कराची सुरी विधिनिषेधशून्य चालवणारे सरकार यापुढे काय करील याची शाश्वती नसल्याने आपली अर्थव्यवस्था अजूनही बिचकलेल्या अवस्थेतच आहे. राजकीय आघाडीवर पंतप्रधान कितीही यशस्वी होवोत. परंतु आर्थिक आघाडीवरचे सत्य मात्र वेगळे आहे, हे निश्चित. यापुढील काळात ते अधिक कटू भासेल. त्याची प्रमुख कारणे दोन. एक म्हणजे मोदी सरकारचा संसार सुखाने सुरू ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खनिज तेलाच्या दरांत होत असलेली वाढ. आणि दुसरे म्हणजे राजकारण्यांना कमी लेखण्यासाठी नोकरशहांचे वाढवले जाणारे प्रस्थ. निश्चलनीकरणाच्या निर्णयाने नोकरशाही कमालीची निर्घृण होऊ लागली असून त्यामुळे कर-दहशतवाद – टॅक्स-टेररिझम – वाढण्याचाच धोका अधिक. म्हणजे ते अर्थव्यवस्थेच्या प्रगतीस आणखीच मारक. या सगळ्या दुष्टचक्रास सुरुवात झाली तो हा आजचा दिवस. तेव्हा तो एका स्वप्नाचा जन्मदिवस म्हणून साजरा करायचा की स्मृतिदिन म्हणून पाळायचा हा प्रश्न त्यामुळे निकालात निघतो. या विषयावर सांगोपांग विवेचन ८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘जन्मदिन की स्मृतिदिन?’ या अग्रलेखात करण्यात आले आहे. या अग्रलेखावर विद्यर्थ्यांना ‘ब्लॉग बेन्चर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे. या स्पर्धेअंतर्गत पुढच्या गुरुवापर्यंत विद्यर्थ्यांना आपले मत नोंदविता येईल.

वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी दर आठवडयमला एक अग्रलेख निवडला जातो. त्यावर विद्यर्थ्यांंनी आपले भाष्य करायचे असते. या आठवडयमकरिता ‘जन्मदिन की स्मृतिदिन?’ या अग्रलेखाची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यर्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यर्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच विद्यर्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यर्थ्यांना भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यर्थ्यांनी  loksatta.blogbenchers@expressindia.com मेलवर संपर्क साधावा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Share your opinion on loksatta blog benchers